Refrigerator Care Tips: पावसाळ्यात फ्रिजचे Temperature किती असावं? आजच ही सेटींग चेक करा!

पावसाळ्यात फ्रिजमध्ये बॅक्टेरीया जमू नये म्हणून हे करा
Refrigerator Care Tips
Refrigerator Care Tipsesakal

Refrigerator Care Tips: हवामानात बदल झाला की जसं आपल्याला त्यानुसार बदलावं लागतं. पावसाळ्यात छत्री रेनकोट तर हिवाळ्यात स्वेटर मफलर अशा गोष्टी हाताळाव्या लागतात. अगदी हेच गणित आपल्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंनाही लागू पडतं.

आता फ्रिजचच घ्याना, उन्हाळ्यात एकदम हायवर असलेला फ्रिज हिवाळ्यात मात्र शेवटची घटका मोजत असतो. म्हणजे त्याचं टेम्परेचर अगदी कमी असतं. काही लोक तर केवळ उन्हाळ्यात फ्रिज वापरतात. आणि इतर ऋतूंमध्ये तो बंद ठेवतात.

ऋतूनुसार रेफ्रिजरेटरचे टेम्परेचर नियंत्रित ठेवण्याची अनेक कारणे आहेत. असे न केल्यास त्याचा फ्रिजमधील खाद्यपदार्थांवर परिणाम होतो. अन्नपदार्थ दीर्घकाळ ताजे ठेवण्यासाठी तापमान निश्चित करणे हे अत्यंत महत्त्वाचे काम आहे. पण पावसाळ्यात हे तापमान किती असावं याबद्दल तुम्हाला काही कल्पना आहे का? (Refrigerator)

Refrigerator Care Tips
Fridge Care Tips : पावसाळ्यात या चुका कराल तर फ्रिजला बुरशी चढेल, अन्नपदार्थही होतील खराब!

पावसाळी आणि दमट हवामानात अन्नपदार्थांवर ओलाव्याचा परिणाम होतो, हिवाळ्यात थंडी आवश्यक असते. अशा परिस्थितीत या सर्व ऋतूंमध्ये खाद्यपदार्थांचे वेगवेगळे परिणाम होतात. या प्रभावापासून अन्नपदार्थांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांना ताजे ठेवण्यासाठी टेम्परेचरचे सेटिंग खूप महत्वाचे आहे. पावसाळ्यात अन्नपदार्थांवर काय परिणाम होतो?

पावसाळ्यात फळ, भाज्या लवकर खराब होतात. याचे कारण म्हणजे वातावरणात असलेली आर्द्रता होय. पावसाळ्यता पदार्थांच्या गुणवत्तेवर परिणाम होऊन ते खराब होऊ शकतात. पावसाळ्यात जंतू आणि परजीवींचा विकासही जास्त होतो. कारण त्यांना ओलावा मिळतो.

एवढेच नव्हे तर पावसाळ्यात खाद्यपदार्थांची नियोजनबद्ध पद्धतीने साठवणूक न केल्याने अनेक आजारांनाही बळी पडू शकतो.  

Refrigerator Care Tips
Tips to Clean Fridge: महिलांनो फ्रिज साफ करण्यासाठी फॉलो करा 'या' 5 खास टीप्स

फळ आणि भाज्या, तसेच इतर पदार्थ चांगले रहावे म्हणून पावसाळ्यात फ्रिजचे तापमान किती असावे हे अनेक लोकांना माहिती नाही. पावसाळ्यात रेफ्रिजरेटरचे तापमान योग्यरित्या नियंत्रित करणे आवश्यक आहे जेणेकरून तुमचे खाद्यपदार्थ सुरक्षित राहतील आणि त्यांचा दर्जा राखला जाईल. पावसाळ्यात फ्रीजचे तापमान थंड ठेवण्याची शिफारस केली जाते.

सर्वसाधारणपणे, रेफ्रिजरेटरचे तापमान 0°C (32°F) किंवा त्याहून थोडे कमी असणे चांगले मानले जाते. कारण हे अन्नपदार्थ टिकवून ठेवण्यास आणि त्यांचा ताजेपणा टिकवून ठेवण्यास मदत करते. पावसाळ्यात, अन्न सुरक्षित ठेवण्यासाठी रेफ्रिजरेटरचे तापमान थंड ठेवण्याची शिफारस केली जाते, जेणेकरुन अन्नाची नासाडी टाळली जाईल आणि तुमच्या आरोग्याला कोणताही धोका होणार नाही. (Fridge Care Tips)

Refrigerator Care Tips
Kitchen Tips : Fridge मध्ये ठेऊनही भाज्या खराब कशा होतात? हे घ्या उत्तर

पावसाळ्यात फ्रिजमध्ये बॅक्टेरीया जमू नये म्हणून हे करा

फ्रिज साफ करण्यापूर्वी पूर्णपणे रिकामा करून बटण बंद करा. सर्व भाज्या आणि फळं हवेशीर ठिकाणी ठेवा. फ्रिजच्या खाली जाड कापड आणि कागद घाला. आता फ्रिज डी-फ्रॉस्ट करा. यामुळे फ्रिजमधून बाहेर पडणारं पाणी पसरणार नाही.

फ्रीजला दुर्गंधी येत असेल तर एका भांड्यात बेकिंग सोडा किंवा लिंबाचा रस मिसळा, त्याने फ्रीजचा आतला भाग पुसून टाका.

फ्रीज साफ करण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. एका भांड्यात थोडं गरम पाणी घाला आणि त्यात मीठ घाला आणि कपड्याच्या साहाय्याने फ्रीज स्वच्छ करा.

फ्रीजमधील सर्व ट्रे बाहेर काढा आणि चांगले धुवा. कोरडे झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवा. लसूण कधीही फ्रिजमध्ये उघडा ठेवू नका. त्याचा वास फ्रीजमध्ये पसरतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com