Perfect Age For Marriage : वयाच्या कोणत्या वर्षी लग्न करावे?

तुम्हाला माहिती आहे का वयाच्या कोणत्या वर्षी लग्न करावे?
Perfect Age For Marriage
Perfect Age For Marriagesakal

Perfect Age For Marriage : लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातली खूप मोठी गोष्ट असते. लग्न या एका गोष्टीमुळे माणसाचं आयुष्य बदलतं. लग्न करण्यासंदर्भात अनेकांचं वेगवेगळं मत असतं.

लग्न कोणाशी करावे, कोणत्या वयात करावे याविषयी वेगवेगळे मतप्रवाह असतात पण तुम्हाला माहिती आहे का वयाच्या कोणत्या वर्षी लग्न करावे? (what is the Perfect Age For Marriage read story )

वयाच्या कोणत्या वर्षी लग्न करावे?

कोणी म्हणतं की लग्नाचं एक ठराविक वय असतं तर कुणी म्हणतं लग्नासाठी वयाचं बंधन नसतं तर अनेकांना कोणत्या वर्षी लग्न करावे, याविषयी कन्फुजन असतं. आज आपण या विषयी थोडक्यात जाणून घेऊया.

Perfect Age For Marriage
Wedding Age : नवरा बायकोत किती वर्षाचं अंतर असावं?
  • ज्यावेळी तुम्ही लग्नासाठी मानसिक, शारीरिक आणि आर्थिक दृष्ट्या तयार असाल त्यावेळी लग्न करणे, केव्हाही चांगले.

  • ज्यावेळी तुम्ही जबाबदारी उचलण्यास समर्थ राहाल तेव्हा लग्न करू शकता.

  • लग्न म्हटलं की खर्च वाढणारचं. त्यामुळे जेव्हा तुम्ही बायकोची किंवा होणाऱ्या मुलांची जबाबदारी घेण्यास सक्षम असाल तेव्हा तुम्ही लग्न करू शकता.

Perfect Age For Marriage
Hindu Marriage Rituals : लग्नापूर्वी नवरा नवरीला हळद का लावली जाते?
  • जेव्हा तुमची एखाद्या व्यक्तीसोबत आयुष्यभर सोबत राहण्याची तयारी असते तेव्हा लग्न करा.

  • लग्न करताना मानसिक तयारी असणेही खूप जास्त गरजेचे आहे.

  • याशिवाय तुम्ही लव्ह मॅरेज करत असाल तर तेव्हा दोघांच्या संगन्मताने तुम्ही लग्न करू शकता.

  • कायद्यात मुलींसाठी विवाहाचे वय 18 वर्षे आणि पुरुषांसाठी 21 वर्षे असल्याचा उल्लेख आहे. मात्र यावर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुलीच्या लग्नाचे वय १८ वर्षांवरून २१ वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

Perfect Age For Marriage
Working Women After Marriage : लग्नानंतर महिलांनी नोकरी का करावी?
  • तज्ञानुसार शारीरीक मानसिक आणि आर्थिक या बाजूंचा विचार केला तर मुलींनी २४- २५ व्या वर्षानंतर तर मुलांनी २७-२८ वर्षानंतर लग्न करणे योग्य आहे.

  • लग्न ही दोन नात्यांना जोडणारी एक प्रथा आहे. याचा सकारात्मकदृष्ट्या विचार केला तर वयाचं बंधन येत नाही.

  • हल्ली लग्न करताना वयाचे बंधन पाळले जात नाही. त्यामुळे कोणत्या वयात लग्न करावं, ही प्रत्येकाची वैयक्तिक चॉईस असावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com