Olympic Rings : ऑलिम्पिक रिंगमध्ये 5 रंग का असतात? जाणून घ्या त्यांचा अर्थ

ऑलिम्पिकमध्ये फक्त 5 रिंग का असतात? जाणून घ्या, त्याचा अर्थ आणि पाच रंगांची कथा…
Olympic Rings
Olympic Ringssakal
Updated on: 

पॅरिस ऑलिम्पिक 26 जुलै 2024 पासून सुरू होत आहे. भारतीय खेळाडू पुन्हा एकदा ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याच्या तयारीत आहेत. यावेळी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 117 भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत. 4 वर्षातून एकदा खेळला जाणारा ऑलिम्पिक खेळ सर्वांसाठी खास असतो. यावेळी त्याचे आयोजन पॅरिसमध्ये करण्यात आले आहे. यासाठी आयफेल टॉवरच्या पहिल्या मजल्यावर ऑलिम्पिक रिंग्जही प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.

पण खेळ सुरू होण्यापूर्वी तुमच्या मनात हा प्रश्न आला आहे का की ऑलिम्पिकमध्ये फक्त 5 रिंग का असतात? तसेच ऑलिम्पिक रिंग्सच्या 5 रंगांचा अर्थ काय आहे? आज आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.

ऑलिम्पिक रिंगमध्ये कोणते रंग आहेत?

ऑलिम्पिक रिंगमध्ये पांढऱ्या ध्वजावर निळा, पिवळा, काळा, हिरवा आणि लाल असे 5 रंग असतात.

ऑलिम्पिक रिंगचा अर्थ काय आहे?

या 5 रिंगची रचना ही आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOC) चे माजी अध्यक्ष पियरे डू कौबर्टिन यांनी केली होती. हे पाच रिंग वर्षापूर्वी सुरू झालेल्या ऑलिम्पिक चळवळीचे प्रतीक आहेत. ऑलिम्पिक रिंग जगातील 5 प्रमुख खंडांचे प्रतीक आहेत. हे पाच खंड पुढीलप्रमाणे आहेत: आफ्रिका, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, आशिया, युरोप आणि ऑस्ट्रेलियन खंडाच्या आसपासचे सर्व देश एकच खंड म्हणून गणले गेले आहेत.

ऑलिम्पिक रिंगमध्ये 5 रंग का असतात?

तसेच रिंगमध्ये पाच वेगवेगळ्या रंगांचा वापर हा देखील आपल्यासाठी जटील प्रश्नासारखा आहे. पांढऱ्या पार्श्वभूमीसह निळा, पिवळा, काळा, हिरवा आणि लाल हे रंग ऑलिम्पिक रिंगमध्ये आणले गेले कारण हे सर्व रंग जगातील जवळजवळ प्रत्येक देशाच्या ध्वजांमध्ये आढळतात. सर्व देशांची एकता आणि अखंडता राखण्यासाठी या 5 रंगांचा वापर करण्यात आला.

Chitra kode:

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com