आठवड्यातील 'या' दिवशी नखे का कापली जात नाही, जाणून घ्या कारण

ज्योतिष शास्त्रानुसार आठवड्याच्या वेगवेगळ्या दिवशी नखे कापण्याचे काय फायदे आणि तोटे आहेत, ते जाणून घेऊया.
nail cutting
nail cuttingsakal

हिंदू धर्मात अशा अनेक जुन्या रुढी परंपरा आहेत, ज्या आजही लोक डोळे झाकून पाळतात. या रुढी परंपरेत नखे कापण्याच्या दिवसासंबंधी एक मान्यता आहे. मंगळवार आणि गुरुवारी केस आणि नखे कापू नयेत असे अनेकदा आपण आणि तुम्ही ऐकले असेल. मात्र यामागील नेमकं कारण काय? त्याची धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे आज आपण समजून घेणार आहोत.

nail cutting
आजचे पंचांग आणि दिनविशेष - 8 जुलै 2022

धार्मिक कारणे

यामागे अनेक धार्मिक कारणेही आहेत. असे मानले जाते की मंगळवार, शनिवार आणि गुरुवारी कोणी नखे किंवा केस कापले तर देवाचा कोप होतो. मान्यतेनुसार शनिवारी नखे कापल्याने आयुष्य कमी होते. गुरुवारी नखे कापल्याने शिक्षणाशी संबंधित समस्या येतात. मंगळवारी नखे कापल्याने रक्ताशी संबंधित आजार होतात. म्हणूनच या दिवसात नखे कापण्यास मनाई केली जाते. आठवड्याच्या उर्वरित दिवसांमध्ये नखे कापल्याचा कोणताही त्रास होत नाही.

वैज्ञानिक कारण

जर आपण वैज्ञानिक कारणाबद्दल बोललो, तर मंगळवार, शनिवार आणि गुरुवारी विश्वातून येणाऱ्या अनेक प्रकारच्या ऊर्जेचा मानवी शरीराच्या संवेदनशील भागांवर विशेष प्रभाव पडतो. त्यामुळे या दिवसात नखे कापू नयेत असा सल्ला दिला जातो.

nail cutting
बंधूभेटीच्या सोहळ्याने गहिवरला भक्तिसागर

ज्योतिष शास्त्रानुसार आठवड्याच्या वेगवेगळ्या दिवशी नखे कापण्याचे काय फायदे आणि तोटे आहेत, ते जाणून घेऊया.

सोमवार

जर तुम्ही सोमवारी नखे कापली तर तुम्ही शारीरिकदृष्ट्या निरोगी राहाल आणि मूड देखील चांगला राहतो.

मंगळवार

मंगळवारी नखे कापल्याने कर्जाच्या समस्या दूर होतात आणि डोक्यावरून कर्जाचे ओझे दूर होते.

बुधवार

या दिवशी नखे कापल्याने नोकरीत प्रगतीसोबतच धनसुद्धा प्राप्त होते.

nail cutting
तुका म्हणे धावा, आहे पंढरी विसावा

गुरुवार

या दिवशी नखे कापल्यास घरातील प्रतिकूल आणि अशुभ घटना दूर होतात.

शुक्रवार

जर तुम्ही या दिवशी नखे कापली तर तुम्हाला जवळचे मित्र किंवा कुटुंबीयांना भेटण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागेल.

शनिवार

शनिवारी नखे कधीही कापू नयेत. मानसिक आरोग्य कमजोर होते.

रविवार

रविवारी नखे कापल्यास कामात अडथळा येतो आणि तुमचा वेळही वाया जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com