लग्नानंतर काही वर्षांनी जोडीदारासोबतचं आयुष्य बोरिंग झालंय?, दूरावा दूर करण्यासाठी टिप्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लग्नानंतर काही वर्षांनी जोडीदारासोबतचं आयुष्य बोरिंग झालंय?, दूरावा दूर करण्यासाठी टिप्स

लग्नानंतर काही वर्षांनी जोडीदारासोबतचं आयुष्य बोरिंग झालंय?, दूरावा दूर करण्यासाठी टिप्स

नात्याच्या सुरुवातीला सर्वच जोडपी एकमेकांच्या भावनांची काळजी घेत असतात. परंतु कालांतराने या भावना कमी होऊ लागतात. एका ठराविक वयानंतर दोघेही घराशी संबंधित जबाबदाऱ्या पार पाडत असतात आणि त्यामुळे नात्याला वेळ न देता आल्याने संवाद कमी पडतो.

असे काही प्रसंग तुमच्यासोबतही घडत असतील तर तुमच्या वैवाहिक जीवनात पुन्हा रंग भरण्यासाठी या 6 टिप्स फॉलो करु शकता. कदाचित तुमचं भांडण वाद संपून एक नवी सुरुवात करायला तुम्हाला मदत होईल. जेणेकरुन नात्यातील पहिल्या दिवसाप्रमाणे प्रेम टिकवून ठेवण्यासाठी या टिप्सचा वापर करु शकता.

हेही वाचा: Travel : विकेंडसाठी परफेक्ट डेस्टीनेशन आहेत महाराष्ट्रातली 'ही' ठिकाणे

रोमँटिक आठवणी ताज्या करा

तुमच्या कंटाळवाण्या वैवाहिक जीवनात रंग भरण्यासाठी तुम्ही काही जुन्या आठवणी ताज्या करु शकता. आयुष्यातील काही रोमँटिक सोनेरी क्षण लक्षात आणून ते जोडीदारासोबत शेअर करू शकता. तुमच्या पहिल्या भेटीपासून ते तुमच्या रोमँटिक डेटपर्यंत तुम्ही कसा प्रवास केला यावर चर्चा करु शकता. हे सांगताना मात्र जोडीदाराला तुम्ही अजूनही या प्रेमळ क्षणांची वाट पाहत आहात आणि तुमच्या हृदयात यासाठी एक विशेष स्थान आहे, याची जाणीव करुन द्या.

आपल्या जोडीदाराची लाज बाळगू नका

घरच्या निर्णयांपासून, रोमान्स, प्रेमापर्यंत सर्वकाही जोडीदाराच्या सोबत त्याच्या साथीने करा. यामुळे तुमच्यातील विश्वास दृढ होईल. यातील कोणत्याही गोष्टीची लाज न बाळगता जोडीदारासोबत नेहमी राहा. आपल्या कल्पना आणि भावना एकमेकांशी शेअर करण्यासाठी संकोच करू नका.

छोट्या गोष्टींनी मूड खराब करू नका

सुखी वैवाहिक जीवनासाठी कोणत्याही जोडप्याने एकमेकांना चांगल्या आणि वाईट दोन्ही सवयींसह स्वीकारणे महत्वाचे असते. जर तुम्ही एका गोष्टीत चांगले असाल तर तुमचा जोडीदार दुसऱ्या गोष्टीत चांगला असेल तर दोघांनी एकमेकांना साभांळून घेऊन संसार करायला हवा. जोडीदाराने चूक केल्यानंतर त्याला ओरडण्या किंवा राग दाखवण्याऐवजी प्रेमाने समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही स्वतः चुका करतात तेव्हा त्यांची माफी मागा. कारण आयुष्याची गाडी चालवण्यासाठी तुम्हा दोघांना एकमेकांच्या ताकदीची गरज आहे.

हेही वाचा: पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! कास पठारावरील फुलांचा हंगाम 10 सप्टेंबरपासून सुरू

जोडीदाराचे वेळोवेळी कौतुक करा

कधीकधी भागीदाराचे शब्द किंवा त्याची एखाद यश याचे कौतुक करा. कधीतरी त्याने केलेल्या जेवणाची प्रशंसा करा. यामुळे तुमचे नाते मजबूत होईल आणि नात्यातील प्रेमही वाढेल.

सुट्टीची नियोजन करा

आयुष्यात पूर्वीप्रमाणे रंग भरण्यासाठी तुम्ही जोडीदारासोबत एखाद्या ट्रीपचा प्लॅनही करू शकता. कामामुळे जोडीदाराला वेळ देता येत नसेल, तर काही दिवस कामातून सुट्टी काढून फिरायला किंवा पर्यटनाला जा. यामुळे तुम्ही जोडीदारासोबत मानसिक आणि भावनिकरित्या जोडले जाल आणि तुमचे नाते आणखी मजबूत करण्यास मदत होईल.

समुपदेशकाची मदत घ्या

अनेक वेळा आपण स्वतः आपल्या वैवाहिक जीवनातील समस्यांवर मात करू शकत नाही किंवा वैवाहिक जीवनातील कंटाळा दूर करू शकत नाही. या समस्येवर स्वतःहून तोडगा काढू शकत नाही, असे जर तुम्हाला वाटेल तर तुम्ही तर रिलेशनशिप कौन्सिलरची मदत घेणे कधीही योग्य ठरेल.

हेही वाचा: Relationship Tips: तुमच्या नात्यातही पडलाय का? कम्युनिकेशन गॅप ; मग या टिप्स नक्की वाचा

Web Title: Relation Tips After Five Year Marriage Boring Love Life How To Solve

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..