Shravan 2024 :  यंदाचा श्रावण आहे खास, ७२ वर्षांनंतर घडतोय असा संयोग, पहिल्या दिवशी अशी करा महादेवांची पूजा

Shravan 2024 : श्रावण समाप्तीही सोमवारीच होणार आहे. त्यामुळे यंदाच्या श्रावणात पाच सोमवार आले आहेत. हेही एक वैशिष्ट्य मानले जात आहे.
Shravan 2024
Shravan 2024 esakal
Updated on

Shravan 2024 :  

भगवान शंकरांचे भक्त ज्या दिवसांची वाट पाहत असतात. तो श्रावण महिना लवकरच सुरू होणार आहे. उत्तर भारतात श्रावणाला सुरूवात झाली असून आपल्याकडे ५ ऑगस्ट रोजी श्रावण महिन्याला सुरूवात होणार आहे.

यंदाचा श्रावण महिना खास आहे. या श्रावणात काहीतरी खास संयोग जुळून येणार आहेत. जे आपल्याला अधिक फलप्राप्ती करून देणारे ठरणार आहेत. कारण, यंदा श्रावणाची सुरूवात सोमवारने होणार आहे.

श्रावण समाप्तीही सोमवारीच होणार आहे. त्यामुळे यंदाच्या श्रावणात पाच सोमवार आले आहेत. हेही एक वैशिष्ट्य मानले जात आहे. कारण, १८ वर्षानंतर श्रावणात पाच सोमवार येण्याचा योग जुळून आला आहे.

Shravan 2024
Shravan 2024 : श्रावणमासासाठी नाशिक ग्रामीण पोलिस सज्ज; भाविकांना दक्षता घेण्याचे आवाहन

कधी आहेत सोमवार

  • पहिला सोमवार – ५ ऑगस्ट

  • दुसरा सोमवार – १२ ऑगस्ट

  • तिसरा सोमवार – १९ ऑगस्ट

  • चौथा सोमवार – २६ ऑगस्ट

  • पाचवा सोमवार – २ सप्टेंबर (Shravan 2024)

Shravan 2024
Shravan Kumar : आईला घेऊन जगभ्रमंतीला निघालेला आधुनिक श्रावणबाळ थेरगावत दाखल

श्रावणात ७२ वर्षांनी आलेला योगायोग काय आहे

श्रावणाची सुरूवात सोमवारी होणं हे शुभ मानलं जात आहे. कारण, भगवान शंकरांचा वार सोमवार आहे. तर ७२ वर्षांपूर्वी म्हणजे १० ऑगस्ट १९५३ मध्ये श्रावणाची सुरूवात सोमवारी झाली होती. आता इतक्य वर्षांनी हा योग जुळून आला आहे,त्यामुळे हे शुभ मानले जात आहे.

Shravan 2024
Last Shravan Somvar 2023 : मंचर येथे पांडवकालीन तमनेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा

पहिल्या सोमवारी या मुहूर्तावर करा भगवान शंकरांची पूजा

  • अमृत मुहूर्त – सकाळी ५ वाजून ३७ मिनिटांपासून सकाळी ७ वाजून २० मिनिटांपर्यंत

  • शुभ मुहूर्त – सकाळी ९ वाजून २ मिनिटांपासून सकाळी १० वाजून ४५ मिनिटांपर्यंत

  • सायंकाळी पूजेचा मुहूर्त – सायंकाली ५ वाजून ३५ मिनिटांपासून रात्री ८ वाजून ३५ मिनिटांपर्यंत

Shravan 2024
Shravan Somvar : आज शेवटच्या श्रावण सोमवारला जुळून येतोय खास योग, महादेवाला प्रसन्न करण्यासाठी करा खास उपाय

अशी करा महादेवांची पूजा

श्रावणातील प्रत्येक सोमवारी उपवास करा. सकाळी उठून स्नानादी कर्मे आटोपून देवासमोर बसा. शिवलिंगाला समोर घेऊन त्यावर जल आणि बेलपात्र वहा. त्यानंतर शिवलिंगाला फळं, पांढऱ्या रंगाची फुले वाहा.

त्यानंतर शिवलिंगाला अगरबत्ती आणि कर्पूरारती करा. त्यानंतर शांत मनाने हात जोडून शिव मंत्राचा जप करा. पूजेनंतर दिवसभर उपवास करून फराळ करा.

Shravan 2024
Shravan 2024 :  पुर्वतयारी श्रावणाची! साबुदाण्याच्या पिठापासून बनतात चविष्ट लाडू, पण साबुदाण्याचे पिठ कसे बनवायचे जाणून घ्या

श्रावणात आहेत इतके शुभ दिवस

श्रावणात नागपंचमी,रक्षाबंधन,विनायक चतुर्थी,संकष्टी चतुर्थी, शीतला सप्तमी, दुर्गाष्टमी आणि कालाष्टमी, श्रीयाळ षष्ठी असे सण आहेत. त्यामुळे हा महिना सण-समारंभांनी भरलेला असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com