Shopping Sites | या साइट्सवर मिळेल फ्लिपकार्टपेक्षाही स्वस्त सामान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shopping Sites

Shopping Sites : या साइट्सवर मिळेल फ्लिपकार्टपेक्षाही स्वस्त सामान

मुंबई : जेव्हा आपल्याला कोणतीही वस्तू खरेदी करायची असते तेव्हा आपण सहसा फ्लिपकार्ट किंवा अॅमेझॉनचा अवलंब करतो. परंतु अशा काही साइट्स आहेत जेथे त्यापेक्षा स्वस्त सामग्री देतात.

सरकारी ई मार्केटप्लेस (GEM) -

सरकारने सुरू केलेल्या या बाजारातून तुम्ही कोणताही माल खरेदी करू शकता. हा तुमच्यासाठी खूप फायदेशीर व्यवहार असू शकतो. एका सर्वेक्षणातून असे समोर आले आहे की, येथे मिळणारे उत्पादन इतर ई-कॉमर्स साइटवर मिळणाऱ्या वस्तूंच्या तुलनेत खूपच स्वस्त आहेत.

सरकारी पोर्टल असूनही, येथे तुम्हाला होम डिलिव्हरीचा पर्याय दिला जात आहे. म्हणजेच येथून कोणताही माल खरेदी केल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. (Shopping Sites ) हेही वाचा - जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

हेही वाचा: Marriage Shopping : लग्नासाठी पोशाख खरेदी करताना या गोष्टी लक्षात घ्या

इंडियामार्ट -

IndiaMART देखील तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. विशेषत: त्या लोकांसाठी ज्यांना सर्व काही घाऊक किंमतीत खरेदी करायचे आहे. या साइटचे वैशिष्ट्य म्हणजे येथे मिळणारी प्रत्येक वस्तू थेट उत्पादन युनिटमधून खरेदी करता येते.

म्हणजे कोणीही मध्यस्थी नसतो. तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही वस्तूसाठी, तुम्ही थेट निर्मात्याशी व्यवहार करू शकता. यामुळेच येथे उपलब्ध असलेली प्रत्येक गोष्ट अत्यंत स्वस्तात मिळते.

हेही वाचा: Whats App : आता व्हॉट्सअॅपमधून घरबसल्या करता येणार खरेदी; कार्डने होणार पेमेंट

स्नॅपडील -

स्नॅपडीलवरूनही तुम्ही स्वस्त वस्तू सहज खरेदी करू शकता. येथे तुम्ही साईटवरून आयफोन आणि गिझर अगदी स्वस्तात खरेदी करू शकता. येथून तुम्हाला आयफोन बॅक कव्हर खूप स्वस्त मिळेल. याशिवाय येथे तुम्हाला गारमेंट्स देखील मिळतात. तुम्हाला नवीन वर्षात टी-शर्ट किंवा शर्ट घ्यायचा असेल, तर तुम्ही ते अगदी स्वस्तात मिळवू शकता.