Summer Skin Care : उन्हाळा आला रे! उन्हाळ्यात त्वचेची अशी घ्या काळजी, तुम्ही टॅनिंग विसरून जाल!

चेहऱ्यावर तेज येण्यासाठी तुम्ही घरीच बनवलेले फेसपॅक वापरू शकता
Summer Skin Care
Summer Skin Careesakal

Summer Skin Care :

मार्च महिन्याचा मध्य गाठत आला त्यामुळे उन्हाळ्याच्या झळा बसू लागल्या आहेत. बाहेर कामानिमित्त फिरताना प्रकर्षाने उन्हाळा सुरू झाला हे जाणवत आहे. त्यासाठी फेरीवाले सरबत, फ्रूट्सचे काप, ज्युस विकताना दिसत आहेत. आणि उन्हातून जाऊन आलोत की टॅनिंग दिसू लागतं.

चेहरा उजळणं तर सोडाच पण उन्हामुळे चेहरा,हाताची त्वचा करपल्यासारखी काळी दिसू लागते. तो वातावरणाचा आपल्या शरीरावर झालेला बदल आहे. प्रत्येक उन्हाळ्यात याचा अनेकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळेच यंदाच्या उन्हाळ्यात त्वचेसाठी नक्की काय काळजी घ्यावी हे पाहुयात. (Skin Care Tips In Marathi)

Summer Skin Care
Summer Temperature : उष्णतेच्या उच्चांकाने जनजीवन ठप्प! मुंबई- आग्रा महामार्गावरील वाहतूकही मंदावली

सनस्क्रीन

उन्हाळ्यात कडक उन्हाचा त्वचेवर कोणताही परिणाम होऊ नये असे वाटत असेल. तर सनस्क्रीन लावल्याशिवाय पर्याय नाही. सनस्क्रीन तुमच्या त्वचेला उन्हाच्या प्रखर किरणांपासून सुरक्षित ठेवते. त्यामुळे तुमची त्वचा काळी पडत नाही.

पाणी पिणे

उन्हाळ्यात त्वचेवरील तजेलदारपणा कमी होतो. कारण, शरीर डिहायड्रेट होते त्यामुळे चेहरा घामाने भरलेला असतो. पाण्याची कमी झाली की चेहरा निस्तेज अन् सुरकुतलेल्या सफरचंदासारखा दिसू लागतो. त्यामुळेच चेहऱ्यावर नेहमी टवटवीतपणा रहावा यासाठी भरपूर पाणी प्या. (Skin Care Tips)

Summer Skin Care
Summer Health Tips: अंगावर सतत डिओड्रंटचा फवारा मारायची सवय लागलीय का? मग हे वाचाच!

ज्युस अन् सरबते

तुम्हाला प्रवासात काहीवेळा थकल्यासारखे वाटत असेल. तर असे डिहायड्रेशनमुळे होऊ शकते. त्यामुळे नारळ पाणी, सरबते अन् ज्युस प्या. ज्यामुळे शरीर हायड्रेट राहील आणि त्याचा त्वचेलाही फायदा होईल.

चेहरा धुणे

उन्हात फिरून चेहऱ्यावर धुळ साचते. त्यामुळे चेहऱ्यावर सतत थंड पाण्याचा शिडकावा मारा. ज्यामुळे चेहऱ्यावर धुळ टिकून राहणार नाही. तसेच रोज रात्री झोपताना कोणत्याही प्रकारचा मेकअप असेल तर तो उतरवून म्हणजे चेहरा धुवूनच झोपा. (Skin Care) 

Summer Skin Care
Summer Vacation Train: उन्हाळ्याच्या सुटीत गावी जाणाऱ्यांसाठी रेल्वेची भेट! 'या' विशेष रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यात वाढ

फेसपॅकची मदत घ्या

चेहऱ्यावर तेज येण्यासाठी तुम्ही घरीच बनवलेले फेसपॅक वापरू शकता. तसेच, चेहऱ्याची त्वचा उजळण्यासाठी फेशिअल ट्रिटमेंटही करू शकता. ज्यामुळे चेहऱ्याला योग्य मसाज मिळतो आणि रक्ताभिसरण सुरळीत होते. त्यामुळे चेहऱ्यावर आपोआपच ग्लो येतो. (Facepack) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com