esakal | जेव्हा आपलं मन कुठेच रमत नाही, तेव्हा काय करावे?
sakal

बोलून बातमी शोधा

depressed girl

जेव्हा आपलं मन कुठेच रमत नाही, तेव्हा...

sakal_logo
By
टीम ईसकाळ

प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार हे ठरलेलेच असतात. आनंद आणि दुःख हे जगण्याचा अविभाज्य भाग आहेत. पण कधीकधी आयुष्यात असा काळ येतो की जगण्यात रस वाटत नाही. जगणं उदासवाणं वाटू लागतं. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना अर्थहीन वाटू लागतात आणि आपसूकच आपली वाटचाल नैराश्याच्या दिशेने होते. अशा स्थितीत अनेक वाईट विचार मनात येऊ लागतात. त्यामुळे नैराश्य, व्यसनाधिनता, आत्महत्या अशा गोष्टींकडे माणूस ओढला जातो. हे नकारात्मक विचार फक्त तुमचीच नाही तर तुमच्याशी संबंधित अनेक लोकांवर परिणाम करतात. त्यामुळे योग्य वेळी अशा भावनांमधून बाहेर पडणे आवश्यक आहे.

हेही वाचा: अनोळखी मुलीसोबत मैत्री करताना भीती वाटते? जाणून घ्या, सोप्या टिप्स

चला तर मग आज आपण चर्चा करुया अशाच काही गोष्टींची ज्या तुम्हाला अशा नकारात्मक भावनेतून बाहेर निघण्यास मदत करतील.

स्वतःला वेळ द्या-

बहुतांश लोकांच्या आयुष्यात कधी ना कधी नैराश्य येते. अशा वेळी अनेकजण आपलं नियमित काम बंद ठेवतात आणि एकटे राहू लागतात. पण बऱ्याचदा या एकटेपणातूनच आलेले नैराश्य येते. त्यामुळे या भावनेतून जात असताना आपले काम कधीही थांबवू नका. तुमचं दैनंदिन काम चालू ठेवा. लक्ष कामावर असेल तर, अशी भावना किंवा दुःख आपोआपच कमी होईल.

आपल्याला आनंत देणाऱ्या गोष्टी करा-

नैराश्यातून जाणे याचा अर्थ असा कदापि नाही की, तुम्हाला कोणतीच गोष्ट आनंद देऊ शकणार नाही किंवा तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकणार नाही. त्यामुळे अशा काळात तुम्ही त्या गोष्टी करा, ज्या करायला तुम्हाला आवडतं, ज्या तुम्हाला आनंद देतात. जसे की, स्वयंपाक, प्रवास, संगीत, वाचन इ.

हेही वाचा: World Arthritis Day : सारखा मोबाईल पाहताय, वेळीच आवरा, होईल संधिवात

- समस्या किंवा वाईट घटनांचा विचार करू नका :

दुःखात आपल्याला बऱ्याचदा आपले वाईट दिवस आठवतात, पण त्यांचा विचार केल्याने तुम्हाला काही फायदा होत नाहीच; उलट त्यामुळे तुमचा त्रास अजून वाढतो. त्यामुळे अशा गोष्टींचा विचार न करता स्वतःला व्यस्त ठेवा.

- बाहेर फिरायला जा :

बाहेर फिरायला जाण्याचा अर्थ असा नाही की, तुम्ही कुठेतरी दूर सहलीला जायलं हवं. तुम्ही तुमच्या जवळपास कुठेतरी जाऊ शकता. जसं की, उद्यानात बसून लोकांचे उपक्रम पाहणे, विशेषत: लहान मुलांचे खेळ पाहणे मनात सकारात्मकता आणते. म्हणून या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा.

आपलं जीवन अनमोल आहे. ते जगायला हवं. जीवनातील प्रत्येक क्षणात रमायला हवं.

loading image
go to top