Solo Dating : तरूणींमध्ये सोलो डेटिंगचा वाढतोय ट्रेंड..! जाणून घ्या फायदे

Solo Dating : धावपळीच्या जीवनात स्वतःला स्ट्रेस फ्री ठेवण्यासाठी तरुणींमध्ये ‘सोलो डेटिंग’चा ट्रेंड चांगलाच वाढतोय.
Solo Dating
Solo Datingesakal

Solo Dating : धावपळीच्या जीवनात स्वतःला स्ट्रेस फ्री ठेवण्यासाठी तरुणींमध्ये ‘सोलो डेटिंग’चा ट्रेंड चांगलाच वाढतोय. शहरातील काही तरुणींनी तर ‘सोलो डेटिंग’ करीत अख्खा देशच पालथा घातला आहे.

स्वतःसाठी वेळ काढून आनंद साजरा करण्याच्या या नव्या फंड्याने तरुणींना चांगलीच भूरळ घातलेली दिसते.

काय आहे सोलो डेटिंग

पार्टनरसोबत सर्वच डेटवर जातात. मात्र, एकट्याने स्वतः समवेत वेळ घालवणे, स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच सोलो डेटिंग. याला मास्टर डेटिंग म्हणूनही ओळखले जाते.

Solo Dating
Maharashtra Travel : थोडी सागर निळाई, थोडे शंख नी शिंपले..! महाराष्ट्रातल्या ‘या’ समुद्रकिनाऱ्यांची बातच न्यारी, कुटुंबासोबत नक्की भेट द्या

काय म्हणतात सोलो डेटर्स ?

कोरोना काळात मी घरी राहून फारच अस्वस्थ व्हायची. त्यापासून सुटका मिळावा म्हणून मी सोलो ट्रिपवर जाण्याचा धाडसी निर्णय घेतला. ट्रीप दरम्यान मी पर्यावरण संवर्धन आणि महिला जागर करत निघाली. यावेळी मला कळाले की, वाटेतीस अडचणी तेवढ्या भयावह नसतात, जेवढ्या समाजात पेरल्या गेल्या आहेत. जगात अनेक लोक मदत करणारे असता. सोलो ट्रिपचा एक वेगळा आनंद असतो. प्रत्येकीने स्वतःला ओळखण्यासाठी हिंमत करून बाहेर पडावे.

- प्रणाली चिकटे

अनोळखी लोक सर्वात वाईट असतात असा भ्रम आपल्यामध्ये असतो. मात्र, संपर्कात येणारे प्रत्येकच अनोळखी लोक वाईट नसतात. प्रवासादरम्यान मी ट्रेन, बस आणि इतर साधनांनी प्रवास करते. प्रत्येक प्रवासदरम्यान प्रेमळ माणसे मिळाली. सोलो ट्रिपमुळे माझा आत्मविश्वात तर वाढतोच, शिवाय लोकांशी जुळवून घेण्याची क्षमता वाढते.

- अनघा नंनदाने

सोलो डेटिंगचे फायदे

  • मनातली भीती नाहीशी होऊन आत्मविश्वास वाढतो.

  • ताणतणाव कमी होतो.

  • सामर्थ्य आणि कमकुवतपणा जाणून घेण्यास समक्ष.

  • इतरांशी संबंध सुधारतात.

  • नवनवीन गोष्टीही शिकायला मिळतात.

  • काय काय करू शकता

  • महिन्यातून एकदा एकटे चित्रपट बघायला जाऊ शकता.

  • स्वतःला भेटवस्तू गिफ्ट करा.

  • आवडत्या रेस्टोरेंटमध्ये जेवण करायला जाऊ शकता.

Solo Dating
Online Dating App वरुन लग्नाचं आमिष दाखवून उच्चशिक्षित तरुणाला इंग्लंडच्या महिलेनं पाच लाखांचा घातला गंडा

काय काय करू शकता

  • महिन्यातून एकदा एकटे चित्रपट बघायला जाऊ शकता.

  • स्वतःला भेटवस्तू गिफ्ट करा.

  • आवडत्या रेस्टोरेंटमध्ये जेवण करायला जाऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com