सनस्क्रीन, हेअर सिरम वापरताना काय सूट होते याचा विचार करून, तज्ज्ञांचा सल्ला घेऊन प्रॉडक्ट निवडावे

बऱ्याचदा आपल्या त्वचेसाठी, केसांसाठी योग्य प्रॉडक्ट न वापरल्याने त्वचा निस्तेज दिसते.
skincare and hair care
skincare and hair careEsakal

स्वप्ना साने

बऱ्याचदा आपल्या त्वचेसाठी, केसांसाठी योग्य प्रॉडक्ट न वापरल्याने त्वचा निस्तेज दिसते; केस ड्राय होतात किंवा अन्य समस्या उद्‍भवतात. त्यामुळे आपल्या त्वचेसाठी, केसांसाठी काय आवश्यक आहे, काय सूट होते याचा विचार करून, तज्ज्ञांचा सल्ला घेऊन प्रॉडक्ट निवडावे.

मी नियमितपणे तुमचे लेख वाचते. त्यात तुम्ही बऱ्याचदा म्हणता, की केसांना माइल्ड शाम्पू वापरावा. पण माइल्ड शाम्पू म्हणजे नेमके काय? कसे ओळखायचे?

माइल्ड आणि स्ट्राँग शाम्पूमधील फरक हा त्यांच्या फॉर्म्युलेशनमध्ये वापरलेल्या घटकांवरून ठरतो. शाम्पूमध्ये जितके अधिक सल्फेट आणि क्लिन्सिंग एजंट्स असतात, तसेच सिलिकॉन, पॅराबेन असतात, तेवढा तो शाम्पू स्ट्राँग असतो. अशा शाम्पूने हेअर वॉश केल्यानंतर केस जास्त कोरडे होतात. स्काल्पला खाज येऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे स्काल्प ड्राय झाला की तैल ग्रंथी जास्त सक्रिय होतात. त्यामुळे डोक्याची त्वचा आणि केस ऑइली होतात. केस सारखे ऑइली झाले की पुन्हापुन्हा शाम्पू केला जातो. अशाने स्काल्पची त्वचा आणि केस दोन्ही डॅमेज होण्याची शक्यता असते.

याउलट माइल्ड शाम्पूमध्ये एखादा क्लिन्सिंग एजंट असतो आणि हर्बल ॲक्टिव्ह असतात. बहुधा सल्फेट फ्री शाम्पू हे माइल्ड असतात आणि केसांना कंडिशनिंगही करतात, केस आणि स्काल्पची त्वचा ड्राय होऊ देत नाहीत. त्यामुळे शाम्पूची निवड करताना नेहमी त्यातील घटक काय आहेत ते वाचून नंतरच तो वापरावा.

मी नियमित सनस्क्रीन वापरते, पण ते वापरूनसुद्धा त्वचा टॅन झालीये. कामानिमित्त बाहेर फिरावे लागते, त्यामुळे त्वचा डॅमेज झाली आहे. काय उपाय करावा?

सर्वप्रथम हे लक्षात घ्यावे, की सनस्क्रीन लावले तरीही त्वचा टॅन होऊ शकते. कारण टॅन होणे ही त्वचेची सेल्फ प्रोटेक्शन प्रोसेस असते. त्वचेमधील मेलॅनिन त्वचेचे रक्षण करण्यासाठी असते. याच मेलॅनिनमुळे त्वचेला एक टोन अथवा कलर दिसतो. यूव्ही किरणांपासून रक्षण करण्यासाठी मेनॅनिनचा प्रभाव वाढव आणि त्यामुळे त्वचा डार्क किंवा टॅन होते.

टॅन झालेल्या त्वचेला रेग्युलर अँटी टॅन पॅक लावून टॅन कमी करता येते. काही घरगुती उपायही करता येतील. पपईचा गर लावून १५ मिनिटांनी धुऊन घ्यावा. किंवा बटाट्याचा कीस करून मुलतानी मातीमध्ये मिक्स करून पॅक करावा व तो चेहऱ्याला लावावा. किंवा आठवड्यातून एकदा कॉफी स्क्रब लावावा. साखर, कॉफी आणि कोकोनट ऑइल मिक्स करून हळुवार स्क्रब करावे, मृत त्वचा निघून जाते आणि टॅनही कमी झालेले जाणवेल.

याशिवाय, बाहेर जाताना हातमोजे घालावेत आणि स्कार्फ बांधावा, म्हणजे उन्हापासून थोडेफार प्रोटेक्शन मिळेल, टॅन कमी होईल. सनस्क्रीन जरूर लावावे. मेकअप करत असाल तर मेकअप करायच्या आधीदेखील सनस्क्रीन लावा आणि रेग्युलर क्लिनप आणि फेशियल करायला विसरू नका. होम मेड पॅक लावावा अथवा क्ले पॅक लावावा. आठवड्यातून एकदा बॉडी स्क्रब करावे. असे नियमित केल्यास टॅन कमी होईल, त्वचा हेल्दी दिसेल.

skincare and hair care
Skin Care :  लोकरीच्या उबदार कपड्यांमुळेही होते ऍलर्जी, अशी घ्या काळजी!

हेअर सिरम कधीकधी वापरावे? रोज वापरावे का?

केसांसाठी रोज सिरम वापरल्यास त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, असे हेअर एक्स्पर्ट सांगतात. त्यामुळे हेअर सिरम फक्त स्पेशल ऑकेजन अथवा आठवड्यातून एकदा केस धुतल्यानंतर लावावे. सिरम अतिरिक्त वापरल्यास केस गळणे, तुटणे किंवा जास्त ऑइली होणे अशा समस्या जाणवू शकतात.

सिरम लावताना वरपासून लावू नये. ओल्या केसांना दोन ते चार थेंब सिरम मिड लेंथपासून लावावे. सिरम ओल्या केसांमध्ये लगेच सामावून जाऊन केस मऊ आणि शायनी दिसतात. सिरमचा वापर सारखा करावा लागत असेल, तर ऑइल बेस्ड सिरम लावावे, तेही फक्त हेअर टिप्सना.

सिरम वापरायच्या आधी अजून एक गोष्ट लक्षात घ्यावी, ती म्हणजे तुमच्या केसांना खरेच सिरमची आवश्यकता आहे का? आवश्यकता असेल तरच सिरम लावावे. जर नैसर्गिकरित्याच तुमचे केस सॉफ्ट आणि सिल्की असतील तर तुम्हाला सिरमची गरज नाही.

skincare and hair care
Hair Care Tips : केस पातळ झाले आहेत का? मग, ‘या’ होममेड हेअरमास्कची घ्या मदत

मी नियमित सीटीएम - CTM रुटीन फॉलो करते, तरीही माझी त्वचा निस्तेज दिसते. माझे वय बत्तीस वर्षे आहे आणि आयटीमध्ये जॉब आहे. त्वचा बहुतांश वेळा नॉर्मल असते, पण कधीकधीच ड्राय होते. पिगमेन्टेशनही नाही, पण तरीही नॅचरल ग्लो दिसत नाही. काय करू?

सीटीएम म्हणजेच क्लिन्सिंग, टोनिंग आणि मॉइस्चरायझिंग करणे; हे त्वचेसाठी डेली केअर रुटीन आहे. तुमची त्वचा डल दिसतेय, म्हणजे एकतर रेग्युलर फेशियल करत नसाल किंवा जे प्रॉडक्ट तुम्ही वापरताय, त्याने पुरेशी नरीशमेंट मिळत नसावी.

त्वचेमधील तेल आणि ओलसरपणा यांचा समतोल बिघडला की त्वचा निस्तेज दिसते. त्वचेमध्ये पाण्याची कमतरता निर्माण झाली की त्वचा सॉफ्ट असली तरी डल दिसणार. त्वचेला पुरेसे हायड्रेशन मिळणे आवश्यक आहे.

त्यासाठी रेग्युलर हायड्रेटिंग फेशियल करावे. तुमच्या ब्यूटी थेरपिस्टला विचारून अथवा तज्ज्ञांचा सल्ला घेऊन चांगले स्किन केअर प्रॉडक्ट निवडावेत. नरीशिंग नाइट क्रीम आणि हायड्रेटिंग मॉइस्चरायझिंग फेस सिरम वापरावे.

तिशीनंतर त्वचेमध्ये बदल होत असतात. आयटीमधील जॉब म्हणजे सतत स्क्रीन समोर काम करणे आणि एसीमध्ये दिवसभर बसणे, त्यामुळे पाणी कमी प्यायले जाते. ह्या काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही सीटीएबरोबरच फेशियल करणे, हायड्रेटिंग प्रॉडक्ट वापरणे आणि पाणी भरपूर पिणे, हा बदल करून बघा, तुमची त्वचा नक्कीच ग्लो करेल.

निवेदन

थंडीत पायांना खूप भेगा पडतात, डोळ्यांखाली डार्क सर्कल्स तयार झाली आहेत, ओठ खूप फुटतात, कोंडा काही केल्या जात नाही... तुम्हालाही जाणवतात का अशा समस्या? त्यावर उपाय सापडत नाहीये? मग तुमचे प्रश्न आम्हाला पाठवा, आम्ही या सदरातून त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू.

saptahiksakal@esakal.com या ई-मेलवर तुमचे प्रश्न पाठवा. ई-मेलच्या विषयात ‘ब्यूटी केअर’ असा उल्लेख करायला आणि सोबत तुमचा फोन नंबर लिहायला विसरू नका.

skincare and hair care
Skincare Tips : वर्किंग वुमनने जरूर फॉलो कराव्यात ‘या’ स्किनकेअर टिप्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com