Smartphone Tips: पासवर्डपासून वॉलपेपरपर्यंत मोबाईल मधले हे बदल नशीब बदलवू शकतात. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Smartphone Tips

Smartphone Tips: पासवर्डपासून वॉलपेपरपर्यंत मोबाईल मधले हे बदल नशीब बदलवू शकतात

आज स्मार्टफोन कोणाकडे नाहीये बहुदा हा प्रश्नच चुकीचा ठरेल अगदीच काही लोक स्मार्टफोन वापरत नाहीत. खरतर आपले आपल्या फोनवरचे अवलंबन देखील खूप वाढलेले आहे. त्याच कारणही तसंच आहे, आपल्या प्रत्येका अडचणीला आपला स्मार्टफोन हा एक उत्तम पर्याय आहे. पण जर अस म्हटलं की स्मार्टफोन मुळे आपले नशीब बदलू शकते तर?

Astrotalk च्या रिपोर्टनुसार, स्मार्टफोनमध्ये अनेक छोटे बदल करून आपण आपले नशीब चमकवू शकतो.

हेही वाचा: PM Modi Lifestyle: 72 वर्षाच्या वयातही पीएम मोदी आहेत अगदी फिट; काय आहे त्यांचं फिटनेस सिक्रेट?

फोनचा पासवर्ड काय असावा? 

आपल्या फोनचा पासवर्ड आपल्या वाढदिवसाच्या तारखेशी किंवा लॉकर नंबरशी किंवा फोन नंबरशी सलग्न असावा. तसेच पासवर्डच्या सगळ्या अंकांची बेरीज म्हणजे जर तुमची जन्मतारीख येत असेल तर तेही फलदायी ठरते.

हेही वाचा: Lifestyle: सकाळी लवकर जाग येण्यासाठी 'या' तीन गोष्टी आचरणात आणा

फोनचा रंग काय असावा?

फोनचा रंग तुमच्या लकी नंबरनुसार निवडला जावा आणि तुमचा लकी नंबर हा तुमच्या वाढदिवसाच्या नंबरची बेरीज असते.  

  1. लाल

  2. पांढरा

  3. पिवळा किंवा सोनेरी

  4. तपकिरी

  5. हिरवा

  6. सिल्व्हर 

  7. निळा 

  8. काळा 

  9. लाल किंवा सोनेरी 

आपल्या लकी नंबरच्या रंगाचा वापर फलदायी ठरेल.

हेही वाचा: Lifestyle : 'या' 5 सवयी तुमचा उत्साह कमी करतात

स्मार्टफोनचा वॉलपेपर काय असावा?

आपल्या फोनचा वॉलपेपर आपली प्रायोरिटी दाखवतो आपल्याला आयुष्यात नक्की काय हवं आहे हे सांगतो. जर तुम्हाला कामात यश हवे असेल तर तुमचे ऑफिसचे चित्र वॉलपेपरसारखे बनवा, जर तुमच्यासाठी पैसा महत्त्वाचा असेल तर लक्ष्मीजींचा फोटो वॉलपेपर म्हणून लावा आणि तुम्हाला प्रसिद्धी हवी असेल तर तुमचा स्क्रीन वर उगवता सूर्य असावा.

जीवनात शांतीसाठी आकाशाचे चित्र लावा, तुम्हाला तुमची उत्पादकता वाढवायची असेल तर धावत्या घोड्याचा फोटो लावा आणि तुम्हाला आनंद हवा असेल तर वॉलपेपर म्हणून फुलांचा वापर करा.