प्रेमी युगुलांनो, 'हे' नियम समजून घ्या अन् कुठेही बिनधास्त फिरा!

अविवाहित प्रेमी युगुलांना काही नियम माहित असतील, तर त्यांना कुणीही विनाकारण त्रास देऊ शकणार नाही.
प्रेमी युगुलांनो, 'हे' नियम समजून घ्या अन् कुठेही बिनधास्त फिरा!

Unmarried Couples Rights: बॉलीवूडमध्ये तुम्ही असे अनेक चित्रपट पाहिले असतील, ज्यामध्ये जोडप्यांना अनेक अडचणींचा सामना करताना दाखवण्यात आले आहे. सिनेमाप्रमाणेच खऱ्या आयुष्यातही अविवाहित प्रेमी युगुलांना असंख्य गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आपल्या जोडीदारासोबत हॉटेल किंवा इतर ठिकाणी फिरताना तसेच एकांतात वेळ घालवताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. अनेकदा त्यांना समाजकंटकांचा सामना करावा लागतो, तर कधी ते कायद्याच्या कचाट्यात सापडतात. अशी परिस्थिती टाळण्यासाठी, काही नियम माहित असणे आवश्यक आहे. हे नियम जाणून घेतल्यास तुम्ही स्मार्ट तर व्हालच, पण तुमच्या जोडीदारासोबत सहज राहण्यासही सक्षम व्हाल. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला असे काही नियम सांगत आहोत, जे प्रत्येक अविवाहित जोडप्याला माहित असले पाहिजेत.

1. लिव्ह-इन रिलेशनशिप कायदा (Live-in relationship act)

लग्न न करता एकत्र राहणे म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप...लिव्ह इन रिलेशनशिपचा ट्रेंड काळाच्या ओघात झपाट्याने वाढला आहे. 2013 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने लिव्ह इन रिलेशनशिपच्या संदर्भात म्हटले होते की, दोन प्रौढ व्यक्ती (मुलगा किंवा मुलगी), ज्यामध्ये मुलीचे वय 18 वर्षे आणि मुलगा 21 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचा असेल तर ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू शकतात.

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये, दोन्ही भागीदारांना इच्छेनुसार शारीरिक संबंध ठेवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, पंधरा वर्षांपूर्वी म्हणजेच 2006 मध्ये सुप्रीम कोर्टाने एका खटल्याचा निकाल देताना सांगितले होते की, प्रौढ झाल्यानंतर व्यक्ती एखाद्या व्यक्तीसोबत राहण्यास किंवा लग्न करण्यास स्वतंत्र असते. विशेष म्हणजे ज्याप्रमाणे पती-पत्नीचा घटस्फोट झाल्यावर पती पत्नीला खर्च आणि भत्ते देतो, त्याचप्रमाणे न्यायालय लिव्ह-इन नातेसंबंध संपुष्टात आल्यावर न्यायालय अंतिम निर्णय घेईल आणि दंडही ठोठावू शकेल.

प्रेमी युगुलांनो, 'हे' नियम समजून घ्या अन् कुठेही बिनधास्त फिरा!
Relationship Tips: जोडीदार रुसलाय? या ४ मार्गांनी काढा जोडीदाराचा रुसवा

2. हॉटेलमध्ये राहण्याचे नियम (Hotel stay rules)-

अविवाहित प्रौढ जोडप्यांना हॉटेलमध्ये राहण्याची परवानगी नसल्याच्या बातम्या तुम्ही बर्‍याच वेळा ऐकल्या असतील. पण भारतीय कायद्याने प्रौढ जोडप्यांना कुठेही जाऊन कोणत्याही हॉटेलमध्ये राहण्याचा अधिकार दिला आहे. प्रौढ जोडप्यांना हॉटेलमध्ये एकत्र राहण्यापासून रोखणारा कोणताही कायदा नाही. मात्र यासाठी त्या दोघांनाही त्यांचे ओळखपत्र आणि आवश्यक कागदपत्रांची प्रत द्यावी लागेल. अनेक हॉटेल्समध्ये लोकल आयडी स्वीकारली जात नाही, त्यामुळे हॉटेलमध्ये राहण्यापूर्वी अटी व शर्ती जरूर वाचा.

3. सार्वजनिक ठिकाणी बसण्याचे नियम (Rules for sitting in a public place) -

तुमचं लग्न झालं नसलं, तरीही तुम्ही कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी बसू शकता. परंतु जर कोणी सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केले तर आयपीसीच्या कलम 294 अन्वये जर कोणी सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केले, तर त्याला 3 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. मात्र या कलमाचा गैरवापर होत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. सार्वजनिक ठिकाणी असे कोणतेही कृत्य करू नका हे नेहमी लक्षात ठेवा. सार्वजनिक ठिकाणी बसून बोलत असाल तर पोलीस अटक करू शकत नाहीत.

प्रेमी युगुलांनो, 'हे' नियम समजून घ्या अन् कुठेही बिनधास्त फिरा!
Relationship Tips : तुमच्या नात्यात प्रेम कमी झालंय! या गोष्टी एकदा तपासा

4. अपमानास्पद भाषेविरूद्ध नियम (Rules against abusive language) -

जर एखादे जोडपे असे नातेसंबंधात असेल आणि यादरम्यान अपमानास्पद शब्द वापरले गेले तर अशा परिस्थितीत घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 नुसार, मुली संरक्षणाची मागणी करू शकतात.

5. शारीरिक संबंधांवरील नियम (Rules on physical relation)

भारतीय संविधानाने अनुच्छेद २१ द्वारे गोपनीयतेचा अधिकार प्रदान केला आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर, जोडपे खाजगी ठिकाणी एकमेकांशी शारीरिक संबंध ठेवू शकतात. सुप्रीम कोर्टाने 2017-2018 मधील 2 प्रकरणांवरील निर्णयाचा पुनरुच्चार केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com