Skin Care Tips :  चेहऱ्यावर बॉडी लोशन लावताय?आजच बंद करा नाहीतर पश्चाताप होईल!

बॉडी लोशन चेहऱ्यावर लावण्याचे दुष्परिणाम तूम्हाला माहिती आहे का?
Skin Care Tips
Skin Care Tipsesakal

हिवाळ्यात सर्वात जास्त त्रास हा आपल्या त्वचेला होतो. त्वचेतील आद्रता कमी झाल्याने त्वचा कोरडी आणि निर्जीव होते. त्यामूळे हिवाळ्यातही लोक शरीरावर तसेच चेहऱ्यावर विविध प्रकारचे बॉडी लोशन वापरतात. पण बॉडी लोशन चेहऱ्यावर लावण्याचे दुष्परिणाम तूम्हाला माहिती आहे का?

नाही ना?,  तुम्हीही चेहऱ्यावर बॉडी लोशन लावत असाल तर आजपासूनच बंद करा. कारण, चेहऱ्याला बॉडी लोशन लावणे महागात पडू शकते. लोक चेहरा आणि शरीरावरील इतर त्वचेला एकसारखेच मानून बॉडी लोशन चेहऱ्याला लावतात. पण, असे करणे धोकादायक ठरू शकते.

Skin Care Tips
Winter Recipe: हिवाळ्यात खायला पौष्टिक असणारं मेथीच्या भाजीच्या पिठलं कस तयार करायचं?

चेहऱ्यावर बॉडी लोशन लावणे बंद केल्याने तुम्ही त्वचेच्या अनेक समस्या टाळू शकता. मग, चेहऱ्याला काय लावणे योग्य ठरेल याबद्दल जाणून घेऊयात.

Skin Care Tips
Winter Skin Care : हिवाळ्यातही आलियासारखी स्कीन हवीये? हे करा

चेहऱ्याच्या समस्या

बॉडी लोशनची पीएच पातळी खूप जास्त असते. अशा परिस्थितीत चेहऱ्याची त्वचा बॉडी लोशन पूर्णपणे शोषण्यास सक्षम नसते. त्यामुळे चेहऱ्यावरील त्वचेचे छिद्र बंद होतात आणि तुमच्या चेहऱ्यावर अनेक समस्या दिसू लागतात.

Skin Care Tips
Hair Care Tips : केसांच्या वाढीसाठी तेल लावून उपयोग नाही; हे सुपर फुड खा आणि कमाल बघा!

ब्लॅकहेड्स  वाढतात

बॉडी लोशन लावल्याने चेहऱ्यावरील चेहऱ्यावरील छिद्रे ब्लॉक होतात. त्यामुळे छिद्रांमध्ये घाण साचते आणि चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स येऊ लागतात. त्यामूळे चेहरा निस्तेज दिसू लागतो.

Skin Care Tips
Face Bleach : चेहरा काळवंडलाय? घरीच करा १० रुपयांत नॅचरल ब्लीच

त्वचा अधिकच कोरडी होते

चेहऱ्यावर बॉडी लोशन लावल्याने त्वचेवर ट्रायक्लोसन कंपाऊंड वाढू लागते. त्यामुळे चेहऱ्याचे नैसर्गिक तेल संपून त्वचा कोरडी पडू लागते. अशावेळी चेहऱ्यावर बॉडी लोशनचा वापर केल्याने त्वचा कोरडी पडते.

Skin Care Tips
Face Care Tips: आलियासारखा चमकदार अन् टवटवीत चेहरा हवा असेल तर करा हा एक उपाय

त्वचेच्या पेशी खराब होतात

बॉडी लोशनची पीएच पातळी खूप जास्त असते. त्यामुळे बॉडी लोशन लावल्याने त्वचेची आद्रता कमी होऊ लागते. त्वचेमधील खराब झालेल्या पेशींमध्ये वाढ होते आणि तुमच्या चेहऱ्यावरील त्वचा फुटते.

Skin Care Tips
Face Care : चेहऱ्यावर वांग किंवा डाग दूर करायचेय? असा करा तुरटीचा वापर

चेहरा निस्तेज दिसतो

हिवाळ्यात त्वचा जास्त निस्तेज दिसते.त्यावर बॉडी लोशन लावल्याने चेहऱ्याच्या त्वचेमध्ये अमीनो अॅसिड आणि क्षारचे प्रमाण कमी होते. ज्यामुळे तुमचा चेहरा निस्तेज आणि निर्जीव दिसतो.

Skin Care Tips
Beauty Tips For Face: दिवसेंदिवस चेहरा काळवंडतोय? तज्ज्ञ सांगतात उपाय...

बॉडी लोशन नाही तर हे लावा

घरात असलेले तूप, साय हे चेहऱ्याला लावण्याचे अनेक फायदे आहेत. कारण, या गोष्टी सहज उपलब्ध होतात आणि त्यामूळे त्वचा मुलायम राहते. तसेच, आठवड्यातून दोनवेळा चेहऱ्याला स्टीम घेणे फायद्याचे ठरू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com