Menstrual Leave : जगातील ‘या’ देशांमध्ये महिलांना मिळतात मासिक पाळीच्या सुट्ट्या

मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना अनेक शारिरीक समस्यांचा सामना करावा लागतो.
Menstrual Leave
Menstrual Leaveesakal

Menstrual Leave : प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील महत्वाचा भाग म्हणजे मासिक पाळी होयं. ही एक शारिरीक प्रक्रिया आहे, जी दर महिन्याला महिलांना येते. दर महिन्याला ही मासिक पाळी आल्यानंतर, महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

ही प्रक्रिया महिलांसाठी अतिशय महत्वाची असते. कारण, आई होण्यासाठी स्त्रीला मासिक पाळी येणे हे फार महत्वाचे असते. पंरतु, या काळात स्त्रियांना अनेक शारिरीक समस्यांचा सामना करावा लागतो.

मासिक पाळी दरम्यान ओटीपोटात दुखणे, ताप येणे, हात-पाय गळून जाणे, हातापायांमध्ये वेदना होणे, पाठदुखी अशा कितीतरी समस्यांना महिलांना सामोरे जावे लागते. नुकतेच या संदर्भात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी वक्तव्य केले आहे.

स्मृती इराणींचे वक्तव्य :

राज्यसभेत उपस्थित करण्यात आलेल्या एका प्रश्नावर बोलताना स्मृती इराणी म्हणाल्या की, “मासिक पाळी येणारी स्त्री आणि मासिक पाळी हे अपंगत्व नाही तर स्त्रियांच्या जीवनप्रवासाचा एक नैसर्गिक भाग आहे.

जर मासिक पाळीच्या मुद्द्यावरून महिलांना सुट्टी दिली गेली तर त्यांच्याशी भेदभाव होऊ शकतो. आपण असे मुद्दे उपस्थित करता कामा नये ज्यामुळे, महिलांना समान संधींपासून वंचित राहवे लागेल”. इराणी यांच्या या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केले गेले आहे. (Menstrual Leave)

Menstrual Leave
Smriti Irani: महिलांसाठी मासिक पाळी काळातील सुट्टीला स्मृती इराणींचा विरोध; म्हणाल्या, हे अपंगत्व...

अनेक देशांमध्ये मासिक पाळीच्या काळात महिलांना आराम मिळावा, यासाठी त्यांना पिरियड लीव दिली जाते. मात्र, भारतात अद्याप या पिरियड लीव संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. आज आपण अशा देशांबद्दल जाणून घेणार आहोत. जिथे महिलांना मासिक पाळीच्या काळात आराम मिळावा यासाठी पिरियड लीव देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

स्पेन

हा युरोपमधील पहिला देश आहे की, ज्या देशात महिलांना मासिक पाळीच्या काळात सशुल्क रजा दिली जाते. या देशात महिलांना मासिक पाळीच्या काळात दर महिन्याला ३ दिवस सशुल्क रजा दिली जाते. शिवाय, सॅनिटरी पॅड आणि टॅम्पोन्सवर व्हॅट देखील लावला जात नाही.

इंडोनेशिया

इंडोनेशिया या देशामध्ये २००३ मध्ये एक कायदा मंजूर करण्यात आला. या कायद्यानुसार इंडोनेशियातील महिलांना मासिक पाळीच्या काळात २ दिवसांची सुट्टी दिली जाते. या कायद्यानुसार महिलांना कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय, महिन्यातून २ दिवस सुट्टी घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

दक्षिण कोरिया

मासिक पाळीच्या काळात महिलांना सुट्टी देणाऱ्या देशांमध्ये दक्षिण कोरिया या देशाचा देखील समावेश आहे. या देशात महिलांना मासिक पाळीच्या काळात एक दिवस सुट्टी दिली जाते. परंतु, ही सुट्टी सशुल्क नसते.

जपान

जपानमध्ये १९४७ मध्ये महिलांना मासिक पाळीच्या काळात सुट्टी देण्याचा एक कायदा मंजूर केला होता. परंतु, या देशातील बहुतांश महिला या कायद्याचा लाभ घेत नाहीत. जपानमध्ये ६००० कंपन्यांचे एक सर्वेक्षण करण्यात आले. त्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, केवळ 0.9% महिला कर्मचाऱ्यांनी मासिक पाळीच्या रजा घेतल्या आहेत.

तैवान

मासिक पाळीच्या काळात महिलांना सुट्टी देणाऱ्या देशांमध्ये तैवान या देशाचा ही समावेश आहे. या देशातील महिला कर्मचाऱ्यांना वर्षातून ३ दिवस पिरियड लीव्ह दिली जाते.

भारत

आता भारताबद्दल बोलायचे झाल्यास, मासिक पाळीच्या रजेसंदर्भात आतापर्यंत आपल्या देशात कोणताही कायदा करण्यात आलेला नाही. याच वर्षी नोकरदार महिला आणि विद्यार्थीनींना मासिक पाळीची रजा देण्यासाठी एक याचिका दाखल करण्यात आली होती.

परंतु, ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. परंतु, तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, बिहार हे भारतातील एकमेव असे राज्य आहे की, जिथे १९४२ पासून महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या काळात २ दिवसांची सशुल्क रजा दिली जाते.

Menstrual Leave
Irregular Periods: मासिक पाळीच्या वेदनेत आराम मिळवून देतील ‘हे’ पदार्थ! वेदना होतील कमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com