Pregnancy Diet Tips: गरोदर स्त्रियांनी मीठाचं सेवन जास्त करू नये, कारण...

Pregnancy Diet Tips: जास्त मीठाचे सेवन गर्भवती महिलांसाठी हानिकारक ठरू शकते
Pregnancy Diet Tips
Pregnancy Diet Tipsesakal

Pregnancy Diet Tips: गरोदरपणा हा असा काळ आहे ज्या काळात स्त्रियांना अनेक वेगवेगळे पदार्थ खाण्याची इच्छा होते. याच गरोदरपणात डोहाळे सुद्धा लागतात. शरीरातील हार्मोनल बदलांमुळे खाण्याबद्दलच्या चित्र विचित्र इच्छा गरोदर स्त्रीला होत असतात. पण तरी अशावेळी स्त्रीने काही पदार्थांबद्दल सावध राहायला हवे.

या लेखात आम्ही अशाच काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत जे गरोदर स्त्रीने अजिबात खाऊ नयेत. या काळासाठी ते पदार्थ प्रतिकूल असून वाईट परिणाम शरीरावर ठरू शकतात आणि पुढे त्याचे दुष्परिणाम बाळाला सुद्धा भोगावे लागू शकतात.

मीठ आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. त्यात सोडियम आढळते, जे आपल्या शरीरासाठी महत्त्वाचे आहे. सोडियम आपल्या शरीरात पीएच आणि द्रव पातळी संतुलित करते. अशा वेळी गरोदरपणात मिठाचे सेवन करणे आवश्यक ठरते, परंतु जास्त मीठाचे सेवन गर्भवती महिलांसाठी हानिकारक ठरू शकते. गरोदरपणात मीठाचे सेवन किती करावे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Pregnancy Diet Tips
Pregnancy : आई-बाबा व्हायचं आहे? ‘सेफ’ एक पर्याय

आजही सामान्यतः गरोदर स्त्रियांना या काळात काय खावे आणि काय खाऊ नये या गोष्टी माहित नसतात. पण त्या माहित असायलाच हव्यात. जेणेकरून कोणताही धोका आई व बाळ दोघांना होणार नाही आणि ते या काळात सुरक्षित राहून अगदी योग्य पद्धतीने डिलिव्हरी होईल.

गरोदरपणात मीठ खाल्लं तर आरोग्यासाठी फायदेशीर असतच. परंतु मिठाचं अतिसेवन आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतं. जेवणात मिठाची चव नसेल, तर ते आपल्याला खूप निस्तेज वाटते. चवीसोबतच आरोग्यासाठी मीठ खूप महत्त्वाचे आहे. कारण त्यात सोडियम मुबलक प्रमाणात असते. सोडियम आपल्या शरीरातील पीएच आणि द्रव पातळी संतुलित करते.

अशा परिस्थितीत गरोदरपणात मिठाचे सेवन करणे खूप गरजेचे आहे. कारण मीठ म्हणजेच सोडियम हे गर्भाच्या विकासासाठी खूप महत्त्वाचे असते. पण जास्त प्रमाणात मीठ खाणे देखील गर्भवती महिलांसाठी अपायकारक असू शकते.

त्यामुळे मीठ मर्यादित प्रमाणात सेवन करावे. आज या लेखात आपण गरोदरपणात मीठ किती प्रमाणात सेवन करावे.

Pregnancy Diet Tips
Post Pregnancy Tips : प्रसूतीनंतर महिलांच्या शरीरात होतात बदल? पुरूषांनी या गोष्टींची काळजी घ्यावी

गरोदरपणात किती मीठ खावे?

गरोदरपणात मीठाचे सेवन केलेच पाहिजे, पण ते मर्यादित प्रमाणात केले पाहिजे. गरोदरपणात प्रत्येक स्त्रीने दररोज ३.८ ग्रॅम मीठाचे सेवन केले पाहिजे. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की 3 दिवसात 8.1 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नका.

गरोदरपणात जेव्हा शरीरात मिठाची कमतरता भासते तेव्हा शरीराचे अनेक भाग नीट काम करत नाहीत. मीठाच्या कमतरतेमुळे शरीरात खूप अशक्तपणा आणि थकवा येतो, ज्यामुळे तुम्हाला गरोदरपणात त्रास होऊ शकतो.

सोडियम आपल्या शरीरात द्रव पदार्थ वाढविण्यास मदत करते. गरोदरपणात वाढत्या विरोधाला समर्थन देण्यासाठी द्रव पदार्थाची आवश्यकता असते. अशा वेळी सोडियमची कमतरता असेल तर द्रवपदार्थाचीही कमतरता भासू शकते.

Pregnancy Diet Tips
Pregnancy Tips : २० व्या आठवडे झालेत बाळाने किक मारायला सुरूवात केलीय का? जाणून घ्या किती होते बाळाची वाढ?

गरोदरपणात मीठ खाण्याचे तोटे

  • जर तुम्ही जास्त प्रमाणात मिठाचे सेवन करत असाल तर शरीरातील पाणी कमी होण्याची समस्या देखील उद्भवू शकते.

  • यामुळे गरोदरपणात हात, पाय, चेहरा, पाय इत्यादींना सूज येऊ शकते.

  • जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाबाची समस्या देखील उद्भवू शकते.

  • मीठाच्या अतिसेवनामुळे वारंवार लघवी देखील होऊ शकते.

या गोष्टी लक्षात ठेवा

गरोदरपणात कच्चे मांस अजिबात खाऊ नये. यात कोलाई आणि साल्‍मोनेला नावाचे बॅक्टेरिया असतात. जे की फूड पॉइजनिंगचा त्रास निर्माण करू शकतात. पण गरोदर स्त्रीला मांस खायची खूपच तीव्र इच्छा होत असेल तर तिने ते योग्य पद्धतीने शिजवूनच खायला हवे.

मांसाप्रमाणे मच्छी आणि अन्य सीफूड हे गरोदर स्त्रीच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. शार्क, किंग मॅकरेल आणि टिलफिश सारख्या माशांमध्ये मोठ्या प्रमाणार मर्क्युरी असते. जास्त प्रमाणात मर्क्युरीचे सेवन केल्यास गर्भातील बाळाचा विकास संथ गतीने होऊ शकतो

तुम्ही अनेकांना हा सल्ला देताना ऐकले सुद्धा असेल की गरोदर स्त्रीने या काळात पपई अजिबात खाऊ नये आणि ती गोष्ट खरी सुद्धा आहे. यामध्ये लॅटेक्‍टस असते जे गर्भाशयात आकुंचन निर्माण करू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com