
गणेशोत्सव २०२५ साठी ढोल-ताशा वादनाचा सराव करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
सराव लवकर सुरू करावा, हातांचे व्यायाम करावेत, नियमित सराव करावा, लयबंधता राखावी आणि ऊर्जा वाढवण्यासाठी पोषक आहार घ्यावा.
अनुभवी वादकांकडून मार्गदर्शन घेऊन वाद्यांची काळजी घ्यावी.
Avoiding injuries during dhol-tasha practice: यंदा लाडक्या बाप्पाचे आगमन २७ ऑगस्टला होणार आहे. 'गणपती बाप्पा मोरया, मंगलपुर्ती मोरया...' अशा जयघोषात बाप्पाचे स्वागत करण्यासाठी अनेक भक्त आतुर झाले आहेत. बाप्पाच्या आगमणाला काही दिवसच शिल्लक राहिले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी बाप्पाच्या आगमनासाठी तयारी सुरू केली आहे. लहान- मोठ्या मंडळाच्या गणेशमूर्तीचे मिरवणूकीने आगमन होते. या मिरवणूकीमध्ये ढोल-ताशाचे वादन मोठ्या प्रमाणात केले जाते. ढोल ताशाच्या तालावर अनेक लोक ठेका देखील धरतात. ढोल ताशा पथक हे मिरवणूकीचे खास आकर्षण असतात. पण ढोल-ताशा वाजवण्याचा सराव करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया.