Mental Maturity : तुमचा पार्टनर नक्की मेंटली मॅच्युअर आहे का? या चिन्हांनी ओळखा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mental Maturity

Mental Maturity : तुमचा पार्टनर नक्की मेंटली मॅच्युअर आहे का? या चिन्हांनी ओळखा!

Emotional Maturity Test: कोणतंही नातं म्हणजे दोन व्यक्तींना समजून घेण्याचा, सांभाळून घेण्याचा आणि एकमेकांना सावरून स्वीकारण्याचा प्रवास असतो. नव्याचे नऊ दिवस संपले की नातं हे एकमेकांच्या याच गुणांवर अवलंबून असते. आपण आपल्या जोडीदाराला किती सांभाळून घेतो आहे यावर खूप गोष्टी अवलंबून असतात. 

आयुष्यात प्रत्येकजण आपले आपले अनुभव घेऊन पुढे चालत असतो आणि अनेकदा आपल्या याच अनुभवांच ओझं आपण समोरच्यावर लादू बघतो अर्थात प्रत्येकाचा अनुभव सारखाच असेल असं नाही. 

त्यामुळे असं ओझं लादणं कितपत बरोबर आहे हा प्रश्नच आहे; कारण यामुळे आपल्या नात्यावर परिणाम होऊ शकतो. अर्थात जर तुमचा पार्टनर मेंटली तेवढा मॅच्युअर असेल तर असे प्रसंग येत नाहीत. 

अनेकदा तज्ञ सांगतात की, “तुमच्या दोघांमध्ये मेंटल अन् इमोशनली मॅच्युरिटी वाढवा, यानेच नातं घट्ट होतं” आपल्या आजूबाजूला असे अनेक लोकं आहेत जे आपल्या रिलेशनमध्ये खूप सुखी आहेत, याचं सर्वात मोठं कारण म्हणजे दोघांची मॅच्युरिटी..  

आपला पार्टनर खरंच मेंटली मॅच्युअर आहे हे कसं ओलखायचं हा प्रश्न पडला असेल ना? कारण असं असेल तर तुमचं नातं नक्कीच खूप घट्ट आणि विश्वासू होईल.. मुळात ते परिपक्व असेल.. तुमच्या जोडीदारात आहेत का या गोष्टी?

1. ऐकून घेतो: 

अनेकदा आपल्या पार्टनरने आपल्याला सल्लाच द्यावा अशी आपली अपेक्षा नसते, फक्त आपण जे ऐकवतो आहोत ते ऐकून घ्यावं असं वाटत असतं… वेळ बघून त्यानुसार समजून सल्ला दिला किंवा नुसतं शांततेत मला ऐकायचं आहे असं कुतूहल दाखवल तरी वाद होणं टळतं..

2. मर्यादांचा मान ठेवतो:

कोणत्याही नात्याची एक मर्यादा असते, तीला जपणं खूप गरजेचं आहे, एकमेकांच्या मर्यादेचा इच्छेचा आदर करा.. हे एक हेल्दी रिलेशनशिपसाठी खूप गरजेचं आहे. 

3. थेट निष्कर्षावर पोहोचत नाही:

भावनिकदृष्ट्या मॅच्युअर लोक लगेच निष्कर्षापर्यंत पोहोचत नाहीत, उलट ते घडलेल्या घडामोडींचे विश्लेषण करतात आणि विचारपूर्वक निष्कर्षापर्यंत पोहोचतात.

4. उगाच हक्क गाजवत नाही:

जोडीदार म्हटला की अचानक एकमेकांवर हक्क गाजवणं होतंच.. पण यालाही काहीतरी बंधन हवे, आपल्या स्वतःच्या चुका आणि कृतींसाठी जबाबदार्‍या घेऊ शकणार्‍या व्यक्तीसोबत राहायचे आहे.

5. काय, कधी आणि कुठे सांगायचं हे त्याला कळतं:

प्रत्येका नात्याची स्वतःची अशी स्वतःची एक स्पेस असते,आत्ता मनात येणारा विचार लगेच बोलून मोकळं होण्यापेक्षा जरा संयमाने घेतलं आणि आजूबाजूच्या गोष्टींचं भान ठेवत बोलतात तर वाद होण्याची कारणं संपतात. 

6. आपल्या मताचा आदर करत आपल्याला समर्थन देतो: 

निरोगी आणि सुरक्षित नातेसंबंध हे सर्व एका व्यक्तीबद्दल बनवण्याआधी एकमेकांना समर्थन देण्यावर लक्ष केंद्रित करा.