लखलख ‘चंदेरी’

भारतीय संस्कृती दागिन्यांशिवाय पूर्ण होत नाही. हिरे- मोती-सोन्याइतकेच चांदीचे दागिनेही प्रचंड लोकप्रिय आहेत.
Jewellery
JewellerySakal

- पृथा वीर

भारतीय संस्कृती दागिन्यांशिवाय पूर्ण होत नाही. हिरे- मोती-सोन्याइतकेच चांदीचे दागिनेही प्रचंड लोकप्रिय आहेत. सिल्व्हर दागिने ‘व्हिंटेज ज्वेलरी’ म्हणून ओळखले जातात आणि आजही चांदीचे दागिने आपली स्वतंत्र शैली राखून आहेत.

चांदीचे दागिने समृद्धीचे आणि वारशाचे प्रतीक. रॉयल टच देणाऱ्या चांदीच्या ज्वेलरीनेही २०२२ पासून लक्ष वेधले आहे. अत्यंत सुंदर; पण पारंपरिक डिझाइनमुळे चांदीच्या दागिन्यांनी महिलांना आकर्षित केले. कोणत्याही वेशभूषेवर सहज शोभून दिसणारे चांदीची दागिने चटकन उठून दिसतात. ‘व्हिंटेज ज्वेलरी’ म्हणूनही हा ट्रेंड तरुणींनाही भावला आहे.

सोन्याइतकीच चांदीची आवड असणाऱ्यांचा खास चाहता वर्ग आहे. एक तर सोन्याच्या तुलनेत चांदीचे दागिने परवडतात. शिवाय गुंतवणूकही होते. चांदीचे दागिने नीट हाताळले, तर ती ज्वेलरी कोणत्याही फॅशनला मॅच करणारी ठरते. वर्षभर मोठमोठ्या फॅशन ब्रँड्सनी चांदीच्या अफलातून ज्वेलरी विक्रीला ठेवल्या. चांदीचे औषधी गुणधर्म असल्याने चांदी अनेक वर्षांपासून वापरात आहे. देशाच्या उत्तर भागात तर नववधूंना चांदीचे दागिने आवर्जून दिले जातात.

वेगवेगळ्या काळांत चांदीच्या दागिन्यांमध्ये बदल झाले. कधी प्युअर चांदी, कधी चांदीचा मुलामा देऊन दागिने तयार व्हायचे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला मिळालेल्या वारशामध्ये चांदीची ज्वेलरी हमखास असते. सध्याच्या काळात, ज्वेलरी चांदीच्या दोन सर्वांत लोकप्रिय प्रकारांमध्ये ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर आणि स्टर्लिंग सिल्व्हर यांचा समावेश आहे. स्टर्लिंग चांदीचे दागिने मोहक वाटतात आणि ऑक्सिडाइज्ड चांदीचे दागिने जुन्या फॅशनचे प्रतिनिधित्व करतात.

सध्या चांदीच्या दागिन्यांवर तिबेट, ईशान्य भारत, राजस्थान आणि गुजरातच्या प्रसिद्ध व पारंपरिक डिझाइन्ससह, आदिवासी पद्धतीची छाप आहे. चांदीच्या बांगड्या, कडी, अंगठ्या, ज्वेलरी पीस, चेन, नोज पिन, टो रिंग, कानातली, पायातली, बांगड्या, नोज रिंग, नेकलेस, पेंडंट या सर्व प्रकारांत हे दागिने उपलब्ध आहेत. हे डिझाइन लक्ष वेधतात ते खास केलेल्या ऑक्सिडेशन इफेक्टमुळे.

प्रशिक्षित व अनुभवी कलाकारांकडून वापरलेली ऑक्सिडायझिंग प्रक्रिया चांदीला एक अनोखे मोहक रूप देते. म्हणूनच चांदीचे दागिने वापरण्याची पूर्वापार चालत आलेली परंपरा शहरात पोचली. याचे श्रेय ज्वेलरी तज्ज्ञांनाही द्यावे लागेलच. चांदीच्या दागिन्यांच्या लोकप्रियतेचे आणखी एक कारण म्हणजे हे दागिने पारंपरिक वेशभूषा किंवा वेस्टर्न स्टाईलवर कशावरही खुलतात.

चांदीच्या दागिन्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे ती ‘चंकी चेन’. गळ्याचे सौंदर्य खुलवणारी चंकी चेन सेलिब्रिटींपासून ते तरुणींना आवडते. या चेनमध्ये एकच स्टोन किंवा मणी असतो. वेस्टर्न आणि कॅज्युअल या दोन्ही आऊटफिटवर ही चेन सुंदर दिसते. ‘हुप्स’ कानातलेसुद्धा तरुणींना आवडतात. हुप्सचा आकार गोलाकार असतो. वर्तुळ म्हणजे एकता, अनंतता आणि संपूर्णता. चांदीचे हुप्स कानातले उत्कृष्ट निवड ठरत असून सध्या लोकप्रिय प्रकारात या दागिन्यांचा समावेश होतो.

चांदीचे नेकलेस किंवा ब्रेसलेट, मंगळसूत्र, अंगठी, पायातले, नोज रिंग, नथ, चोकर म्हणजे तर कारागिरांची अफलातून कामगिरी. चांदीचा ऐवज म्हणजे संस्कृती व आत्मविश्वासाचे प्रतीक. आजच्या काळातील स्त्रीचे व्यक्तिमत्त्व प्रकट करणारी सिल्व्हर ज्वेलरी.

जराशी काळजी; भरपूर प्रेम

  • प्रत्येक चांदीची वस्तू स्वतंत्र झिप-लॉक बॅगमध्ये ठेवा.

  • ज्वेलरी बॉक्समध्ये पातळ कागदावर (पिंक पेपर) ज्वेलरी ठेवायची. या बॉक्समध्ये सिलिका जेल किंवा कोळशाचा तुकडा ठेवला तर ओलावा शोषला जातो.

  • बॉक्समध्ये ठेवण्यापूर्वी चांदीचे दागिने मखमली कपड्यात गुंडाळा.

  • चांदीची ज्वेलरी ओलाव्याच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्या.

सिल्व्हर बॅक इन स्टाईल

  • चांदीचे दागिने कुर्ती, सूट, साडी किंवा कोणत्याही एथनिक कलेक्शनसोबत परिधान करता येतात. कौटुंबिक कार्यक्रमांत हे सुंदर दागिने भाव खातात.

  • साधा कुर्ता आणि प्रिंटेड ओढणीसोबत चांदीचे दागिने छान दिसतात. साडीवर गळ्यात स्टर्लिंग सिल्व्हर चोकर असेल तर व्यक्तिमत्त्व आकर्षक दिसते.

  • खणाची साडी, चांदीचे कुडी, चेन चोकर, कुडाचे कानातले, कुडाचे ब्रेसलेट व नोझ रिंग हासुद्धा छान पर्याय आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com