Old Is Gold : ज्येष्ठ म्हणजे संस्काराचा ठेवा!

ज्येष्ठांचे चार वकार आहेत.ज्यात विचारीपणा ,व्यवहारीपणा, व्यासंगीपणा आणि व्रतस्थपणाचा समावेश होतो.
Old Is Gold
Old Is Goldesakal

डॉ. ज्ञानेश्वर मिरगे

ज्येष्ठ मंडळी ही सुसंस्काराचा ठेवा आणि सर्व समाजाचे आधारस्तंभ असतात. त्यांच्या ठायी असलेला व्यासंग आणि जीवनाचा अनुभव हे त्यांचे फार मोठे धन असते. ज्येष्ठांचे चार वकार आहेत.ज्यात विचारीपणा ,व्यवहारीपणा, व्यासंगीपणा आणि व्रतस्थपणाचा समावेश होतो.

विचारवंत म्हणतात, आशीर्वादाचे बळ मोठे ,एवढे तरी ध्यान ठेवा, ज्येष्ठांचा मान राखण्यास, कर्तव्याचे भान ठेवा. सेवानिवृत्त झाल्या नंतरचे आपले आयुष्य म्हणजे परमेश्वराने आपणाला दिलेला बोनस आहे. बोनस आयुष्य परमेश्वराने दिलेली मोठी देणगीच होय. या देणगीचा उपयोग प्रत्येक ज्येष्ठांनी परोपकार करण्यात करावयाचा असतो. जीवनाच्या वाटचालीत परोपकार करण्याचे विविध मार्ग आहेत.

हा वसा जर ज्येष्ठांनी घेतला तर, त्यांचे जीवन मंगलमय आणि पवित्र होईल. विचारवंतांचा हा विचार मला अनुकरणीय आणि आदर्श वाटतो. श्री शिव शंकराच्या डोक्यावर बसून राहण्यात गंगेला पवित्रपणा आली नाही . तर तेथून खाली येऊन, जनता जनार्दनावर उपकार करण्याकरिता ती धावत आली आणि प्रवाहित झाली. त्यामुळे गंगेला पवित्रता आली.

सेवानिवृत्त झालेल्या कोणत्याही व्यक्तीने आता मी काहीच करू शकत नाही, अशी मानसिकता न ठेवता, सदैव कार्यरत राहिले पाहिजे. सेवानिवृत्तीनंतर वाढत्या वयाबरोबर ज्येष्ठांची कार्यगती आणि शक्ती कमी होते हे निश्चितपणे खरे आहे. पण एक लक्षात ठेवायला हवे की, वाढत्या वयाबरोबर ज्येष्ठांची कौशल्य, चातुर्य आणि हुशारी ही वृद्धिंगत होते.

ज्येष्ठांनी सेवेतून निवृत्त होईपर्यंत, भरभरून कामे केली. नोकरी, सांसारिक जीवन ,स्नेही परिवार सांभाळून त्यांनी, समाजात कार्य करीत स्वतःला झोकून दिले. आपापल्या परीने मुलामुलींना उच्चशिक्षित करून ,आर्थिक दृष्ट्या स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी भरपूर कष्टही घेतले, सक्षम केले. प्रपंच जीवनातील सर्व जबाबदाऱ्यांचे भान ठेवून कर्तव्य कर्म केले. म्हणूनच त्यांच्या निवृत्तीच्या जीवनाकडे, नवीन आवृत्ती म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन समाजाने ठेवावा ही अपेक्षा आहे.या वयात प्रकृतीच्या विविध तक्रारी निर्माण होणारच.. शरीर कुरकूर करणारच.. तो निसर्ग नियमच आहे.

प्रत्येकाला या कालखंडातून जावे लागणार आहे. आर्थिक सुबत्ता, भौतिक सुविधा, वैज्ञानिक संशोधनातून विकसित झालेली आधुनिक उपचार पद्धतीमुळे आज संपूर्ण भारत वर्षात ज्येष्ठांची संख्या निश्चितपणे वाढली आहे. वाढत्या वयाबरोबर विविध समस्याही निर्माण झालेल्या आहेत. शारीरिक बळ कमी होणे, व्याधी, रोग,उपचार समस्या यातून काही ज्येष्ठांच्या मनी निराशावाद निर्माण झाल्याचे आपल्याला जाणवते.

अशा स्थितीत समाजातील सर्व घटकांनी ज्येष्ठांची दखल घेण्याची गरज आहे. कुटुंबातील प्रत्येकाचे विचार निराळे, आवडही वेगळी तरीसुद्धा सर्वांनी सर्वांशी ,सुखाने आनंदाचे वागावे हा ज्येष्ठांच्या मनातील विचार कुटुंबात जपल्या गेला पाहिजे. भारतीय संस्कृतीत ज्येष्ठ नागरिकांचे स्थान नेहमी आदराचे राहिले आहे.कारण परिवाराचे ते खऱ्या अर्थाने आधारवड असतात. महाराष्ट्राची लोकसंख्या आज सुमारे ११ कोटी आहे. पैकी सव्वा कोटी म्हणजे १० टक्के नागरिक ज्येष्ठ आहेत. आयुष्याची संध्याकाळ कुठे आणि कशी जाईल हे कोणालाही सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाला या कालखंडाला सामोरे जावे लागणार आहे.

Old Is Gold
Old Age Home : ज्येष्ठांना आरोग्यापासून मन रिझवण्याचा आधार

कसे सामोरे जाता येईल या काळाला...

स्वतःला शारीरिक आणि मानसिक दृष्टीने अधिक मजबूत करावे.

क्रियाशील राहावे, मन स्थिर ठेवावे.

संतुलित आहार,व्यायाम आणि पुरेशी विश्रांती घ्यावी.

सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन विचारांचे आदान प्रदान करावे.

वयोमानानुसार वयाच्या ५८ व्या, ६०व्या वर्षी आपण सेवेतून मुक्त झालो. जीवनातून मुक्त झालो नाही. जीवन काही पूर्ण संपलेले नाही. विश्व नियंत्याच्या इच्छेनुसार,आयुष्य आहे तोपर्यंत जगावेच लागणार आहे. उलट मी तर असे म्हणेन की वयोमान ६० नंतरचा काळ हा प्रगल्भ विचारांचा असतो. वयाच्या साठी मध्ये मनुष्य हा केवळ शासनातील सेवेच्या कर्तव्यापासून निवृत्त होतो. प्रत्यक्ष जीवनापासून नाही. सेवानिवृत्तीनंतर सकारात्मक विचार ठेवले तर शरीर सुद्धा सकारात्मक प्रतिसाद देईल. समाजातील अनेक ज्येष्ठांचा हा अनुभव आहे. (Old Age People)

Old Is Gold
Lifestyle Blog : मुलाच्या घरात राहायला नको वाटते....!

त्यामुळे वयाचे ७५ वर्ष सुद्धा वृद्धत्वाचा निकष होऊ शकत नाही, असे मला वाटते. कोणत्याही ज्येष्ठ नागरिकांनी भावनिक दृष्ट्या ,जीवनामध्ये खचून जाऊ नये. साहित्य लेखनाच्या क्षेत्रातही सातत्य ठेवले, आजही तो वसा ठेवत आहे. आज जीवनाच्या ७३ मध्ये प्रवेश केला, प्रत्येक कार्यात सकारात्मकता ठेवल्याने, उगवत्या प्रत्येक दिवसाचा भास्कर मला कार्याची ऊर्जा देत गेला. (Lifestyle)

आयुष्याच्या विविध टप्प्यात वेगळेपणाची जाणीव होत गेली. आयुष्य किती असेल हे आपणाला माहीत नसते. जीवनाच्या वाटचालीत महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे फेस्कॉनचे ब्रीदवाक्य सदैव लक्षात असू द्या...जगण्यासाठी खा, खाण्यासाठी जगू नका, हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com