esakal | उजळ त्वचेसाठी ट्राय करा हे घरगुती उपाय
sakal

बोलून बातमी शोधा

 skin

उजळ त्वचेसाठी ट्राय करा हे घरगुती उपाय

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

अनेकांना उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात त्वचेचे काही प्रोब्लेम्स(skin problems) जाणवतात. चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी अनेक जण महागड्या प्रोडक्ट्सचा वापर करतात. पण त्या प्रोडक्ट्सचे काही साइड इफेक्ट देखील असतात. उजळ त्वचेसाठी हे घरगुती उपाय (home remedies) नक्की ट्राय करा...(take care of your skin with these home remedies pvk99)

1.मुल्तानी माती आणि चंदनचा लेप (Multani mitti and sandalwood paste)

मुल्तानी माती आणि चंदनचा लेप या दोनही गोष्टींचे मिश्रण जर चेहऱ्याला लावले तर त्वचेवर ग्लो येतो. हे मिश्रण नियमित लावल्याने त्वचा मऊ होते. अठवड्यातून 2-3 वेळा हे मिश्रण चेहऱ्याला लावावे.

Multani mitti and sandalwood paste

Multani mitti and sandalwood paste

2. हळदीचे दुध (Turmeric milk)

त्वचेसाठी हळद आणि दुध हे अत्यंत फायद्याचे आहे. एक चमचा कच्चे दुध आणि अर्धा चमचा हळद मिक्स करून हे मिश्रण कापसाने टोनर सारखे चेहऱ्यावर लावले. अठवड्यामधून 2 ते 3 वेळा हे मिश्रण लावावे.

Turmeric milk

Turmeric milk

3.नारळाचे तेल (coconut oil)

नारळाचे तेल नाइट क्रिममध्ये मिश्र करून चेहऱ्यावर मालिश करावी आणि रात्रभर तसेच ठेवून, सकाळी धूवावे, त्याने त्वचेवर ग्लो येतो. त्वचेवर होणरी आग आणि इंफेक्‍शन कमी होण्यास मदत होते आणि त्वचा उजळ होते.

coconut oil

coconut oil

हेही वाचा: महिलांच्या शर्टला पुरुषांसारखे खिसे का नसतात?

4. ऑलिव ऑइल (olive oil)

चेहऱ्याची त्वचा स्वच्छ आणि ग्लोइंग होण्यासाठी ऑलिव ऑइल लावावे. झोपायच्या आधी नाइट क्रिममध्ये ऑलिव्ह ऑयलचे काही ड्रोप्स घालून चेहऱ्याला लावावे त्याने त्वचा ग्लोइंग होण्यास मदत होते.

olive oil

olive oil

हेही वाचा: वजन कमी करताना केस, त्वचेकडेही द्या लक्ष; वाचा काही सोप्या टिप्स

स्किन एक्सपर्टचा सल्ला घेऊनच या सर्व गोष्टींचा वापर कारावा

loading image