Credit Card : क्रेडिट कार्ड वापरायला लोक का घाबरतात? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Credit Card :

Credit Card : क्रेडिट कार्ड वापरायला लोक का घाबरतात?

सध्या सर्व काही ऑनलाईन झालंय. अशात क्रेडिट कार्डचा सर्वाधिक वापर केला जातो. क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करण्यासाठी बँकासुद्धा अनेक सुविधा देतात. क्रेडिट कार्डचा वापर करुन तुम्ही पेमेंट करू शकता आणि नंतर क्रेडिट कार्डचे बिल भरू शकता.

त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरणे फायदेशीर असते. पण हेच क्रेडिट कार्ड वापरायला अनेकदा लोक घाबरतात. क्रेडिट कार्डचा वापर टाळण्यामागे अनेक कारणे आहेत. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. (Reasons why People Are Afraid of Credit Cards)

  •  क्रेडिट कार्ड असताना खर्च किती करायचा, याकडे अजिबात भान राहत नाही. त्यामुळे विनाकारण खर्च अधिक होतो.

  • त्यानंतर क्रेडिट कार्ड वापरल्यानंतर भरमसाठ बिल आपल्याला भराव लागत, जर वेळेत पैसे नाही भरले तर महिन्याला ३-४% व्याज सुद्धा लागतं.

  • त्यामुळे नेहमी कमी लिमिट असेलेल क्रेडिट कार्ड वापरणे कधीही चांगले असते.

हेही वाचा: Credit Score: असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

  • मुळात क्रेडिट कार्ड वापरायला लोक घाबरत नाहीत, तर टाळतात. नवीन नवीन क्रेडिट कार्ड आल्यावर बऱ्याच बँकांनी ग्राहकांना बरेच लुटले आहे त्यामुळे क्रेडिट कार्ड ची सामान्य माणसांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

  •  क्रेडिट कार्ड कधी कधी अडचणीतही उपयोगी येते पण खर्चावर नियंत्रण नसल्यास क्रेडिट कार्ड अडचणीतसुद्धा आणते.

  • अनेकदा क्रेडिट चोरीला जाणे किंवी हॅक करणे, असे गुन्हे वाढले आहे. अशावेळी क्रेडिट कार्ड वापरताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा: Credit Unions Election : राज्य पतसंस्था फेडरेशनची निवडणूक बिनविरोध

  • क्रेडिट कार्डचे बिल आवाक्यात ठेवून महिना अखेरीस संपूर्ण बिल भरतात, असे लोक क्रेडिट कार्ड वापरण्यात भीत नाही.

  • खिशात क्रेडिट कार्ड आहे म्हणून खर्च करणारे आणि शेवटी अवाजवी बिल न भरता आल्यामुळे व्याज भरणाऱ्या लोकांना क्रेडिट कार्डची भीती वाटणे साहजिकच आहे. 

  • त्यामुळे क्रेडिट कार्ड ला न घाबरता, आपल्या अति खर्चाच्या सवयीना घाबरा.