Ram Navami 2024 : रामनवमीदिवशी करा या गोष्टींचे दान; घरावर राहील नेहमी श्री रामांची कृपा, संकटे होतील दूर

रामनवमीच्या दिवशी आपल्या ज्येष्ठांचा आशीर्वाद अवश्य घ्या
Ram Navami 2024
Ram Navami 2024esakal

Ram Navami 2024 :

मर्यादा पुरूषोत्तम श्री रामांचा आज जन्मोत्सव देशभरात जल्लोषात साजरा होत आहे. आजच्या दिवशी लोक रामलल्लांचे दर्शन घेतात. हिंदू धर्मात रामनवमीच्या निमित्ताने दान करण्याचे खूप महत्त्व आहे. याशिवाय असे अनेक सण आहेत ज्यात दान करणे अत्यंत शुभ मानले जाते.

निराधार, गरीब आणि गरजू लोकांना अनेक गोष्टी दान म्हणून दिल्या जातात. असे केल्याने घरातील अनेक दोष दूर होतात. घरातील प्रत्येकाची संकटांच्या फेऱ्यातून सुटका होते. रामनवमी हा हिंदू संस्कृतीत अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी विशेष पूजा आणि दान केल्याने खूप चांगले फळ मिळते.

आजच्या दिवशी काही गोष्टींचे दान केले तर ते तुमच्या संसारीक जीवनातील अनेक संकटे दूर करणारे ठरू शकते.

दान अशा व्यक्तीला करा

श्रीमंत व्यक्तीला कधीही काहीही दान करू नये. कारण श्रीमंत लोक तुम्ही दान केलेली वस्तू वापरत नाहीत. त्यामुळे या दानाचे कोणतेही शुभ फळ मिळत नाही. जर तुम्हाला काही वस्तू दान करायचीच असेल तर फक्त गरजूंनाच दान करा म्हणजे ते तुम्हाला आशीर्वाद देतील आणि

अन्नदान करा

रामनवमीच्या दिवशी गरीब आणि असहाय्य लोकांना अन्नदान केल्याने तुम्हाला अनेक पटींनी पुण्य मिळेल. रामनवमीच्या दिवशी अविवाहित मुलींना अन्नदान करा. यामुळे माता दुर्गा प्रसन्न होतात. (Ram Navami 2024)

अन्नदान करणे हे हिंदू धर्मात श्रेष्ठ मानले जाते. भुकेल्या किंवा गरजू व्यक्तीला अन्नदान केल्याने देव प्रसन्न होतो. कधीही खराब झालेले किंवा शिळे अन्न दान करू नये याची विशेष काळजी घ्या. असे करणे म्हणजे अन्न ग्रहण करणाऱ्या व्यक्तीचा आणि माता अन्नपूर्णाचा अपमान मानला जातो.

Ram Navami 2024
Ram Navami 2024 : कोल्हापुरातल्या या डोंगरात प्रभू श्रीरामांनी केलेला चमत्कार आजही पहायला मिळतो!

प्रसाद वाटा

रामनवमीच्या दिवशी आपल्या ज्येष्ठांचा आशीर्वाद अवश्य घ्या. तसेच, जवळच्या राम मंदिरात जा दिवा लावा तिथला प्रसाद घ्या आणि पूजा झाल्यावर प्रसाद जास्तीत जास्त लोकांना वाटा. श्री रामांचे नाव घेत हा प्रसाद तुम्ही प्रत्येकाच्या हातात द्याल. तेव्हा नकळत तुमच्याकडून श्री रामांच्या नावाचा उच्चार होईल.

अशा व्यक्तीला काहीही दान करू नका 

ज्या व्यक्तीला धर्मात रस नाही अशा व्यक्तीला कधीही धार्मिक पुस्तके दान करू नका. असे केल्याने तुमचे पुण्य प्राप्त होत नाही. नास्तिक लोकांना केवळ पुस्तके नाहीतर काहीही दान केले तरी त्याचे पुण्य आपल्याला मिळत नाही.

Ram Navami 2024
Ram Navami 2024: नागेश्वरवाडीत तीनशे वर्षांपूर्वीचे राम पंचायतन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com