Khalga Marathi Movie Trailer : 'लक्ष्या, कलेक्टर नाय, पोलीस व्हायचं पोलीस'! डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही

सर्वसामान्य लोकांचं आयुष्य किती संघर्षमय आणि यातनादायी असू शकतं याचा प्रत्यय खळगं या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर आल्याशिवाय राहत नाही.
Khalga Marathi Movie Trailer
Khalga Marathi Movie Trailer esakal

Khalga Marathi Movie Trailer : मराठी चित्रपट हा दिवसेंदिवस अधिक प्रगल्भ होताना दिसतो आहे. एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत असताना अद्यापही समाजातील काही गोष्टी खटकणाऱ्या आहेत. त्याचा परिणाम सर्वसामान्य अन् तळागाळातील समाजावर होत असल्याचे दिसून आले आहे.

सर्वसामान्य लोकांचं आयुष्य किती संघर्षमय आणि यातनादायी असू शकतं याचा प्रत्यय खळगं या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर आल्याशिवाय राहत नाही. समाजातील वास्तव गोष्टींवर सडेतोडपणे भाष्य करण्याचे धाडस हा चित्रपट दाखवतो.

सध्या त्याच्या ट्रेलरचे कौतुक होताना दिसत आहे. बरेचदा चित्रपटांची कथा ही आकर्षून घेणारी असते. आशयघन कथानक, बोलीभाषा, कलाकारांचा दमदार अभिनय या सगळ्याच बाबी लक्षात घेता चित्रपट पाहावा की नाही हे आजकाल प्रेक्षकवर्ग ठरवतात.

Also Read - हॅप्पी हार्मोन...

अशातच नुकत्याच समोर आलेल्या एका हृदयस्पर्शी ट्रेलरने साऱ्यांच्या नजरा वळवल्या आहेत. थरारक, रहस्यमय विषयावर भाष्य करणाऱ्या व सत्य परिस्थितीचं दर्शन घडवणाऱ्या 'खळगं' या चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे.

ट्रेलरवरून असा अंदाज वर्तवण्यात येतोय तो म्हणजे चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे कथानक. नवोदित कलाकारांना घेऊन केलेली ही आखणी प्रेक्षकांना भावुक करणारी आहे. पोलीस होण्याची उमेद, त्यासाठीची एका आई लेकाची सुरू असलेली धडपड, एकीकडे प्रेमासाठीचा त्याग हे सगळं हुबेहूब या ट्रेलरमधून पाहायला मिळतंय. नवोदित कलाकारांनी केलेला अभिनय हा खरंच वाखाणण्याजोगा आहे. गावखेड्यातील व सत्यघटनेवर आधारित 'खळगं' नव्या कोऱ्या चित्रपटाच्या ट्रेलरने चित्रपटाची उत्सुकता वाढवून ठेवली आहे.

Khalga Marathi Movie Trailer
Gadar 2 : 'खरं सांगा तुम्ही तारा सिंगच्या भूमिकेसाठी किती रुपये घेतले?' शेवटी सनीनं सांगितलं, मला....!

अनाथ मुलांच्या अंतर मनाची व्यथा सांगणाऱ्या या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी पेलवली आहे. 'कार्तिक फिल्म्स एंटरटेनमेंट' प्रस्तुत या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा 'कार्तिक फिल्म्स एंटरटेनमेंट'सह निर्माते गोवर्धन दोलताडे, सुरेश तांदळे, रोहन पाटील यांनी सांभाळली आहे. तर सहनिर्माते म्हणून लिला डेव्हलपमेंट, अनुराधा किसनराव नजनपाटील यांनी बाजू सांभाळली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद शिवाजी दोलताडे, गोवर्धन दोलताडे यांचे असून चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी सचिन अवघडे यांनी उत्तमरीत्या साकारली आहे.

Khalga Marathi Movie Trailer
Jawan Box Office: विकेंडला शाहरुख खानच्या जवानने रचला इतिहास, अवघ्या चार दिवसात आकडा ५०० कोटी पार

गावखेड्यात चित्रित झालेल्या आणि वास्तविकतेचं दर्शन घडवणाऱ्या या आशयघन चित्रपटात नवोदित कलाकारांनी चांगलाच कल्ला केला. माधवी जुवेकर , कार्तिक दोलताडे , सुलतान शिकलगार , रोशनी कदम , प्रज्वल भोसले , प्रितम भंडारे , कल्यानी पवार, शिवाजी दोलताडे ,माणिक काळे , वैष्णवी मुरकुटे , ज्वालामुखी काळे , भैरव जाधव , संकेत कवडे , शिल्पा कवडे , मयूर झिंजे , मोहन घोलप , मंगेश ससाणे , ऐश्वर्या लंगे , गणेश शिंदे , शरद पवार या कलाकारांनी चित्रपटात उत्तम अभिनय साकारला आहे.

नवोदित अभिनेत्यांनी केलेला हा चित्रपट आहे असं त्यांचा अभिनय पाहून म्हणणं चुकीचं ठरेल, यांत शंकाच नाही. चित्रपटाच्या ट्रेलरने या साऱ्याची रंगत वाढवलीच आहे, आता उत्सुकता लागून राहिली आहे ती चित्रपट प्रदर्शनाची. येत्या २२ सप्टेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालण्यास सज्ज होत आहे.

Khalga Marathi Movie Trailer
Jawan: शाहरुख खानच्या जवानमधील 'ती' गोष्ट गोरखपूरमधील सत्य घटनेवर आधारीत, वाचा सविस्तर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com