Resolution 2023 : उज्वल भविष्यासाठी 2023 मध्ये कराव्यात अशा 23 गोष्टी; प्रभू गौरांगा दास यांचा सल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Resolution 2023

Resolution 2023 : उज्वल भविष्यासाठी 2023 मध्ये कराव्यात अशा 23 गोष्टी; प्रभू गौरांगा दास यांचा सल्ला

Resolution 2023 : 2023 लवकरच येतं आहे, अनेकांनी नवीन वर्षात मी या गोष्टी करेल असा निश्चय केला असेलच, अशातच प्रभू गौरंगा दास यांनी 2023 साठी आपल्या चांगल्या आणि उज्वल भविष्यासाठी 23 गोष्टी सांगितल्या आहेत.

कोण आहेत नक्की प्रभू गौरंगा दास ?

प्रभू गौरंगा दास हे इस्काॅन मंदिराचे एक पुजारी आहेत. त्याच बरोबरीने ते आपल्या अध्यात्मिक आणि प्रेरणादायी वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. ते एक IIT ईंजिनियर होते आणि इस्काॅन मंदिरात आपली सेवा सुरू करण्याआधी ते किर्लोस्कर कंपनीमध्ये कामाला देखील होते. प्रभू गौरंगा दास हे तरुणांसाठी नेतृत्व सल्लागार, कॉर्पोरेट कोच, प्रेरणादायी वक्ता, समाजसुधारक, स्पिरीच्युअल लीडर, शिक्षक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत.

हेही वाचा: Mens Bracelets Fashion : मुलींमध्ये सर्वात जास्त चर्चा असलेले मेन्स ब्रेसलेट!

त्यांनी आपल्या इंस्टाग्रामवरुन या 23 गोष्टी फॉलो करण्याचा सल्ला दिला आहे

1. आपल्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या

2. कोणतीही गोष्ट ऐकतांना आधी ती समजून घ्या.

3. रोज भगवद्गीता वाचा.

4. मनात कोणाबद्दलही अढी ठेवू नका.

5. आपल्या पालकांशी मनात सुरू असलेल्या गोष्टींबद्दल चर्चा करा.

हेही वाचा: Heart And Covid-19 : कोरोना व्हॅक्सिन अन् हार्ट अटॅकचा काय संबंध? वाचा काय सांगतात रिपोर्ट्स

6. कोणताही संकोच न करता मदत मागा.

7. आपल्या जोडीदाराच्या यशात सहभागी व्हा.

8. वाईट प्रसंग आलेच तर त्यांना शांततेने आणि संयमाने सामोरं जा.

9. चांगल्या प्रसंगात, यशात डोक्यात हवा जाऊ देऊ नका.

10. आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगले असणारे जेवण जेवा.

हेही वाचा: Heart Care : फिटनेस प्रेमींनो सावधान! प्री वर्कआऊट सप्लीमेंट ठरू शकतात हार्ट अ‍ॅटॅकच कारणं

11. कोणत्याही नवीन व्यक्तीला भेटलात की त्यातल्या चांगल्या गोष्टी हेरा, त्या आत्मसात करण्याचा प्रयत्न करा.

12. सकाळी उठल्यावर किमान 10 मिनीट ध्यान लावा.

13. स्वतःच्या विषयी आशावादी अप्रोच ठेवा.

14. सगळ्यांशी शांततेने आणि संयमाने बोला.

15. वेळोवेळी कृतज्ञता व्यक्त करा.

हेही वाचा: Coffee Recipe : घरच्या घरी कशी तयार कराल कॅफे स्टाइल कॉफी ?

16. आपला वेळ योग्य गोष्टीत इन्वेस्ट करा.

17. मोबाइल कमी वापरा, त्यापेक्षा निसर्गाच्या सानिध्यात बसा.

18. उगाचच आपल्या अपेक्षा वाढवू नका कारण जितक्या कमी अपेक्षा तितका त्रास कमी.

19. नियमित व्यायाम करा.

20. आपल्या विचारांवर ठाम रहा.

21. श्री कृष्णाच्या बद्दल आणखीन गोष्टी ऐका

22. श्री कृष्णाची महिमा अनुभवा.

23. श्री कृष्णाबद्दल लोकांना सांगा.