

High Altitude Trekking Diet: Why You Shouldn't Overeat Nuts
esakal
High Altitude Trekking Diet: उंच पर्वतांवर (High Altitudes) ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी आहाराची योग्य निवड करणे अत्यंत महत्त्वाचे असते. अनेकदा ट्रेकिंगदरम्यान ऊर्जा मिळवण्यासाठी ट्रेकर्स मोठ्या प्रमाणात ड्रायफ्रूट्स आणि नट्स खातात. पण, हाय अल्टीट्यूडवर सुकामेवा (Dried Fruits) आणि नट्स (Nuts) खाताना योग्य प्रमाणात सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे आरोग्य आणि ट्रेकिंग तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
सामान्यतः ट्रेकर्स ड्रायफ्रूट्स आणि नट्सला एकच मानण्याची चूक करतात. पण, उंच ठिकाणी हवेतील ऑक्सिजनची पातळी कमी असल्याने आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण घटल्यामुळे (Dehydration) पचनसंस्थेची कार्यक्षमता मंदावते. अशा वेळी नट्सचे अतिसेवन आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकते.