Skin Cleaning Tips : नारळाचं तेल लावा अन् शरीरावरील ‘ती’ काळी कुळकुळीत जागा गोरीपान करा!

खोबरेल तेल त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे
Skin Cleaning Tips
Skin Cleaning Tipsesakal

Elbow Cleaning Tips : मानवी शरीराची स्वच्छता रोजच करावी लागते. एखाद्या दिवशी जरी घाईत अंघोळ केली. किंवा अंघोळीला सुट्टी दिली. तरी अंगावर घामाचा थर बसतो. शरीराची बाह्य स्वच्छता केली तरी आपल्या शरीराचे अनेक भाग अस्वच्छच राहतात. लोक त्वचेबाबत खूप जागरूक असतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धती वापरतात, परंतु अनेक वेळा लोक त्यांच्या कोपर आणि गुडघ्यांची काळजी घेऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यात काळेपणा राहतो.

आज आपण हाताचे कोपर आणि गुढग्याबद्दल बोलत आहोत. जर तुम्ही शॉर्ट्स किंवा टी-शर्ट घातलात तर तुमच्या कोपर आणि गुडघ्यांच्या काळ्या रंगामुळे तुमचा लूक देखील खराब होऊ शकतो. अनेक वेळा, यामुळे, तुम्हाला खूप पेच सहन करावा लागतो. अशा स्थितीत तुम्ही तुमचे कोपर आणि गुडघे स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी खोबरेल तेल खूप फायदेशीर आहे.

खोबरेल तेल त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्यात व्हिटॅमिन ई आढळते, जे त्वचेचा टोन हलका करते. खराब झालेली त्वचा दुरुस्त करण्यासोबतच ती चमकदार बनवते. चला, आज आम्ही तुम्हाला खोबरेल तेलाचा वापर कसा करायचा ते सांगणार आहोत जेणेकरून कोपर आणि गुडघ्यांचा काळेपणा दूर होईल.

Skin Cleaning Tips
Skin Infection : उन्हाळ्यात होणाऱ्या त्वचाविकारांसाठी घरगुती उपाय

सहसा जेव्हा सौंदर्याचा प्रश्न येतो तेव्हा आपण चेहऱ्यासाठी मेहनत करतो. चेहऱ्याशी संबंधित प्रत्येक समस्येकडे आपण दुर्लक्ष करत नाही. मात्र, सौंदर्य म्हणजे केवळ चेहरा नसून त्यासोबत शरीराचे इतर भागही महत्त्वाचे आहेत. त्वचेवर टॅनिंगची समस्या खूप सामान्य आहे आणि ही समस्या तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागाच्या त्वचेवर होऊ शकते.

सामान्यतः असे दिसून येते की त्वचेच्या त्या भागावर टॅनिंगची समस्या जास्त असते ज्याकडे आपण लक्ष देऊ शकत नाही. आपल्यापैकी बरेच जण आपल्या गुडघ्यावरील टॅनिंगच्या समस्येबद्दल तक्रार करतात. अनेकदा हाताचे कोपरेही काळे दिसतात.

Skin Cleaning Tips
डोळ्यांना बर्फ लावण्याने काय फायदा होतो? Skin Care

खोबरेल तेलाने मसाज करा

खोबरेल तेलाचा वापर अनेक प्रकारे करता येतो. आंघोळ केल्यावर लगेच खोबरेल तेलाने कोपर आणि गुडघ्यांना मसाज करू शकता. हे दिवसातून 2 ते 3 वेळा करा. सुमारे 10 ते 15 मिनिटे मसाज करा. लक्षात ठेवा नारळाचे तेल पूर्णपणे कोरडे होईपर्यंत 10 ते 15 मिनिटे मालिश करावी.

खोबरेल तेल आणि लिंबू

खोबरेल तेलात लिंबाचे काही थेंब टाकून गुडघे आणि कोपरांवर लावल्याने काळपटपणा दूर होतो. हे देखील दिवसातून किमान 3 वेळा करा. कोपर आणि गुडघ्यांचा काळेपणा दूर करण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे.

Skin Cleaning Tips
काळे डाग दूर करण्यासाठी वापरा हे तेल, सोपा घरगुती उपाय! Skin Care

नारळाचे तेल आणि अक्रोडाची टरफले

नारळाच्या तेलात अक्रोडाच्या टरफल्याची पावडर मिसळून ते लावल्याने गुडघे आणि कोपरांचा काळेपणा दूर होतो. नारळाच्या तेलात अक्रोड पावडर चांगले मिसळा, त्यानंतर कोपर आणि गुडघ्यांवर चांगले मसाज करा. दिवसातून 3 ते 4 वेळा नख लावा. यामुळे काही दिवस काळेपणा दूर होईल.

Skin Cleaning Tips
Dark Knees and Elbows: तुमचे कोपर आणि गुडघे काळवंडले आहेत, मग या ट्रीक्स वापरून Black Spots होतील दूर

दही

दहीमध्ये लैक्टिक अॅसिड असते. जे त्वचेचा रंग हलका करण्यास मदत करते. याशिवाय, ते त्वचेला मॉइश्चरायझिंग करण्यास मदत करते. आपण थेट कोपर आणि गुडघ्यांवर दही वापरू शकता. थोडा वेळ दही ठेवा आणि नंतर पाण्याने धुवा.

संत्र्याची साल

कोपर आणि गुडघ्यांच्या काळेपणापासून मुक्त होण्यासाठी संत्र्याची साल खूप उपयुक्त आहे. यासाठी तुम्हाला संत्र्याच्या सालीची पावडर लागणार आहे. या पावडरमध्ये थोडे दूध आणि गुलाब पाणी घाला. ही पेस्ट काळ्या झालेल्या भागावर लावा आणि काही वेळाने पाण्याने धुवा.

बटाटा

कोपर आणि गुडघ्यांचा काळेपणा दूर करण्यासाठी बटाटा खूप फायदेशीर आहे. यासाठी तुम्हाला बटाट्याचा तुकडा कोपर आणि गुडघ्यांवर सुमारे 5 मिनिटे घासून नंतर पाण्याने धुवावा लागेल. हा उपाय दिवसातून दोनदा केल्यास नक्कीच फायदा दिसून येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com