
Flying Kiss Meaning : लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान आज राहुल गांधींनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. यानंतर केंद्रिय मंत्री स्मृती इराणींनीही राहुल गांधीवर टिकेच्या माध्यमातून हल्लाबोल केला. राहुल गांधींनी असभ्य हावभाव केल्याचा आरोप यावेळी स्मृती इराणी यांनी केला. सदनातून बाहेर पडताना स्मृती इराणींना फ्लाइंग किसचे हावभाव केले अशी त्यांनी तक्रार केली आहे. त्यानंतर आता 'फ्लाइंग किस' हा शब्द सध्या सोशल मीडियावर आणि इतरत्रही चर्चेचा विषय झालाय.
फ्लाइंग किस हा शब्द तुम्ही प्रत्येकाने ऐकलाच असेल. लहान बाळाला आपण प्रेमाने फ्लाइंग किस देतो. तसेच प्रियकर प्रेयसीसुद्धा एकमेकांना फ्लाइंग किस देत प्रेम व्यक्त करत असतात. मात्र फ्लाइंग किसचा नेमका अर्थ काय हे तुम्हाला माहितीये का? आज लोकसभेत ज्या शब्दाने वादळ उठलं त्या शब्दाचा म्हणजेच फ्लाइंग किसचा नेमका अर्थ काय ते आज आपण जाणून घेऊयात. तसेच किसेसचे एकूण किती प्रकार आहे तेदेखील जाणून घेऊयात.
जर कोणी अचानक तुम्हाला मागून मिठी मारली आणि नंतर चुंबन घेतले तर त्याला स्पायडर किस म्हणतात. याचा अर्थ संबंधित व्यक्ती तुमच्यावर खूप प्रेम करतो.
जर तुमचा पार्टनर तुम्हाला कपाळावर किस करत असेल तर समजून घ्या की तुम्ही त्यांच्यासाठी खूप खास आहात. तो तुमचा मनापासून आदर करतो आणि तुम्हाला गमावू इच्छित नाही. हे किस जोडीदार किंवा प्रियकर यांच्यातच असले पाहिजे असे नाही, मित्र आणि आई-वडीलही प्रेम व्यक्त करण्यासाठी हे करू शकतात.
जेव्हा एखाद्याला आपण आवडतो तेव्हा तो गालावर किस करतो. अशा परिस्थितीत जर कोणी तुम्हाला गालावर किस करत असेल तर समजून घ्या की त्याचे तुमच्यावर प्रेम आहे. बहुतेक मित्र, भागीदार, पालक प्रेमाने तुमच्या गालावर किस करत असतात.
जेव्हा कोणी तुम्हाला स्पर्श न करता दूरवरून हवेत चुंबन घेतो तेव्हा त्याला फ्लाइंग किस म्हणतात. याचा अर्थ तो तुमच्यावर खूप प्रेम करतो. तसेच तुमच्यापासून त्या व्यक्तीस दूर राहायचे नाही असा त्याचा अर्थ होतो.
एखाद्याच्या हातावर किस करण्याचा असा अर्थ होतो की समोरची व्यक्ती तुमच्यावर इम्प्रेस झाली आहे आणि ती तुम्हाला डेट करू इच्छित आहे. त्याला तुमच्यासोबतचे नाते पुढे आणखी घट्ट करायचे असून उत्कृष्ट बाँडिंग तयार करायची आहे. याशिवाय वडिलधाऱ्यांना किंवा एखाद्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठीही हाताचे चुंबन घेतले जाते.
तुमच्या मनातील प्रेम पूर्णपणे व्यक्त करण्यासाठी लिप किसिंग केले जाते. आता असे गरजेचे नाही की जोडप्यांनीच एकमेकांच्या ओठांचे चुंबन घेतले पाहिजे. अनेक देशांमध्ये, विशेषतः परदेशात, पालक आपल्या मुलांचे ओठांवर चुंबन घेऊन त्यांचे प्रेम व्यक्त करतात. अशाप्रकारे प्रत्येक किसचा वेगळा अर्थ आहे. (Lifestyle)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.