Summer Care : या रंगाची छत्री म्हणजे सुर्यापासून बचाव करणारं सुरक्षा कवच, तज्ज्ञांचा लाखमोलाचा सल्ला

पांढऱ्या रंगाची छत्री वापरली तर आपल्या नाजूक त्वचेवर होऊ शकतो विपरित परिणाम
Summer Care
Summer Careesakal

Summer Care Tips :

कडक उन्हाळा जाणवू लागला की, छत्री, टोपी अशा वस्तू बाहेर पडतात. पण, एका विशिष्ट रंगाची छत्री तुमच्यासाठी जास्त फायद्याची ठरेल असे म्हटले तर तुमचा विश्वास बसेल का? उन्हापासून बचाव करण्यासाठी इतर कोणत्या रंगाची नाहीतर काळ्या रंगाची छत्री जास्त मदत करेल असे भारतीय हवामान विभाग (India Meteorological Department) यांनी म्हटले आहे.

हवामान विभागातील शास्त्रज्ञ ए.प्रसाद यांनी म्हटलं आहे की, तुम्ही कोणत्या रंगाची छत्री निवडता हे उन्हाशी दोन हात करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडते. काळ्या रंगाची छत्री सुर्याची किरणे आणि तिव्रता शोषून घेते.

Summer Care
Dhule Summer Heat : वाढत्या पाऱ्याने धुळेकर बेजार! 43 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान; शहरातील रस्ते, बाजारात शुकशुकाट

काळी छत्री इन्फ्रारेड रेडिएशन उत्सर्जित करते आणि एक कवच निर्माण करते. ज्यामुळे हानिकारक अतिनील किरण शरीरात पोहोचण्यास प्रतिबंध होतो.

ते पुढे म्हणाले की, काळ्या रंगाऐवजी पांढऱ्या रंगाच्या छत्र्या निवडल्या तर त्या प्रकाश परावर्तित करतात. अतिनील किरणे छत्रीतून प्रवेश करतात. ज्यामुळे त्वचेवर विपरित परिणाम होऊ शकतात.

Summer Care
Summer Vacation: उन्हाळी सुट्टीत मुलींचा मेंदी काढण्याकडे कल; लग्नसराईत रोजगार मिळवणेही शक्य

बेंगरुळुतील लोकांनी शास्त्रज्ञांचा सल्ला ऐकून काळ्या छत्र्या वापरायलाही सुरूवात केली आहे. एका कॉलेज विद्यार्थीने सांगितले की, मी आधी हिरव्या रंगाची छत्री वापरायचे. पण ती वापरली तरी मला उन्हातच उभारल्यासारखे वाटायचे. जेव्हा हवामान तज्ज्ञांचे मत माझ्या वाचनात आले तेव्हापासून मी काळी छत्री वापरते. जी उन्हाच्या रेडिएशनपासून माझा बचाव करते असे मला जाणवले.  

Summer Care
Summer Heat: वाढत्या तापमानामुळे विविध आजारांना आमंत्रण! लहान मुलांमध्ये अतिसाराने घेरले; पालक त्रस्त, हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी

शहरात पाणीपुरीचा स्टॉल चालवणारे प्रेमचंद तिवारी म्हणाले की, मी स्टॉलवर काळ्या रंगाची मोठी छत्री वापरतो. कारण, ती माझे पदार्थही थंड ठेवते. तसेच, या छत्रीमुळे पाणीपुरी खाणाऱ्या ग्राहकांना ही थंडावा मिळतो. त्यामुळे, ग्राहक आकर्षित होत आहेत.    

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com