हाडांची बळकटी वाढवण्यासाठी आहारात करा 'या' घटकांचा समावेश

हाडांची बळकटी वाढवण्यासाठी आहारात समावेश करा 'या' घटकांचा
हाडांची बळकटी वाढवण्यासाठी आहारात समावेश करा 'या' घटकांचाGoogle

कोल्हापूर : शरीरात असणाऱ्या हाडांमुळेच आपली शरीर रचना बनते. हाडेच आपल्या अवयवांचा व संपूर्ण शरीराचा मुख्य आधार आहेत. मानवी शरीरातील हृदय, मेंदू आणि इतर अवयव सुरक्षित असतात. हाडांत कॅल्शियम आणि फॉस्फरस यांचा साठा मोठ्या प्रमाणात असतो. शरीराला याची जेव्हा गरज असते, तेव्हा हा साठा महत्त्वाचे काम करतो. हाडांच्या मजबुतीसाठी सकस आहार, व्यायाम आणि उत्तम आरोग्यवर्धक सवयी असणे आवश्यक आहे.अस्तिरोगाचे अनेक प्रकार आहेत. यात हाडे ठिसूळ होणे व त्यामुळे फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते. खूप लोकांत हाडे कमकवूत असतात. या गोष्टीची त्यांना जाणीव सुद्धा नसते. अस्थिरोगाचा धोका कोणालाही आणि कोणत्याही वयात उदभवू शकतो.

अशी आहे शरीराची गरज

-कॅल्शियम ची गरज वयानुसार बदलत असते.

-१८ ते ५० वयामधील लोकांना १ हजार मिलिग्रॅम कॅल्शियमची गरज असते.

-कॅल्शियम चे शोषण होण्यासाठी विटामिन ‘डी‘ ची गरज असते.

अस्थिरोग व लक्षणे

अस्थिरोग सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे दिसत नाहीत. काही लोकांत त्यांना फ्रॅक्चर होते तेव्हाच समजते. ज्या लोकांना अस्थिरोग आहे, त्यांना हाडे ठिसूळ होण्याचा किंवा तुटण्याचा धोका होतो. काही लोकांना चालणे अवघड होते.अस्थिरोगाचा जास्त प्रभाव शरीरामधील बरगड्या, नितंब, मनगटे आणि पाठीचा कणा आदी भागात जास्त दिसतो.

आहार

आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश असावा. यात अंड्याचा पिवळा भाग, फळे आणि भाज्यांचा समावेश असावा. यामुळे इतर पोषक घटकही मिळतात जे हाडांच्या स्वस्थ प्रकृतीसाठी उपयोगी असतात. हाडांच्या मजबूतीसाठी खसखस, तीळ, चिया सीड्स, चीज, दही, बदाम, अंजीर, हिरव्या पालेभाज्यात पालक, शेवग्याच्या शेंगा चे पान आणि इतर हिरव्या पालेभाज्या, दूध व दुधाचे पदार्थ,अंडी आदीचा समावेश असावा.

व्यायाम

योग्य प्रमाणात व्यायाम ४५ मिनिटे व्यायाम करणे. चालणे हा सोपा आणि महत्त्वाचा व्यायाम ठरतो. विटामिन ‘डी सर्वात मोठा स्रोत सूर्यप्रकाश आहे. सकाळच्या कोवळ्या उन्हात २० मिनिटे राहील्यास फायदा मिळतो.

Summary

वर्षातून एकदा तरी रक्तामधील कॅल्शियम, विटामिन ‘डी‘ आणि इतर घटकांचा चाचणी करून घेणे गरजेचे आहे.

डॉक्टरांचा सल्ला

वर्षातून एकदा तरी रक्तामधील कॅल्शियम, विटामिन ‘डी‘ आणि इतर घटकांचा चाचणी करून घेणे हे गरजेचे ठरते. आपल्या शरीराची माहिती पण होते व वेळीच पुढे उद्भवणार्‍या रोगाचे निवारण करू शकतो. यामुळे डॉक्टरचा योग्य सल्ला घेऊन त्याचे पालन करणे हे योग्य ठरते.

भारताच्या लोकसंख्येच्या ५० टक्के लोक अस्थीरोगामुळे त्रस्त आहेत. यात काही लोक व्यवस्थित उपचार करून घेतात तर काही उपचार करून घेत नाहीत. काही लोकांना अस्थिरोग आहे.हे ही माहित नसते. वेळीच सतर्कता दाखवल्यास शरीराची होणारी हानी टाळणे शक्य होते.

- प्रज्वला लाड,आहार तज्ज्ञ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com