Makar Sankranti Special ! मकर संक्रांतीला काळी साडी का नेसतात? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

reason why womens wear black saree on makar sankranti

Makar Sankranti ! मकर संक्रांतीला काळी साडी का नेसतात?

मकर संक्रांत (Makar Sankrant) हा सण भारतात (India) पुरातन काळापासून मोठया आनंदाने साजरा केला जातो. या दिवशी आपल्या ओळखीतल्या माणसांच्या हातावर तीळ-गूळ (Tilgul) दिला जातो. अन् देताना ‘तीळ गुळ घ्या, गोड गोड बोला’ असं आर्वजून सांगितलं जातं. या दिवशी सगळयात महत्त्वाचं म्हणजे महिला एकमेकींना वाण देतात. हा दिवस नाती दृढ करण्यासाठी, नवीन नाती जोडण्यासाठी असतो.

हेही वाचा: पर्यावरणपूरक मकर संक्रांती साजरी करा

मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो. पौष महिन्यात सूर्य उत्तरायण होऊन मकर राशीत प्रवेश करतो. ही गोष्ट देशभर वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पध्दतीनं साजरी केली जाते. मकर संक्रांती (Makar Sankrant) हा सण उत्तर भारतात दरवर्षी 14 जानेवारीला साजरा केला जातो. मकर संक्रांतीला बहुतांश ठिकाणी काळे वस्त्र परिधान करतात. त्यामागच्या विशेष गोष्टी आता आपण जाणून घेऊया. असं म्हणतात की, सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याची पत्नी छाया म्हणजे सावली हिने काळे वस्त्र (Black clothes) परिधान केलेलं होतं. पुराणातील पुरातन कथेत असा उल्लेख आहे. तेव्हापासून मग काळया ठिपक्याची साडी नेसण्याची पद्धत रूढ झाली. या साडीला ‘काळी चंद्रकळा’ असेही म्हटले जाते.

भारतीय संस्कृती प्रत्येक सण ज्या ऋतुमध्ये येतो, त्यानुसार तो साजरी करण्याची वेगवेगळी, परंपरा पद्धती असतात. आपल्याकडे काळा रंग (Black color) अशुभ मानला जातो. मात्र मकरसंक्रांत हा एकमेव सण आहे की ज्याला काळे कपडे परिधान करून साजरा केला जातो. काळ्या रंगाची वस्त्रे ही बाहेरची ऊष्णता शोषून घेऊन शरीर उबदार ठेवतात म्हणून थंडीमध्ये येणाऱ्या या सणाला म्हणजेच मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसण्याची प्रथा आहे. त्यामुळे संक्रांत जवळ आली की बाजारांमध्ये महिलांसाठी काळ्या साड्या (Black sarees) आणि काळी झबली, तर पुरुषांकरिता काळे कुडते दिसू लागतात.

हेही वाचा: मकर संक्रातीला खणांची होईल चांगली विक्री; कुंभार व्यावसायिक आशादायी

नवीन लग्न झालेल्या मुलीसाठी या सणाचे विशेष महत्व असते. नवविवाहित वधूच्या पहिल्या संक्रांतीला तिला काळी साडी (Black sarees) भेट दिली जाते. काळे कपडे का घालतात. यामागचं वैज्ञानिक कारण बघितलं तर ज्याप्रकारे पांढरा रंग किंवा हलके रंग उष्णता परावर्तित करतात अर्थात उष्णता शोषून घेत नाही, त्याउलट काळा रंग हा ऊष्णता शोषून घेतो. मकर संक्रांत सण हिवाळ्यात येत असल्यामुळे काळ्या रंगाची वस्त्रे शरीराला उब देण्यासाठी फायदेशीर ठरतात. तसंच लग्नानंतर किंवा अपत्य झाल्यावर पहिली संक्रात म्हणून हलव्याचे दागिने घालून सण थाटात साजरा केला जातो. काळ्या रंगावर पांढरे शुभ्र हलव्याचे दागिने देखील उठून दिसतात, म्हणून मग काळ्या रंगाची वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे.

मकरसक्रांतीचे पौराणिक कथेतही महत्त्व आहे.

मकरसंक्रांतीच्याच दिवशी गंगा नदीचे आगमन पृथ्वीवर झाले होते, अशी आख्यायिका आहे. जानेवारीतील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आणि ज्योतिष शास्त्राप्रमाणे या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. सूर्याच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण होणे याला संक्रांत असं म्हणात. मकर संक्रांतीला उत्तरायण म्हणून देखील संबोधलं जातं. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते. या दिवसापासून तिळ तिळ दिवस वाढू लागतो म्हणजे दिनमान वाढायला सुरुवात होते. काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप देण्याची परंपरा आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top