पितृपक्ष 2021 : भारतातच नव्हे, 'या' देशांमध्येही करतात पुर्वजांचे स्मरण!

पितृपक्ष 2021 : भारतातच नव्हे, 'या' देशांमध्येही करतात पुर्वजांचे स्मरण!

दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा पितृ पक्षाचा काळ आजपासून सुरु झाला आहे. या काळात आपल्या पुर्वजांच्या आत्माला शांती मिळावी यासाठी त्यांचे स्मरण करुन श्राद्ध आणि तर्पण असे कार्य करतात. भारतात त्यासाठी काही लोक हरिद्वार जातात, तर काही जण घरीच कार्य करतात. लोक आपल्या पूर्वजासाठी श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण करु आपल्या पूर्वजाच्या आत्माला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करतात.

Picasa

यंदा भारतात 20 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबरपर्यंत पितृपक्षाचा कालावधी असेल, याकाळात श्राध्द आणि इतर कार्यांचे विधी करतात. पण तुम्हाला माहित आहे का भारता शिवाय इतर देशांमध्येही पुर्वजांच्या आत्माच्या शांतीसाठी जेवन बनवून त्यांचे स्मरण केले जाते. त्यासाठी काही देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सण देखील साजरे केले जातात.

जपान :

जपानमध्ये बॉन फेस्टिव्हल साजरा केला जातो, जपानी कॅलेंडरनुसार हा सण 7 व्या महिन्यांत 10 व्या दिवशी म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या 15 दिवसांमध्ये सुरु होतो. या दिवसांमध्ये लोक आपल्या पुर्वजांचे थडगे (कब्र/Grave)जवळ जाऊन पुष्प अपर्ण करुन श्रध्दांजली वाहतात. तसेच लोक लाईटिंग करुन घर प्रकाशमय करतात, नाच गाण करतात. वेगवेगळ्या प्रकारचे पकवान बनवतात आणि पुर्वजोंना परत पाठविण्यासाठी मदत म्हणून दिवे पेटवून नदीमध्ये सोडतात.

चीन

चीनमध्ये 4-5 एप्रिलला 'छींग मिंग' नावाचा सण साजरा केला जातो.या दिवशी येथील लोक कब्रिस्तान (Cemetery) जाऊन पुर्वजांच्या थडग्याची (कब्र/Grave) सफाई करतात आणि पूजा केल्यानंतर परिक्रमा देखील घालतात. या दिवशी लोक आपल्या पुर्वजांना थंड जेवण देतात आणि स्वत:ही तसेच जेवण खातात. या दिवशी येथे सुट्टी दिली जाते

जर्मनी

जर्मनीमध्ये1 नोव्हेंबरला 'ऑल सेंट्स डे' नावाचा सण साजरा केला जातो. या एक दिवस दुख व्यक्त करण्यासाठी ठरविला जातो. या दिवशी लोक आपल्या पुर्वजांचे स्मरण करुन त्यांच्यासाठी मेणबत्या पेटवतात आणि जेवणापूर्वी त्यांच्या शांतीसाठी प्रार्थना करतात.

सिंगारपूर, थायलॅन्ड श्रीलंका आणि मलेशिया

या देशांमध्ये हंगपी घोस्ट नावाचा फेस्टिवल ऑगस्ट महिन्यात साजरा केला जातो. चीन च्या लुनिसोलर कॅलेंडरमध्ये 7 व्या महिन्यांमध्ये 15 व्या रात्री या सणांचे आयोजन केले जाते. या देशांमध्ये मानले जाते की या दिवशी नर्काचे द्वार उघडले जाते आणि पूर्वजांच्या आत्मा पृथ्वीवर जेवण्यासाठी येतात. त्यामुळे लोक पुर्वजांसाठी चांगले जेवण बनवून ठेवतात.

(वरील लेखातून कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा पसरवण्याचा सकाळ मध्यम समूहाचा उद्देश नाही)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com