Skincare Mistakes: स्किनकेअर करताय पण त्वचेत काहीच फरक दिसत नाहीये; 'या' चुका असू शकतात कारण

Why Skincare Routine is Not Working: त्वचेसाठी स्किनकेअर करताय पण काही परिणाम दिसत नाही? या ५ चुका टाळा आणि तजेलदार त्वचा मिळवा!
Skincare Mistakes One Must Avoid
Skincare Mistakes One Must Avoidsakal
Updated on

थोडक्यात:

  1. रोजच्या सवयींमधील काही चुकीच्या गोष्टी स्किनकेअरचे परिणाम कमी करतात.

  2. महागडे प्रॉडक्ट्स वापरूनही अपेक्षित ग्लो न मिळण्यामागे या चुका कारणीभूत असतात.

  3. या ५ सामान्य स्किनकेअर चुका ओळखून उपाय केल्यास त्वचा निरोगी व उजळ दिसू शकते.

Common Skincare Mistakes to Avoid: आपली त्वचा निरोगी, तजेलदार आणि स्वच्छ दिसावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. पण रोजच्या सवयींमध्ये काही अशा गोष्टी नकळत होत असतात ज्या तुमच्या स्किनकेअरच्या परिणामांवर पाणी फेरू शकतात.

कितीही महागडे प्रॉडक्ट्स वापरले, योग्य स्किनकेअर केल तरी त्या चुका दुरुस्त केल्याशिवाय त्वचेचा खरा ग्लो दिसत नाही. जर तुम्हालाही वाटत असेल की तुम्ही योग्य स्किनकेअर करूनही त्वचेत काहीच फरक दिसत नाहीये, तर या ५ सामान्य स्किनकेअर चुका समजून घ्या आणि त्यावर योग्य उपाय करून निस्तेज, निरोगी आणि ग्लोइंग त्वचा मिळवा.

चेहरा वारंवार धुणे

चेहरा स्वच्छ ठेवणे गरजेचे असले तरी वारंवार धुणे त्वचेमध्ये असलेले नैसर्गिक तेल काढून टाकते. ज्यामुळे त्वचा कोरडी, खेचली गेलेली आणि संवेदनशील होऊ शकते. अशातच जास्त तीव्रतेचे क्लिन्झर असलेले फेशवॉश वापरले तर त्वचेचा नैसर्गिक संरक्षण थर बिघडतो. यासाठी दिवसातून दोन वेळा म्हणजेच सकाळी आणि रात्री सौम्य फेसवॉशने चेहरा धुणे पुरेसे आहे.

सनस्क्रीनचा अनियमित वापर

बऱ्याच जणांना असा गैरसमज असतो की फक्त उन्हाळ्यात किंवा उन्हात बाहेर पडताना सनस्क्रीन वापरणे गरजेचे असते. त्यामुळे अनेकदा बरेचजण सूर्यप्रकाश नसेल किंवा घरात असतील, तर सनस्क्रीन लावण्याकडे दुर्लक्ष करतात. पण UVA किरण खिडकीतूनही आत येतात आणि त्वचेला हानी पोहोचवतात. त्यामुळे दररोज किमान SPF 30 असलेला सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे. तसेच वर्षाचे बाराही महिने सनस्क्रीन वापरणे आवश्यक आहे.

Skincare Mistakes One Must Avoid
Tips To Look Younger: तुम्हाला तुमच्या वयापेक्षा तरुण दिसायचं आहे? मग खाली दिलेल्या टिप्स नक्की फॉलो करा

खूप जास्त प्रॉडक्ट्स वापरणे

सिरम, टोनर, मॉइश्चरायझर, अ‍ॅक्टिव्ह घटक असलेले अनेक प्रॉडक्ट्स वापरणे हे ऐकायला छान वाटते, पण त्याचा परिणाम त्वचेवर चांगला असेलच असे नाही. खूप प्रॉडक्ट्स एकत्र वापरल्याने त्वचा कोरडी आणि चिडचिडी होऊ शकते. पिंपल्स वाढू शकतात. त्यामुळे स्किनकेअर साधं आणि सोप्पं ठेवा. फक्त क्लिन्झिंग, मॉइश्चराइज आणि सनस्क्रीन अशा साध्या स्किनकेअरने देखील आपण निरोगी आणि सुंदर त्वचा मिळवता येऊ शकते. मात्र नवीन प्रॉडक्ट्स एकावेळी एकच वापरून पाहा आणि त्याला त्वचेची प्रतिक्रिया काय आहे ते आधी पाहा आणि मगच त्याचा स्किनकेअरमध्ये समावेश करा.

तेलकट त्वचेसाठी मॉइश्चरायझर टाळणे

तेलकट त्वचा असली की मॉइश्चरायझर लावणे टाळायचे अशी चूक अनेकदा केली जाते. पण हे चुकीचे आहे. त्वचेला मॉइश्चर न मिळाल्यास ती अधिक तेल निर्माण करू शकते. त्यामुळे त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी तेलमुक्त, हलकं मॉइश्चरायझर वापरणं गरजेचं आहे. यासाठी वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर तुम्ही वापरू शकता.

सतत चेहऱ्याला हात लावणे

आपण नकळत वारंवार चेहऱ्याला हात लावत असतो. हातावर हनुवटी टेकवणे, कपाळ चोळणे, डोळे चोळणे असे आपण बऱ्याचदा करतो. पण आपल्या हातांवर धूळ, बॅक्टेरिया आणि तेल असते जे त्वचेवर येणाऱ्या पिंपल्सचे कारण ठरू शकते. त्यामुळे शक्य तेवढं चेहऱ्याला हात लावणे टाळा. फोन, लॅपटॉप कीबोर्ड वापरल्यानंतर हात स्वच्छ धुवा. त्यावरील धुळीमुळे देखील त्वचा खराब होऊ शकते.

Skincare Mistakes One Must Avoid
Early Age Alzheimer Signs: ‘सैयारा’मधल्या वाणीसारखं तुम्हालाही २०व्या वर्षीच विसरायला होतंय? असू शकतात अल्झायमरची सुरुवातीची लक्षणं! वेळीच ओळखा!

FAQs

  1. चेहरा दिवसातून किती वेळा धुणं योग्य आहे? (How many times should I wash my face in a day?)
    ➡चेहरा दिवसातून दोन वेळा – सकाळी आणि रात्री – सौम्य फेसवॉशने धुणे पुरेसे आहे. वारंवार धुण्यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाऊ शकते.

  2. घरात राहिल्यास सनस्क्रीन लावणे गरजेचे आहे का? (Do I need to apply sunscreen even when staying indoors?)
    ➡होय, UVA किरण खिडकीतून देखील आत येतात. त्यामुळे घरात असतानाही SPF 30 असलेला सनस्क्रीन वापरणे आवश्यक आहे.

  3. तेलकट त्वचेसाठी मॉइश्चरायझर टाळले पाहिजे का? (Should people with oily skin avoid using moisturizer?)
    ➡नाही, मॉइश्चरायझर टाळणे योग्य नाही. यामुळे त्वचा अजून जास्त तेल निर्माण करू शकते. तेलमुक्त वॉटर-बेस्ड मॉइश्चरायझर वापरणे फायदेशीर ठरते.

  4. एकाच वेळी खूप स्किनकेअर प्रॉडक्ट्स वापरणे योग्य आहे का? (Is it okay to use many skincare products at once?)
    ➡नाही, खूप प्रॉडक्ट्स वापरण्याने त्वचेवर उलट परिणाम होऊ शकतो. स्किनकेअर साधं ठेवणं आणि प्रत्येक नवीन प्रॉडक्ट एकावेळी एकच वापरणं योग्य असतं.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com