Gym Tips : व्यायामामुळे रक्तवाहिन्यांना असा असतो धोका; जिममध्ये जात असाल तर ही काळजी घ्या

तुमच्या शिरांचे एक महत्त्वाचे कार्य म्हणजे तुमच्या हातपायांमधून रक्त पुन्हा तुमच्या हृदयाकडे नेणे.
Gym
Gymgoogle

मुंबई : जर तुम्ही कधीही बॅक स्क्वॅट्सचा सराव केला असेल, तर त्यानंतर तुमच्या लक्षात आलेच असेल की पायांच्या शिरा अधिक स्पष्ट दिसू लागतात. वेट लिफ्टींगचा परिणाम खरोखरच व्हेरीकोज व्हेन्समध्ये होतो का याबद्दल सांगत आहेत फॉर्च्युन क्लिनिकचे लॅपरोस्कोपिक आणि लेझर सर्जन डॉ. सनी अग्रवाल. (Varicose veins)

वर्कआउट पूर्णपणे थांबविणे हा यावरचा उपाय नसून जर तुम्हाला काळजी वाटत असेल की काही हालचालींमुळे तुमच्या व्हेरीकोज व्हेन्सवर परिणाम होऊ शकतात, तर तुम्हाला त्याबद्दल अधिक जागरूक राहाण्याची गरज आहे.

आकाराने मोठ्या किंवा गडद रंगाच्या असल्याने त्वचेतून व्हेरीकोज व्हेन्स चटकन दिसून येतात. हे रक्त तुमच्या वॅाल्व्हचा समस्यांमुळे जमा होते, ज्यामुळे शिरा रंग बदलतात किंवा त्यांचे प्रमाण वाढते.

तुमच्या शिरांचे एक महत्त्वाचे कार्य म्हणजे तुमच्या हातपायांमधून रक्त पुन्हा तुमच्या हृदयाकडे नेणे. तुमच्या शिरांची झडप गुरुत्वाकर्षणावर परिणाम करुन रक्तप्रवाहात अडथळे आणते.

जेव्हा ते व्हॉल्व्ह खराब होतात तेव्हा रक्तप्रवाहात अडथळा यऊन व्हेरीकोज व्हेनची समस्या उद्भवू शकते. हेही वाचा - स्टाॅक मार्केटमधलं ट्रेडर बनायचंय..मग ही पथ्यं पाळाच...

Gym
Evening Gym : संध्याकाळी जिमला जात असाल तर तुम्ही चुकताय; कारण....

व्यायामामुळे व्हेरीकोज व्हेन्सवर काय परिणाम होतात ?

व्यायाम हा रक्तवहिन्यासंबंधीच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, परंतु व्यायामाचे काही प्रकार, जसे की जॉगिंग किंवा वर्कआउट्स सारख्या उच्च-परिणामकारक क्रियाकलाप ज्यांमुळे तुमच्या पायाच्या नसांवर आणखी ताण येऊ शकतो, थकवा, वेदना, पेटके आणि तुमचे पाय जड वाटणे यांसह व्हेरीकोज व्हेन्सची लक्षणे वाढू शकतात.

वेटलिफ्टिंगमुळे तुमच्या ओटीपोटावर आणि तुमच्या पायातील नसांवर खूप ताण येऊ शकतो, खासकरून जर तुम्ही जास्त वजन उचलत असाल आणि तुम्ही श्वास रोखून धरत असाल तर.

जरी वेटलिफ्टिंगमुळे व्हेरीकोज व्हेन्स तयार होत नसले तरी, तुम्ही जास्त वजन उचलल्यास, योग्य तंत्राचा वापर न केल्यास किंवा नीट श्वास न घेतल्यास ते फायद्यापेक्षा जास्त नुकसानकारक ठरण्याची शक्यता असते.

जर तुम्हाला व्हेरीकोज व्हेन्स असतील तर तुम्ही व्यायाम करणे थांबवावे का ?

व्यायाम पूर्णपणे न थांबविता काही ठरावीक गोष्टींचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जातात. जर तुम्हाला व्हेरीकोज व्हेन्सचा त्रास असेल तर

• पोटरीचे स्नायू मजबूत करा (ज्यामुळे तुमच्या नसा तुमच्या हृदयापर्यंत रक्त पोहोचविण्यास मदत करतात)

• चांगले रक्ताभिसरण (तुमच्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीसाठी सहाय्य करण्यासाठी)

• नवीन व्हेरीकोज व्हेन्स मिळण्याची शक्यता कमी होते

• स्नायू मजबूत करणे

व्यायामामुळे तुम्हाला निरोगी वजन राखण्यातही मदत होऊ शकते. अभ्यासानुसार, जास्त वजनामुळे शिरासंबंधी समस्या वाढू शकतात, पायांमधील नसांमध्ये दबाव वाढू शकतो आणि शिरासंबंधी कार्य बिघडू शकते.

व्यायामामुळे लठ्ठपणा-संबंधित रक्तवाहिनीच्या समस्यांचे परिणाम टाळण्यास मदत होते कारण ते तुम्हाला निरोगी वजन राखण्यास मदत करू शकते. व्यायामामुळे तुमचा मूड सुधारू शकतो, तुमच्या वेदनांची तीव्रता कमी होऊ शकते आणि झोपेची गुणवत्ता सुधारू शकते.

Gym
Yoga Tips : शीर्षासन करण्याची भीती वाटतेय ? हे नियम पाळा आणि दुखापत टाळा

व्हेरीकोज व्हेन्सची लक्षणे :

• शिराभोवती खाज सुटणे

• पाय दुखणे किंवा पायांमध्ये जडपणा येणे

• पायांना पेटके येणे

• त्वचा पातळ होणे किंवा कोरडी होणे

• शिरांना सूज येणे

• लक्षात ठेवा की वर्कआउट दरम्यान रक्तवहिन्यासंबंधी सूज सामान्य आहे. जर सूज निघून गेली नाही तर व्हेरीकोज व्हेनचा विकास होऊ शकतो.

येथे काही मार्ग आहेत ज्याने जिममध्ये जाणाऱ्या वक्ती व्हेरीकोज व्हेन्स टाळू शकतात

रक्तप्रवाह व्यवस्थित राखण्यासाठी, तुमचा प्रशिक्षणासोबत एरोबिक वर्कआउट्सही जोडा.

• पायांच्या प्रशिक्षणासाठी थोडा वेळ उभे रहा आणि थोडा वेळ बसा

• कसरत केल्यानंतर तुमचे पाय स्ट्रेच करा.

• जोपर्यंत तुम्ही वजन उचलण्यासाठी पूर्णपणे तयार होत नाही तोपर्यंत जास्त वजन उचलू नका.

• दिवसभरात भरपूर पाणी प्या.

• कठीण पृष्ठभागांवर सराव करू नका.

• कॉम्प्रेशन मोजे वापरा.

जर तुम्हाला आधीच व्हेरीकोज व्हेन्स असेल तर तुम्हाला तुमची व्यायामाची दिनचर्या बदलावी लागेल. यापैकी कोणतीही क्रिया व्हेरीकोज नसांना प्रतिबंध करू शकत नाही किंवा तुमच्या आधीपासून अस्तित्वात असलेल्या व्हेरीकोज व्हेन्स समस्यांवर उपचार करू शकत नाही.

विशिष्ट आहार आणि वर्कआउट्स व्हेरीकोज व्हेन्सचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात. योग्य प्रकारे व्यायाम केला तर निरोगी आहार आणि योग्य व्यायाम तुम्हाला बरे वाटण्यास आणि तुमची अस्वस्थता कमी करण्यात मदत करेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com