चष्म्याचा नंबर कमी करायचा आहे? मग फॉलो करा 'या' टिप्स

निरोगी आरोग्यासाठी आणि निरोगी डोळ्यांसाठी योग्य आहार घेणे महत्वाचे आहे.
How to remove spectacles
How to remove spectaclesesakal

Eye Care Tips : आपले डोळे हे आपल्या शरीराचा अतिशय महत्वाचा भाग आहेत. डोळ्यां शिवाय, आपण आपल्या आयुष्याची कल्पना देखील करू शकत नाही. डोळ्यांमुळे आपल्या आयुष्यात विविध रंग आहेत आणि डोळे नसतील तर आयुष्य बेरंग आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

डोळ्यांची काळजी घेणे आणि डोळ्यांची योग्य प्रकारे देखभाल करणे हे महत्वाचे आहे. यासाठी आहार देखील महत्वाचा आहे. मात्र, आजकाल डोळ्यांच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. आजकाल डोळ्यांना चष्मा लागणे हे अतिशय कॉमन झाले आहे.

वयोवृद्धांसोबत लहान मुलांना ही चष्मा लवकर लागतोय. चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी आणि चष्मा घालवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात या टिप्स.

How to remove spectacles
Foods for Liver Health : हळद, कॉफीसह ‘या’ २ गोष्टींचा आहारात करा समावेश; यकृत राहील निरोगी

आहार

निरोगी आरोग्यासाठी आणि निरोगी डोळ्यांसाठी चांगला आहार घेणे अतिशय महत्वाचे आहे. डोळ्यांची दृष्टी चांगली राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये व्हिटॅमिन A, फॅटी अ‍ॅसिड, व्हिटॅमिन C इत्यादी पौष्टिक घटकांनी युक्त असलेल्या खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करा.

या घटकांमुळे डोळ्यांची दृष्टी चांगली राहण्यास मदत होईल. विविध प्रकारची फळे, हिरव्या पालेभाज्या या गोष्टींचा आहारात आवर्जून समावेश करा.

पुरेशी झोप

निरोगी जीवनशैलीसाठी पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे. योग्य आहार आणि पुरेशी झोप घेणे हे आपल्या डोळ्यांसाठी आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

आपल्या डोळ्यांना आरामाची गरज असते. त्यामुळे, सतत मोबाईल, टिव्ही, लॅपटॉपच्या स्क्रिनपासून लांब राहण्याचा प्रयत्न ठेवा आणि पुरेशी झोप घ्या. डोळ्यांच्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे.

How to remove spectacles
Health Tips : तुम्हीही कामाच्या नादात ८ तासांपेक्षा जास्त वेळ एकाच जागी बसून राहता काय? जाणून घ्या तोटे

व्यायाम करा

रोज व्यायाम केल्याने आपल्या शरीराला याचे अनेक फायदे होतात. निरोगी डोळ्यांसाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. जर तुम्ही लॅपटॉपवर ८-९ तासांसाठी काम करत असाल तर मध्ये ब्रेक घेत जा आणि ब्रेकमध्ये डोळ्यांचे व्यायाम करा.

यामुळे, तुमच्या डोळ्यांवरील चष्मा घालवण्यासाठी मदत होईल आणि डोळ्यांचा नंबर कमी होऊ शकेल.

गुलाबजल

गुलाबजल हे आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर आहे. मात्र, गुलाबजल डोळ्यांसाठी देखील अतिशय फायदेशीर आहे. गुलाबपाण्यामध्ये थंड आणि दाहकविरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे, गुलाबजल थकलेल्या डोळ्यांसाठी अतिशय फायदेशीर आहे.

ताण तणाव आणि डोळ्यांच्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी रोज डोळ्यांजवळ गुलाबजल कॉटनच्या मदतीने लावा. दररोज असे केल्याने तुमच्या डोळ्यांखालील काळी वर्तुळे निघून जाण्यास मदत होईल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

How to remove spectacles
Health Tips: हे ड्रायफ्रुट्स भिजवून खाल्ल्याने होतात अधिक फायदे; कोलेस्ट्रॉल होईल दूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com