Wedding Planner : वेडिंग प्लॅनर बनायचं आहे? हे ॲप डाऊनलोड करा आणि मिनिटांत शिकून घ्या

आजकाल नोट्स बनवण्यासाठी पेन आणि कागद घेऊन जाणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे
Wedding Planner
Wedding Planner esakal

Wedding Planner : आजकाल नोट्स बनवण्यासाठी पेन आणि कागद घेऊन जाणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. प्रत्येकाला आपल्या फोनमध्ये यादी वगैरे ठेवायला आवडते. बरं, हे देखील खरं आहे की पूर्वीच्या लोकांप्रमाणे कागदपत्रांचा सांभाळ करणं कठीण असतं. अनेक वेळा ते हरवण्याची भीती असते किंवा त्यांना नेहमी सोबत ठेवणं शक्य नसतं. अशा परिस्थितीत लोक संपूर्ण यादी फोनच्या नोट्समध्ये ठेवतात.

वेडिंग प्लॅनर होणं म्हणजे अशा प्रकारची भली मोठी यादी सांभाळणं. जर तुम्ही या वेडिंग सीझनमध्ये वेडिंग प्लॅनर होण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा काही अॅप्सबद्दल सांगणार आहोत जे तुम्हाला खूप मदत करू शकतील. यामध्ये तुम्ही तुमची सर्वात मोठी यादी एकाच ठिकाणी सेव्ह करू शकाल.

Wedding Planner
Health Tips : जास्त लोणचे खाल तर दवाखान्यात जाल? पटत नसेल तर वाचा

Wedding Planner by MyWed

हे वेडिंग प्लॅनर अॅप वापरल्याने तुमचे बरेच काम सोपे होऊ शकते. तुम्ही तुमची सर्व कामं या अॅपमध्ये करू शकता - तुम्ही लोकांची यादी तयार करू शकता, महत्त्वाच्या कामांचा मागोवा ठेवू शकता, खर्च लिहू शकता आणि विक्रेते व्यवस्थापित करू शकता. हे अॅप Google Play Store वर असून 500K लोकांनी डाऊनलोड केलं आहे. याला प्लॅटफॉर्मवर 4.1 रेटिंग आहे.

Wedding Planner
Mental Health : एक एकटा एकाकी! एकटच विचार करत बसण्यापेक्षा या गोष्टी करा, फरक जाणवेल!

Wedding Planner by The Knot

1 दशलक्षाहून अधिक लोकांनी हे ॲप डाऊनलोड केलं आहे. Google Play Store वर त्याचं रेटिंग 4.8 आहे. म्हणजेच हे अॅप अनेक युजर्सचे आवडतं अॅप आहे. या अॅपद्वारे तुम्ही लग्न पूर्णपणे मॅनेज करू शकता. येथे तुम्हाला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट सहज मिळेल.

Wedding Planner
Health : आंबवलेल्या पदार्थांचे फायदे

WedMeGood

या अॅपद्वारे तुम्ही तुमच्या लग्नाचे उत्तमरित्या नियोजन करू शकता. गुगल प्ले स्टोअरवर आतापर्यंत या अॅपचे 10 लाखांहून अधिक युजर्स आहेत. या अॅपला प्लॅटफॉर्मवर 4.6 रेटिंग मिळाले आहे.

Wedding Planner
Health Care News: मासिक पाळीतील मूड स्विंग्सनी हैराण? मग तुम्हाला मदत करतील या टिप्स…

तुम्ही हे सर्व अॅप्स Google Play Store आणि Apple App Store या दोन्ही प्लॅटफॉर्मवरून पूर्णपणे मोफत इन्स्टॉल करू शकता. यासाठी तुम्हाला कोणतेही अतिरिक्त शुल्क भरण्याची गरज नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com