esakal | उन्हाळ्यात जुन्या कपड्यांना नवीन लूक द्यायचाय? मग वाचा 'या' टीप्स अन् दिसा हटके

बोलून बातमी शोधा

tips for outfit in summer season nagpur news

ऋतू बदलला की अनेक मुलींचं वॉर्डरोब देखील बदलते. मात्र, अशा काळात अधिक पैसे खर्च होतात. तुम्हाला पैस खर्च न करता हटके दिसायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला काही टीप्स सांगणार आहोत. 

उन्हाळ्यात जुन्या कपड्यांना नवीन लूक द्यायचाय? मग वाचा 'या' टीप्स अन् दिसा हटके
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : उन्हाळ्याच्या दिवसात अनेक तरुणी आपल्या आऊटफिटच्या स्टाईलमध्ये बदल करतात. तसं ऋतू बदलला की अनेक मुलींचं वॉर्डरोब देखील बदलते. मात्र, अशा काळात अधिक पैसे खर्च होतात. तुम्हाला पैस खर्च न करता हटके दिसायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला काही टीप्स सांगणार आहोत. 

अॅसेसरीजने द्या यूनिक टच -

ओवर साईज्ड टी-शर्टसोबत क्रॉप्ड डेनिम परिधान करा. हे एकदम कॅज्युअल लूक आहे. मात्र, यावर तुम्हा अॅसेसरीज लावून एकदम हटके लूक करू शकता. यासाठी स्टेटमेंट अॅसेसरीज किंवा स्टाईल अॅसेसरीजची लेयरिंग केल्यास लूक आणखी चांगला दिसेल. 

हेही वाचा - 'सरकारने पाठीवर मारावे पण पोटावर मारू नये'; नाभिक संघटनेची विनवणी;...

मोनोक्रोमेटिक लूक आहे बेस्ट -
आपले लूक चांगला दिसण्यासाठी हा देखील एक पर्याय आहे. हिरव्या रंगाने तुम्ही तुमचा लूक आणखी हटके बनवू शकता. लाईट हिरव्या रंगाचे टॉप आणि मॅचिंग डार्क रंगाची पँट यामुळे तुमचा लूक चांगला दिसेल. तुमच्याकडे असलेल्या जुन्या कपड्यांमध्येच तुम्ही हा लूक करू शकता. यावर मेकअप आणि हेयस्टाईल करून देखील तुम्ही लूक आणखी हटके करू शकता.

हेही वाचा - हृदयद्रावक! शेतात काम करताना महिलांना अचानक दिसला तार...

लेयरिंगवर फोकस करा -
बॉलीवूड अॅक्ट्रेस आलिया भट्ट आपल्या लूक सर्वांनाच प्रभावित करीत असते. तुमच्याकडे असलेल्या वार्डरोबमधील कपडे तुम्ही लेयरिंग करून वापरू शकता. पांढऱ्या रंगाची टी-शर्ट, डेनिम आणि त्यावर पोल्का डॉटची लेयरिंग, हे परिधान केल्यास एकदम भारी लूक दिसेल.

काही हटके विचार करा -
कॅज्युअल आऊटफिटवर हटके लूक करायचा असेल तर तुम्ही ब्रैलेट विद जैकेट किंवा जीन्स किंवा पँटसोबत परिधान करू शकता. तसेच क्लोटॉसवर तुम्ही स्लिवलेस टॉप परिधान केल्यास एकदम हटके लूक दिसेल. यावर हलका मेकअप केल्यास सौंदर्य आणखी खुलून दिसेल.