Perfect Marriage Gift : तुम्हाला माहितीय का माहेरवाशीन मुलीला सुई, झाडू, लोणचं का देत नाहीत?

मुलीला या गोष्टी कधीच देऊ नयेत
Perfect Marriage Gift
Perfect Marriage Gift esakal

Perfect Marriage Gift : सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे. त्यामुळे लग्नात नवरी कशी आहे, तिचा नवरा, करवलीचा मेकअप, जेवणाच्या पंगती, जमलेली गर्दी, मानपान या सगळ्यात एक गोष्ट अगदी निरखून पाहिली जाते. ती म्हणजे नवरीला दिलेला रूखवत.

शहरात ही पद्धत बदललेली असली तरी खेडेगावत आजही नवरीला बारीक सारीक गोष्टी सुद्धा रूखवतात दिल्या जातात. माहेरची आठवण म्हणून तिला या गोष्टी भेट दिल्या जातात.

रूखवत देण्यामागे आजूनही एक कारण आहे. ते म्हणजे लाडक्या लेकीला कशाची कमी पडायला नको. आणि त्यावरून तिला कोणी काही बोलायला नको. म्हणून रूखवतात मिठाई, चिवडा आणि भांडी, मोठा बेड असं सगळंच दिलं जातं.  

Perfect Marriage Gift
Bridal Saadi : नवरीची साडी निवडताना काय काळजी घ्याल ?

हा एक प्रकारचा आई वडिलांचा आशिर्वादच असतो. लग्नानंतर आई-वडिलांपासून सर्वजण मुलीला सुखी आणि आनंदी जीवनाला आशीर्वाद देतात.

पण, तुम्हाला माहित आहे का की, नवरीला काही गोष्टी कधीच देऊ नयेत. सीहोरचे पंडित प्रदीप मिश्रा जी यांनी सांगितले आहे की, मुलीच्या जाण्यावर काय द्यावं ते जाणून घेऊया.

लोणचे

पंडित प्रदीप मिश्रा म्हणतात की, मुलीला निरोप देताना लोणचे कधीही देऊ विसरू नये. याचा त्याच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतो आणि नातेसंबंध बिघडू शकतात.

लोणच्याची चव आंबट असल्याने ती देणे योग्य नाही. स्वत:च्या हाताने बनवलेले लोणचे मुलीला द्यायचे असेल तर लग्नानंतर तिच्या घरी जाऊन लोणचे बनवा.

Perfect Marriage Gift
Bridal Bras: ब्राइडल ड्रेससह चुकीची ब्रा वापरल्यास लूक होईल खराब!

केरसुणी

पंडितजी म्हणतात की, झाडूमध्ये माता लक्ष्मीचा वास असला तरी प्रस्थानाच्या वेळी मुलीला झाडू देऊ नये. असे मानले जाते की, मुलीच्या निरोपात झाडू भेट दिल्यास तिचा आनंद हिरावून घेतला जातो. मुलीचं घर आणि संसार कधीच सुखी नसतो. त्याचं आयुष्य दु:खाने भरलेलं असतं.

सुई किंवा कोणतीही धारदार वस्तू

 पंडित प्रदीप मिश्रा यांच्या नुसार, जेव्हा जेव्हा तुम्ही मुलीला निरोप द्याल तेव्हा सुई किंवा धारदार वस्तू देऊ नका. असे म्हटले जाते की, निरोपात मुलीला अशा गोष्टी दिल्याने नात्यात गोडवा येण्याऐवजी कटुता येते. त्यामुळे अशा गोष्टी टाळायला हव्यात.

Perfect Marriage Gift
Eid Special Look : ईदसाठी तयार होताय? कडक उन्हाळ्यात असा टिकवा मेकअप!

चाळण

निघताना मुलीला कधीही पिठाची चाळणी देऊ नये. मकर संक्रांतीला जेव्हा आई आपल्या मुलीला काही गिफ्ट करते तेव्हा त्यात 13 गोष्टींचा समावेश असतो. चाळणी हाही त्यापैकीच एक. हे योग्य मानले जात नाही. कारण निरोपात पिठाची चाळणी दिल्याने सुखी जीवनात अडचणी येतात.

मग तिला काय द्याव

धान्याच्या राशी

रूखवतात नेहमीच एक छोटी बैलगाडी असते. त्यात धान्याची पोती असतात. ती लेकीला देणं शुभ असतं. कारण, लेकीच्या घरातही धान्याच्या राशी पडाव्यात तिच घर धान्य, फळांनी भरून जावं असा याचा अर्थ असतो.

Perfect Marriage Gift
Bride Age : वधूचे वय वरापेक्षा कमी असावे असे का म्हणतात? या मागे काही शास्त्रीय कारण आहे काय?

बाळकृष्ण

लेकीच्या कन्यादानावेळी तिला चांदी आणि पितळेचा बाळकृष्ण दिला जातो. लेकीच्या घराच गोकुळ व्हाव तिथे छोटा बाळकृष्ण जन्मावा असा याचा अर्थ असतो.  

तोरण

 लेकीला तोरण देणं शुभ मानलं जातं. कारण तोरण हे शुभ प्रसंगी बांधलं जातं. त्यामुळे मुलीच्या आयुष्यात चांगल्या प्रसंगांना सुरूवात व्हावी म्हणून तोरण भेट द्यावं.

Perfect Marriage Gift
Kerala Bride Viral Video : ...म्हणून मुली वडिलांच्या अधिक जवळ असतात!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com