Pune Travel Dairies : मामाचं गाव पुणे असेल तर करा मज्जाच मज्जा, ही ठिकाणे आहेत मुलांसाठी बेस्ट

साहसी खेळांसाठी तुम्ही पुण्यातील गो क्रेझी ऍडव्हेंचर पार्कला भेट देऊ शकता
Pune Travel Dairies
Pune Travel Dairiesesakal

Pune Travel Dairies :

शाळा, परीक्षा संपल्यानंतर सर्वात आधी प्लॅन ठरतो तो मामाच्या गावाला जायचा. लहानपणी मामाच्या गावाला जाऊया असे गाणेही प्रसिद्ध आहे. मामाच्या गावी मोठं अंगण असतं, झोपाळे असतात चमचमीत फळांची, पदार्थींची रेलचेल असते.

नेहमी उन्हाळी सुट्टीत एकत्र येणारे पाहुणे ट्रिपला जाण्याचा प्लॅन करतात. पण जवळपासच खास असं डेस्टिनेशन तुम्हाला मिळत नाही. पण हा तुमचा प्रश्न सुटू शकतो. जर तुम्ही तुमच्या मामाचं गाव पुणे असेल.

पुण्यात लहान मुलांच्या फिरण्यासाठी अनेक चांगली ठिकाणे आहेत. जी मुलांच्या सुट्टीचा आनंद द्विगुणीत करू शकतात. चला तर मग आपण पुण्यातील काही ठिकाणे पाहुयात. जी लहानग्यांना अधिक आनंद देतील.

Pune Travel Dairies
IRCTC Thailand Tour Package: थायलंडमध्ये साजरं करा नवीन वर्ष, चक्क इंडियन रेल्वेने लाँच केलं खास टूर पॅकेज

गो क्रेझी ऍडव्हेंचर

लहान मुलांना साहसी खेळ खेळण्याची आवड निर्माण व्हायला हवी असेल. तर, मुलांनी तसे खेळ खेळायला हवेत. जे त्यांच्या शारीरिक विकासासाठी लाभदायक ठरतील. अशा गेम्सचा आनंद घेण्यासाठी तुम्ही पुण्यातील गो क्रेझी ऍडव्हेंचर पार्कला भेट देऊ शकता.

या पार्कमध्ये मुलांना रायफल शुटींग, भिंतीवर चढणे, बाईक रायडिंग, बंजी ट्रॅम्पोलिन  या सारखे खेळ खेळता येतात.

Pune Travel Dairies
Spanish Woman : world Tour करणाऱ्या तरूणीसोबत Jharkhand मध्ये नेमकं काय घडलं?

राजीव गांधी प्राणी संग्रहालय

पुण्याच्या आयटी पार्क, मोठ्या इमारतींच्या जंगलात एक कोपरा असा आहे जिझे, वाघ, सिंह हत्ती निवांत फिरतीवर असतात. त्या प्राण्यांना पाहून मुलं अगदी प्रसन्न होतील.   हे प्राणीसंग्रहालय मोठ्यांसाठी १५ रूपये आणि छोट्या मुलांसाठी केवळ ५ रूपये तिकिट आहे.

Pune Travel Dairies
Spanish Woman : world Tour करणाऱ्या तरूणीसोबत Jharkhand मध्ये नेमकं काय घडलं?

पाषाण तलाव

धकाधकीची जीवनशैली, आवाज-गोंगाटातून मुलांना बाहेर शांत ठिकाणी न्यायचं असेल तर मुलांना पुण्यातील ब्रिटीशकालीन पाषाण तलावाकडे तुम्ही नेऊ शकता.मुलांना मनसोक्त पोहण्याचाही आनंद इथे घेता येईल.    

हा तलाव ब्रिटिश काळात बांधण्यात आला होता. सभोवतालचे सौंदर्य या तलावाचे सौंदर्य आणखीनच वाढवते. हिरव्यागार झाडांनी झाकलेल्या 300 मीटर लांबीच्या वाटेवर मुलांसोबत फिरण्याचा आनंद वेगळाच असतो.

Pune Travel Dairies
Pune Viral Video: नोकरी सोडल्याचा आनंद साजरा करायला थेट ऑफिसमध्ये आणलं ढोलपथक; बॉससमोरच केला डान्स

पुण्यातील प्रसिद्ध जपानी गार्डन

होय, पुण्यात जपानी गार्डन आहे असे म्हटले तर कोणाचा विश्वास बसणार नाही. पण, पुण्यातील ओकामाया फ्रेंडशिप हे प्रसिद्ध जपानी गार्डन आहे. जगभरात जपानी लोकांचे गार्डनिंग कौशल्य फेमस आहे. 

येथे तुम्ही तुमच्या मुलांसोबत संध्याकाळी सहलीसाठी येऊ शकता. तुम्ही मुलांसोबत बॅट बॉल खेळू शकता. आपण एका सुंदर लहान तलावासमोर निवांत वेळ घालवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com