Rasgulla purity test : पांढराशुभ्र दिसणारा रसगुल्ला शुद्ध की भेसळयुक्त चटकन कसं ओळखाल?

how to identify pure vs adulterated Rasgulla : सणासुदीत खाद्यपदार्थांच्या भेसळीपासून रहा सावध ; भेसळयुक्त पदार्थ खाल्ल्याने आरोग्यावर होईल विपरित परिणाम
A close-up view of white Rasgullas—learn how to detect whether they are pure or adulterated with simple home methods.

A close-up view of white Rasgullas—learn how to detect whether they are pure or adulterated with simple home methods.

esakal

Updated on

Common Signs of Adulterated or Fake Rasgulla : सध्या सणासुदीचा काळ सुरू आहे, नवरात्र उत्सव, दसरा पार पडला आहे आणि आता सगळ्यांना दिवाळीचे वेध लागले आहेत. या सणासुदीच्या काळात घरोघरी गोडधोड पदार्थ तयार केले जातात आणि बाहेरून विकतही मोठ्याप्रमाणावर आणले जातात. मात्र याच काळात घाईगडबडीत आपण विकत घेत असलेली खाद्यपदार्थ खरोखऱच शुद्ध आहेत का, त्यात कोणती भेसळ तर नाही ना? याची फारशी शहानिशा करत नाही. यामुळे पुढे मग आपल्या आरोग्यासाठी हे पदार्थ हानीकारक ठरतात.

याच पार्श्वभूमीवर आपण आज बाजारात मिळणारे पांढरेशुभ्र रसगुल्ले ज्याची सणासुदीच्या काळात प्रचंड विक्री होत असते, त्यामधील भेसळ नेमकी कशी ओळखायची, ते खरोखर शुद्ध आहेत की नाही याची खात्री कशी करायची याबाबत माहिती घेणार आहोत.

पांढऱ्या रसगुल्ल्याची रचनाच तुम्हाला सांगू शकते की, तो भेसळयुक्त आहे की शुद्ध आहे. तुम्ही जेव्हा एखाद्या मिठाईच्या दुकानातून पांढार रसगुल्ला विकत घेता तेव्हा तो आधी तुम्ही दाबून बघावा. यावर जर तो रसगुल्ला पून्हा पूर्ववत म्हणजे आधीच्या आकाराचा झाला तर तो रसगुल्ला शुद्ध आहे. आणि जर तो रसगुल्ला थोडा कडक किंवा अधिकच चिकट लागत असेल, तर त्यामध्ये भेसळ असण्याची शक्यता आहे.

A close-up view of white Rasgullas—learn how to detect whether they are pure or adulterated with simple home methods.
Hemant Soren on Bihar Election : हेमंत सोरेन यांनी वाढवलं RJDचं टेन्शन? बिहार निवडणुकीसाठी केली ‘ही’ मोठी मागणी!

खरा पांढरा रसगुल्ला हा रंगाने पांढराशुभ्रच असतो, मात्र जर तो रसगुल्ला अधिक चमकदार किंवा गडद दिसत असेल तर तो तयार करताना भेसळ झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, रसगुल्ला अधिक चमकदार व आकर्षक दिसावा यासाठी त्यामध्ये केमिकलयुक्त रंगाचाही वापर केला जाऊ शकतो. मात्र असा रसगुल्ला जर तुम्ही खाल्लात तर नक्कीच तुमच्या आऱोग्यासाठी तो हानीकारक ठरू शकतो.

A close-up view of white Rasgullas—learn how to detect whether they are pure or adulterated with simple home methods.
PM Modi Congratulates Trump : मोठी बातमी! पंतप्रधान मोदींकडून ट्रम्प यांचे अभिनंदन अन् ट्रेड डीलवरही झाली चर्चा

भेसळयुक्त मिठाई शोधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आयोडीन चाचणीबद्दल तुम्हाला माहिती आहे का? रसगुल्लाचा एक छोटासा भाग घ्या आणि तो पाण्यात उकळा. पाणी उकळल्यानंतर, पाण्यात आयोडीनचे काही थेंब घाला. जर पाण्याचा रंग बदलला आणि तो निळा किंवा काळा झाला, तर याचा अर्थ असा की मिठाई तयार करताना त्यात स्टार्चची भेसळ करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com