प्रत्येक स्वावलंबी महिलेला असल्या पाहिजे 'या' ६ स्मार्ट सवयी

या आर्थिक सवयी तुम्हाला कधीही कर्जात बुडवू देणार नाहीत.
प्रत्येक स्वावलंबी महिलेला असल्या पाहिजे 'या' ६ स्मार्ट सवयी

प्रत्येक व्यक्तीकडे स्वत:ची काहीतरी बचत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, विशेषत: तुम्ही महिला असाल तर, तुम्हाला पैसे कसे वाचवायचे आणि गुंतवायचे हे माहित असले पाहिजे जेणेकरून अडचणीच्या वेळी तुमच्याकडे काहीतरी असेल. प्रत्येक स्वावलंबी महिलेना या 6 सवयी स्विकारायला हव्या जेणेकरुन अडचणीचा सामना करता येईल.

प्रत्येक स्वावलंबी महिलेला असल्या पाहिजे 'या' ६ स्मार्ट सवयी
ती कुठे काय करते!

क्रेडिट कार्डचा वापर कमीत कमी करा

शक्यतो तुम्ही डेबिट कार्डचा वापर करा जेणे करून तुमच्या खात्यामध्ये किती पैसे आहेत याची तुम्हाला जाणीव होईल. क्रेडिट कार्डचा वापर टाळा.

वेळ वाया घालवू नका

तुमच्या पगारातील कमीत कमी १० टक्के बचतीमध्ये टाका. नंतर करू असे म्हणून काम पुढे ढकलण्याची सवय सोडा. कोणतेही काम ताबडतोब करण्याची सवय लावा.

जर तुम्हाला जमत असेल तर थोडे अधिक टाका पण त्याची सुरूवात आत्ताच सुरुवात करा मग तुम्हाला कितीही पगार असो.

खरेदी करताना भान ठेवा(Impulse shopping)

तुम्ही भान हरवून खरेदी करत असाल तर त्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. यामुळे क्षणिक आनंद मिळतो पण तुमच्या खात्यात खडखडाट होतो. तुम्हाला खरोखर काय हवे आहे याची यादी बनवा आणि त्यावर ठाम राहा. तुम्हाला खरोखर काही किरकोळ खरेदी करायची असेल सरोजिनी, बंजारा, स्थानिक थ्रीफ्ट स्टोअर्स इत्यादी मार्केटमध्ये जा.

प्रत्येक स्वावलंबी महिलेला असल्या पाहिजे 'या' ६ स्मार्ट सवयी
सौंदर्यखणी : सूक्ष्म छिद्रांची नक्षी शिबोरी!

गुंतवणूक करा

तुम्हाला कितीही पगार मिळत असला तरी काही रक्कम गुंतवणूकीसाठी बाजूला ठेवा. SIPs, PPF, विमा पॉलिसी सुरु करा. तुम्हाला सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर भिशी (Kitty)मध्ये गुंतवा आणि नंतर तुम्हाला हवे ते दागिणे बनवा आणि काहीतरी खरेदी करू शकता.

बजेट प्लॅन करा

साप्ताहिक किंवा मासिक बजेट बनवा आणि ते तंतोतंत पाळा. त्या बजेटमध्ये तुमचे सर्व खर्च व्यवस्थापित करा. हे सर्व लिहून ठेवा जेणेकरून तुमचे पैसे कुठे जात आहेत आणि तुम्ही ते कशावर खर्च करत आहात हे तुम्हाला कळेल.

आपत्कालीन निधी

तुमच्याकडे आपात्कालिन निधी असेल याची काळजी घ्या. तुम्हाला जर कोणीही आहेर म्हणून काही पैसे दिले तर ते खर्च करू नका ते वेगळे ठेवा आणि तुमच्या अडचणीच्या काळात वापरा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com