Dowry-Free Regions of India: भारतातील 'या' भागात अजिबात घेतला जात नाही हुंडा...'वर' कुटुंबच देते 'वधू' कुटुंबाला भेटवस्तू

Which Indian States Have No Dowry: भारतात असा एक भाग आहे जिथे एक नाही तर सातही राज्यात अजिबात हुंडा देण्याची किंवा घेण्याची प्रथा नाही. त्याच्याऐवजी तिथल्या नववधूचे अतिशय थाटामाटात स्वागत केले जाते.
Indian States With No Dowry System
Indian States With No Dowry Systemsakal
Updated on

Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हागवणे या पुण्यातील तरुण विवाहित महिलेच्या मृत्यू प्रकरणाने पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. वैष्णवीचं केवळ दोन वर्षांपूर्वीच लग्न झालं होतं आणि ती मुळशी तालुक्याचे राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जवळचे कार्यकर्ते राजेंद्र हागवणे यांची सून होती. तिच्यावर हुंड्यासाठी छळ होत असल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे आपल्या समाजात अजूनही हुंड्याचं वाईट प्रथा किती खोलवर आहे, हे अधोरेखित होते.

पूर्वी लग्नाच्या वेळी मुलीच्या आईवडिलांनी तिच्या नव्या आयुष्यासाठी काही गोष्टी दिल्या जात असत, पण नंतर ते समाजाच्या दबावामुळे बंधन बनलं. यामुळे स्त्री भ्रूणहत्या, घरगुती हिंसा, हुंडाबळी अशा अनेक वाईट गोष्टी वाढल्या.

आपण आज जरी प्रगतीबद्दल बोलत असलो, तरी अजूनही अनेक ठिकाणी स्त्रियांकडे मालमत्तेसारखं पाहिलं जातं.

परंतु भारतात असा एक भाग आहे जिथे एक नाही तर सातही राज्यात अजिबात हुंडा देण्याची किंवा घेण्याची प्रथा नाही. त्याच्याऐवजी तिथल्या नववधूचे अतिशय थाटामाटात स्वागत केले जाते आणि बदल्यात नववधूच्या कुटुंबाकडून कोणतीही अपेक्षा नसते. चला तर मग जाणून घेऊया या खास राज्यांबद्दल.

Indian States With No Dowry System
Premium | Vaishnavi Hagawane Dowry: वैष्णवीच नव्हे तर देशभरात अनेकींचा जीव घेतोय हुंडा! NCRBच्या अहवालातील धक्कादायक वास्तव!

भारतातील या राज्यात आहे हुंडा बंदी

भारतातील ईशान्य भाग, म्हणजेच मणिपूर, मिझोराम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मेघालय आणि त्रिपुरा ही सातही राज्ये या हुंड्याच्या प्रथांपासून दूर आहेत. या ठिकाणी लग्नात मुलीच्या घरच्यांनी मुलाच्या घरच्यांना काही देणं गरजेचं मानलं जात नाही. याउलट, मुलाच्या घरच्यांकडून मुलीला आणि तिच्या घरच्यांना आदराने भेटवस्तू दिल्या जातात.

अर्थात, काही ठिकाणी मुलीच्या आईवडिलांकडून तिच्या नव्या आयुष्यासाठी वस्तू किंवा संपत्ती दिली जाते. पण ती नवऱ्याच्या कुटुंबासाठी नसून, केवळ तिच्या स्वत्वासाठी असते. याला 'स्त्रीधन' असे म्हणतात. याचा मुख्य उद्देश मुलीला स्वावलंबी बनवणं हा असतो. हा प्रकार ऐच्छिक असून, त्यात कोणताही सामाजिक दबाव नसतो.

या सातही राज्यांमध्ये महिलांना समाजात पुरेसे स्थान व सन्मान मिळतो. ही राज्य अनेक बाबतींत इतर भागांपेक्षा वेगळे ठरतात. ईशान्य भारतातील समाज हा प्रामुख्याने समतावादी आणि काही ठिकाणी मातृसत्ताक पद्धतीचा आहे. महिलांना स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार असतो, त्यांच्याकडे संपत्तीचे मालकी हक्कही असतात. त्यामुळे इथे पुरुषप्रधान संस्कृतीचे दडपण जाणवत नाही.

Indian States With No Dowry System
Dowry Harassment: हुंड्यासाठी छळ होत असेल तर काय करावं अन् कुठे तक्रार करावी?

जम्मू आणि काश्मीरचं प्रेरणादायी उदाहरण

जम्मू आणि काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यात बाबावेईल नावाचं एक गाव आहे. या गावाने 1985 सालापासून हुंडा घेण्याची प्रथा बंद केली आहे. गावातल्या लोकांनी एकत्र येऊन ठरवलं की लग्नात मुलाच्या घरच्यांनी मुलीच्या घरच्यांकडून काहीही मागू नये. यासाठी त्यांनी एक नियम बनवला. त्या नियमानुसार मुलीला दिलं जाणारं ‘मेहर’ आणि लग्नाचे इतर खर्च ठराविक मर्यादेतच असले पाहिजेत. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना गावात वाईट वागणूक दिली जाते आणि त्यांना समाजात मिसळू दिलं जात नाही.

आज जिथे देशात महिला प्रगती करत आहेत, तिथे अजूनही एकसमानता, समान हक्क आणि समान वागणूक मिळत नाहीये. भारतात आजही अनेक ठिकाणी हुंडा घेण्याची प्रथा चालूच आहे, तेव्हा भारताचा ईशान्य भाग संपूर्ण देशासाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरत आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com