

Scandinavian Parenting Style: 7 Rules for Raising Independent Kids
esakal
Scandinavian Parenting Style: सध्याच्या बदलत्या काळात मुलांच्या संगोपनासाठी जुन्या आणि अतिशय कठोर पद्धती कुचकामी ठरत आहेत. त्यामुळेच पालक आपल्या पालकत्वच्या पद्धतीत नवनवीन बदल करत आहेत. आज आपण अशाच एका जगप्रसिद्ध पालकत्व पद्धतीबद्दल बोलणार आहोत, जिची चर्चा संपूर्ण जगात होत आहे. ती म्हणजे स्कैंडिनेवियन इंडिपेंडन्स पेरेंटिंग स्टाइल (Scandinavian Parenting Style).
नॉर्वे, स्वीडन आणि डेन्मार्क या स्कैंडिनेवियन देशांमध्ये ही पद्धत अत्यंत लोकप्रिय आहे. यामध्ये मुलांना स्वायत्तता, समानता आणि पूर्ण अधिकार देण्यावर भर दिला जातो. मुलांना काही बाबतीत पूर्णपणे स्वतंत्र सोडणाऱ्या या पालकत्वाच्या ७ प्रमुख गोष्टी खालीलप्रमाणे आहेत-