Veg Non Veg Rate Report : व्हेज की नॉन व्हेज, यापैकी कोणती थाळी महागली?

एका अहवालानुसार, टोमॅटोच्या किमतीत वाढ झाल्यामुळे ऑगस्टमध्ये शाकाहारी थाळीच्या किमतीत तब्बल 24 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Veg Non Veg Rate Report
Veg Non Veg Rate Reportesakal

Veg Non Veg Rate Report : मार्केटमधील जेवणाच्या थाळीच्या किंमती भाजीपाल्याच्या किंमतीनुसार कमी जास्त होत असतात. मागल्या काही दिवसांपासून टोमॅटोच्या दरांनी उच्चांक गाठला होता. एका अहवालानुसार, टोमॅटोच्या किमतीत वाढ झाल्यामुळे ऑगस्टमध्ये शाकाहारी थाळीच्या किमतीत तब्बल 24 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

जुलैच्या महिन्याच्या तुलनेत मात्र आता खर्चात थोडी घट झालीय, असे क्रिसिल मार्केट इंटेलिजन्स आणि अॅनालिटिक्स मासिक ‘रोटी राइस रेट’ अहवालात गुरुवारी सांगण्यात आले.

ऑगस्टमध्ये, यंदाच्या आर्थिक वर्षात दुसर्‍यांदा टोमॅटोच्या किमती स्थिरावल्यामुळे शाकाहारी थाळीच्या किमतीत महिन्या-दर-महिन्याने किरकोळ घट झाली.

वर्षानुवर्षे नॉन व्हेज थाळीची किंमत १३ टक्क्यांनी वाढली

शाकाहारी थाळीच्या किमतीत झालेल्या 24 टक्क्यांपैकी 21 टक्के वाढीस केवळ टोमॅटोची किंमत कारणीभूत ठरली, जी वर्षभरात 176 टक्क्यांनी वाढून ऑगस्टमध्ये 102 रुपये प्रति किलो झाली होती. गेल्या वर्षी याच महिन्यात टोमॅटोचे दर 37 रुपये किलो होते , अहवालात म्हटले आहे.

अहवालानुसार, मांसाहारी थाळीसाठी ही वाढ कमी होती कारण नॉनव्हेजसाठी लागणाऱ्या ब्रॉयलरच्या किमती वर्षानुवर्षे केवळ 1-3 टक्क्यांनी वाढल्याचा अंदाज आहे.

Veg Non Veg Rate Report
Tomato Rates Fall: टोमॅटोच्या क्रेट्‌सला 80 रुपये दर! शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकले टोमॅटो

वर्षापूर्वीच्या तुलनेत ऑगस्टमध्ये व्हेजिटेबल ऑइलच्या किमतीत 17 टक्के आणि बटाट्याच्या किमतीत 14 टक्क्यांनी घट झाल्याने दोन्ही थाळींच्या किमती काही प्रमाणात कमी झाल्या आहेत.

अहवालात असे म्हटले आहे की, सप्टेंबरमध्ये थाळीच्या किमती कमी होऊ शकतात. कारण टोमॅटोच्या किंमतीत महिन्या दर महिन्याला घट होताना दिसत असून आता हे दर 51 रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

तसेच, 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत, जी ऑगस्टमध्ये 1,103 रुपये होती ती सप्टेंबरपासून 903 रुपयांवर आली आहे, यामुळे ग्राहकांना अधिक दिलासा मिळू शकेल, असेही या अहवालात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com