esakal | वर्षभरात चौथ्यांदा महागली मारुती कार! करावा लागेल 25 हजारांपर्यंत अधिक खर्च
sakal

बोलून बातमी शोधा

वर्षभरात चौथ्यांदा महागली मारुती कार!

देशातील सर्वांत मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाने कारच्या किमतीत वाढ केली आहे.

वर्षभरात चौथ्यांदा महागली मारुती कार! 25 हजारांपर्यंत अधिक खर्च

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : तुम्ही नवीन कार (Car) घ्यायच्या विचारात असाल तर आधी ही बातमी वाचा; कारण देशातील सर्वांत मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाने (Maruti Suzuki India) कारच्या किमतीत वाढ केली आहे. सेलेरियो वगळता सर्व कारच्या किमतीत 1.9 टक्‍क्‍यांनी वाढ केल्याचे कंपनीने म्हटले आहे. नवीन किमती सोमवारपासून (ता. 6) लागू झाल्या आहेत. वेगवेगळ्या मॉडेल्स आणि व्हेरिएंटनुसार कारच्या नवीन किमतीत वाढ करण्यात आली आहे.

हेही वाचा: जाणून घ्या: बिर्याणीत वापरल्या जाणाऱ्या पुदिनाविषयी

कंपनीने सांगितले की, कारच्या किमतीत वाढ होण्यामागील कारण कच्च्या मालाच्या किमतीत सतत वाढ हे आहे. कंपनी इनपुट खर्चाचा संपूर्ण भार स्वतः घेऊ शकत नाही, म्हणून ती त्याचा काही भाग ग्राहकांवर टाकत आहे.

मारुती कारच्या या काही मॉडेल्स...

एस-प्रेसो

एस-प्रेसो

वॅगनआर

वॅगनआर

विटारा ब्रेजा

विटारा ब्रेजा

डिझायर

डिझायर

अर्टिगा

अर्टिगा

बलेनो

बलेनो

अल्टो 800

अल्टो 800

18 हजारांनी वाढली "अल्टो'ची किंमत

नवीन किमतींनंतर मारुतीच्या कार 10 ते 25 हजार रुपयांनी महाग झाल्या आहेत. कंपनीची एंट्री-लेव्हल अल्टो कार आता ऑन रोड 18 हजार रुपयांपर्यंत महाग झाली आहे. त्याचप्रमाणे स्विफ्ट, डिझायर, इको, एर्टिगा, एस-प्रेसो यांसारखी वाहनेही 25 हजारांपर्यंत महाग झाली आहेत.

मारुती सुझुकीच्या सर्व मॉडेल्सच्या नव्या किमती

मारुती सुझुकीच्या नवीन किमती वेगवेगळ्या राज्यांनुसार ठरल्या आहेत. काही राज्यांमध्ये अल्टोच्या किमतीत 18 हजार रुपयांनी वाढ झाली आहे, काही राज्यांमध्ये 16 हजार रुपयांनी. देशाची राजधानी दिल्लीतील नवीन दर पाहा.

मॉडेलची किंमत : किती रुपयांनी महाग (नवी दिल्ली)

 • अल्टो 800 : 16,100 रुपयांपर्यंत

 • एस-प्रेसो : 7,500 रुपयांपर्यंत

 • वॅगनआर : 12,500 रुपयांपर्यंत

 • विटारा ब्रेजा : 10,000 रुपयांपर्यंत

 • डिझायर : 10,000 रुपयांपर्यंत

 • अर्टिगा : 20,000 रुपयांपर्यंत

 • स्विफ्ट : 13,000 रुपयांपर्यंत

 • बलेनो : 15,200 रुपयांपर्यंत

 • इग्निस : 14,680 रुपयांपर्यंत

 • सियाज : 20,000 रुपयांपर्यंत

 • XL6 : 12,311 रुपयांपर्यंत

 • एस-क्रॉस : 20,500 रुपयांपर्यंत

 • टूर-एस : 20,300 रुपयांपर्यंत

 • ईको : 22,500 रुपयांपर्यंत

हेही वाचा: KBC च्या सेटवर दीपिकाने नेसलेल्या साडीची किंमत ऐकून व्हाल थक्क

यावर्षी किमती वाढल्या चारपट

असे नाही की मारुतीने आपल्या कारच्या किमती या वर्षी पहिल्यांदाच वाढवल्या आहेत; याआधीही कारच्या किंमती तीनवेळा वाढवल्या आहेत. प्रथम जानेवारीत कंपनीने कारच्या किमतीत 34,000 रुपयांपर्यंत वाढ केली होती. एप्रिलमध्ये काही मॉडेल्समध्ये 22,500 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली. त्यानंतर जुलैमध्ये कंपनीने पुन्हा एकदा किमतीत वाढ केली. अशा परिस्थितीत आता कार चौथ्यांदा महाग झाल्या आहेत.

किमती वाढण्याची तीन मुख्य कारणे

 • स्टील महाग : वाहनांच्या किमतीत झालेल्या वाढीसंदर्भात कंपनीचे म्हणणे आहे की, कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे वाहन तयार करण्याचा खर्चही वाढत आहे. विशेषत: स्टीलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या एका वर्षात स्टीलच्या किमती 50 टक्‍क्‍यांनी वाढल्या आहेत.

 • सेमीकंडक्‍टर्सची कमतरता : जगभरातील सेमीकंडक्‍टर्सची मागणी आणि पुरवठा यांच्यामध्ये अंतर वाढत आहे. खराब हवामान आणि साथीच्या आजारांमुळे अनेक कंपन्यांना त्यांचे कारखाने बंद करावे लागले. अशा परिस्थितीत कार कंपन्यांना जास्त पैसे देऊन सेमीकंडक्‍टर्स खरेदी करावे लागते.

 • वाहतूक खर्च वाढला : याबरोबरच बाहेरून येणाऱ्या वाहनांवर कर लावला जात आहे. त्याचबरोबर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने वाहतूकही महाग झाली आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम वाहनांच्या किमतीवर होत आहे.

loading image
go to top