Summer Heat: वाढत्या तापमानामुळे विविध आजारांना आमंत्रण! लहान मुलांमध्ये अतिसाराने घेरले; पालक त्रस्त, हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी

Nashik News : सामान्यांपेक्षा अतिसाराच्या रुग्णांमध्ये ४० टक्के वाढ झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. शहरातून बालरोग तज्ज्ञांची बहुसंख्य हॉस्पिटल्स हाऊसफुल्ल आहेत
Summer Heat Disease
Summer Heat Diseaseesakal

मालेगाव : शहर व परिसरात एप्रिल महिना हॉट ठरला आहे. सूर्यनारायणाचा प्रकोप वाढल्याने चार ते पाच दिवस वगळता पारा सातत्याने ४१ अंशापेक्षा अधिक आहे. या हंगामात १८ एप्रिलला राज्यातील सर्वाधिक ४३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद येथे झाली होती. वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.

तापमानाचा फटका प्रामुख्याने बालके व लहान मुले यांना बसला आहे. शहर व तालुक्यात सर्दी, खोकला, जुलाब (अतिसार), उलट्या आदींची साथ सुरु आहे. सामान्यांपेक्षा अतिसाराच्या रुग्णांमध्ये ४० टक्के वाढ झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. शहरातून बालरोग तज्ज्ञांची बहुसंख्य हॉस्पिटल्स हाऊसफुल्ल आहेत. (Nashik Summer Rising temperature invites various diseases news)

उन्हापासून बचाव करणे, जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करणे व पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे खाणे हा एकमेव उपाय यासाठी असल्याचे बालरोग तज्ज्ञ डॉ. दत्तात्रेय पाटील यांनी सांगितले. रणरणत्या उन्हातील विवाह समारंभ, शाळा, परीक्षा, सीबीएसई पॅटर्नच्या सुरु असलेल्या शाळा, विविध क्लासेस यामुळे दोन वर्षापासून पंधरा वर्षांपर्यंतच्या मुलांना अतिसाराने घेरले आहे.

सकाळी अकरा ते सायंकाळी साडेसहापर्यंत रस्ते निर्मनुष्य होतात. शहरवासीयांना ४० अंश सेल्सिअसच्या तापमानाची सवय झाली आहे. मात्र यंदा रणरणते ऊन अंगावर झेलताना नाकीनऊ येत आहे. विवाह समारंभामध्ये गर्दी होत असल्याची संधी साधून बर्फगोळे, कुल्फी व आइस्क्रीम विक्रेते विवाह समारंभास्थानी हमखास गाड्या आणतात.

वाढत्या तापमानामुळे मुले थंड खाण्याचा हट्ट धरतात. नेमके हेच आजारपणाला कारण ठरते. उन्हाळ्यात अन्नपदार्थ लवकर खराब होत असल्याने बाहेरील पदार्थ खाणे जिकरीचे असते, मात्र त्याचे पालन होत नाही.

मुलांमध्ये साथीचे आजार

अतिसाराबरोबरच सध्या मुलांना अंगावर लाल पुरळ येणे, रॅशेस, घामोळ्या, उलट्या, जुलाब, लघवीला जळजळ होणे आदी त्रास जाणवत आहे. त्यातून मुलांत चिडचिडपणा वाढला आहे. लहान मुलांचा चिडचिडेपणा, आजारपण, दवाखाना व त्यात विवाह समारंभ, उन्हाचा तडाखा अशा साऱ्या बाबींमुळे पालकही त्रस्त झाले आहेत.

काही लहान मुलांना सनस्ट्रोकचा त्रासही जाणवत आहे. येथील सामान्य रुग्णालय व महापालिकेच्या रुग्णालयात उष्माघातासाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. तथापि या कक्षांऐवजी डायरिया वॉर्डमधील मुले व रुग्णांची संख्याच अधिक आहे. (latest marathi news)

Summer Heat Disease
Summer Foods : उन्हाळ्यात पिकलेला आंबा नाहीतर कच्ची कैरी खा, कारण...

दर अर्ध्या तासाने पाणी घ्या

उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण राखण्यासाठी वेळोवेळी व तहान लागली नसतांनाही नियमित पाणी पिणे. त्याबरोबरच उकळून थंड केलेले पाणी, लिंबू पाणी, विना बर्फाचा ऊसाचा रस, फळांचा रस, टरबूज, खरबूज, द्राक्षे, काकडी आदी पाण्याची फळे खावीत असे बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत वाघ यांनी सांगितले.

घराबाहेर पडताना कानाला रुमाल अथवा उपरणे बांधणे आवश्‍यक आहे. टोपी, गॉगल, सन कोट, स्कार्प वापरून काळजी घ्यावी. वृध्द व लहान मुलांनी उन्हात फिरू नये. पाण्याची बाटली समवेत असावी. दर अर्धा तासाने पाणी प्यावे. उन्हात अवजड कामे टाळावीत.

"लहान मुलांना अतिसाराचा त्रास होत असल्याने प्रामुख्याने त्यांना सतत पाणी पाजायला हवे. उन्हापासून बचावासाठी ओल्या फडक्याने अंग पुसावे. मुले पाणी पीत नसल्यास त्यांना फळांचा रस, नारळपाणी, टरबूज, खरबूज, काकडी आदी पदार्थ द्यावेत. अधूनमधून मीठ, साखरपाणी द्यावे. बर्फ खाणे टाळावे. पाणी उकळून थंड करून प्यावे. जारचे थंड पाणी खात्रीलायक नसते, हे पाणी पिण्याचे टाळावे. घरातील पाण्याची बाटली सोबत ठेवावी, तीच मुलांना पाजावी. यातून अतिसार व अन्य साथ आजार टाळता येणे शक्य आहे."

- डॉ. प्रशांत वाघ, बालरोग तज्ज्ञ, मालेगाव

मालेगावातील तापमान

तारीख - कमाल तापमान

१५ एप्रिल - ४२.६ अंश

१६ एप्रिल - ४२.६

१७ एप्रिल - ४३.२

१८ एप्रिल - ४३.४

१९ एप्रिल - ४२.०

२० एप्रिल - ४१.६

२१ एप्रिल - ३९.२

२२ एप्रिल - ३९.६

२३ एप्रिल - ४१.८

२४ एप्रिल - ४२.

Summer Heat Disease
Summer Vacation: उन्हाळी सुट्टीत मुलींचा मेंदी काढण्याकडे कल; लग्नसराईत रोजगार मिळवणेही शक्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com