Success Story  : एका महिलेने मारलेल्या टोमण्याचा राग आला आणि प्रियांका बनली IAS, आज सांभाळतेय संपूर्ण जिल्हा

वाचा एक डॉक्टरचा कलेक्टर होण्यापर्यंतचा प्रवास
Success Story 
Success Story esakal

Success Story  : एका झोपडपट्टीत काही शिकाऊ डॉक्टर सर्व्हेसाठी गेले होते. त्याती काही महिला डॉक्टरही होत्या. त्यातील एक डॉक्टरने, एका महिलेला घाणरडे पाणी पित असताना पाहिलं. आणि तेच पाणी ती तिच्या मुलालाही पाजत होती. डॉक्टरने त्या महिलेला थांबवलं, हे पाणी दुषित आहे त्यामुळे तुझं बाळ आजारी पडेल, असं सांगितलं.

त्यावर झोपडपट्टीतील त्या महिलेने डॉक्टरला प्रश्न केला की, तू काय कलेक्टर आहेस का,मी तुझं का ऐकू ? त्यावर ती डॉक्टर महिला पेटून उठली आणि ती खरंच कलेक्टर बनली, आहे की नाही डिक्टो पिक्चरमधला सीन. पण, ही गोष्ट खरी आहे. त्या महिला डॉक्टरचे नाव आहे IAS डॉ. प्रियांका शुक्ला.

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी UPSC ही नागरी सेवा परीक्षा आयोजित केली जाते ज्यामध्ये देशातील काही निवडक उमेदवार यशस्वी होतात. पण, काही लोकांच्या कथा संघर्षाने भरलेल्या असतात ज्या त्यांना नेहमीच पुढे जाण्याची प्रेरणा देतात.

Success Story 
Success Story: जिद्द, मेहनतीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी! वडिलांचा व्यवसाय सांभाळून किरणने MPSCमध्ये मिळवले यश

आज आम्ही तुम्हाला अशाच एका कथेबद्दल सांगणार आहोत. आम्ही तुम्हाला डॉ. प्रियांका शुक्ला यांची कहानी सांगणार आहोत. कोण आहे प्रियांका शुक्लाडॉ. प्रियांका शुक्ला या आयएएस अधिकारी आहेत. IAS डॉ. प्रियांका शुक्ला सध्या छत्तीसगडमध्ये कार्यरत आहेत.

सध्या प्रियांका आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे विशेष सचिवपद आणि मिशन डायरेक्टर, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आयुष संचालक, नागरी प्रशासन आणि विकास यांचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

एवढा सगळा व्याप आणि विभागांचे काम पाहता, छत्तीसगड सरकारचा विश्वास त्यांनी जिंकला आहे, हे लक्षात येतं. IAS होण्याआधी प्रियांका डॉक्टर होत्या. डॉ. प्रियंका सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह आहेत. ट्विटरवर त्यांचे ३ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्या ट्विटरवर वेळोवेळी अपडेट्स शेअर करत असतात.

IAS होण्याआधी प्रियांका डॉक्टर होत्या
IAS होण्याआधी प्रियांका डॉक्टर होत्याesakal
Success Story 
IAS टीना डाबी झाल्या आई, गोंडस मुलाला दिला जन्म

त्या यूपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणांना प्रेरित करण्याचे काम करतात. प्रियंका यांच्या पालकांची इच्छा होती की तिने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आयएएस व्हावे परंतु त्यांना डॉक्टर व्हायचं होतं.

प्रियांकाने एमबीबीएसचा अभ्यास केला. त्यासाठी त्यांनी किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. एमबीबीएसची पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी लखनौमध्ये सराव सुरू केला. पण, जीवनात घडलेला एक प्रसंग प्रियांका यांचे जीवन बदलणारा ठरला.

मनाशी ठाम निश्चय करून आयएएस डॉ. प्रियंका शुक्ला यांनी ही परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यांना पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षेत यश मिळाले नाही. 2009 मध्ये, त्यांनी UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आणि प्रियांका IAS बनल्या.

प्रियांका शुक्ला प्रशासकीय अधिकारी असण्यासोबतच समकालीन नृत्यांगना देखील आहेत. ती कविताही लिहिते. त्यांना गाण्याची आणि चित्रकलेचीही आवड आहे. याची माहिती त्याने स्वतः त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर दिली आहे. तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते तिला दोनदा सन्मानित करण्यात आले आहे. 2011 च्या जनगणनेतील त्यांच्या प्रयत्नांसाठी त्यांना राष्ट्रपती पदक मिळाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com