Skin Care : कार चालवतानाही तुमची स्किन सुरक्षित नाही, जाणून घ्या उपाय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Skin Care

Skin Care : कार चालवतानाही तुमची स्किन सुरक्षित नाही, जाणून घ्या उपाय

तुम्ही तुमच्या सनस्क्रिन विषयी सजग असणे ही चांगली गोष्ट आहे. फक्त चेहऱ्यावरच नाही तर सनस्क्रिन हात आणि शरीराच्या इतर उघड्या भागावरही लावावे. आपण टॅनिंगसाठी उन्हाला कारणीभूत ठरवतो. पण प्रत्याक्षात इतर गोष्टींना दूर्लक्षित करतो. यात एक ड्राइव्हिंग आहे. कारमध्ये बसून उन लागत नाही असे समजून सनस्क्रिन लावले जात नाही.

हेही वाचा: Skin Care Tips : या ५ गोष्टी करा त्वचा राहिल फुलांप्रमाणे नाजूक

किरणांचे अंतर समजा

कारच्या काचेच्या आत बसूनही टॅनिंग किंवा त्वचेच्या इतर समस्या होतात. यात दोन रेज असतात. एक यूव्हीए रेज आणि दूसरे यूव्हीबी रेज असतात. यूव्हीए रेज मुळे डार्क स्पॉट आणि एजिंग होते तर यूव्हीबी रेजमुळे टॅनिंग होते. यूव्हीबी रेज काचेच्या आत जाऊ शकत नसल्या तरी यूव्हीए रेज जाऊ शकतात.

हेही वाचा: Skin Care : सौंदर्याच्या आड येतायेत चेहऱ्यावरचे अन्वाँटेड केस? ट्राय करा 'या' उपाय

विंडो फिल्टर

तुम्ही विंडोवर यूव्ही फिल्टर लावू शकतात पण त्यामुळेही पूर्ण संरक्षण मिळत नाही. तुम्ही साईड विंडोपासून वाचाल पण समोरच्या काचेतून येणाऱ्या किरणांनी स्किन डॅमेज होऊ शकते.

हेही वाचा: Skin Care : स्कीन ब्राइटनिंगसाठी बटाट्याच्या सालीच्या 'या' टिप्स फॉलो करा

सनस्क्रिन कसे निवडावे

सनस्क्रिन स्किनला सूट होणारे निवडावे. एसपीएफची काळजी घ्यावी. जेवढे हाय तेवढे चांगले. निवडताना एक्सपर्टचा सल्ला घ्या.

Web Title: Skin Care Sun Burn During Car Driving Use These Tips

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Beauty Tipsfacial tanning