Ceiling Fan: भारतात सीलिंग फॅनला तीन ब्लेड्स का? अमेरिकेत तर चार; वाचा कारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ceiling Fan

Ceiling Fan: भारतात सीलिंग फॅनला तीन ब्लेड्स का? अमेरिकेत तर चार; वाचा कारण

Scientific Fact: प्रत्येकाच्या घरात फॅन हा असतोच. मात्र फॅनमध्ये तीन ब्लेड म्हणजेच पाते का असतात याचा विचार तुमच्या डोक्यात कधी आलाय का? माहितीसाठी जास्तीत जास्त देशांमध्ये पंख्याला ४ पाते असतात मात्र भारतातील तुमच्या घरातील पंख्याचा विचार करता ते तुम्हाला कुठेही तीनच असल्याचे दिसेल. त्यामागे विज्ञानाचाच हात आहे. चला तर जाणून घेऊया यामागचं विज्ञान.

विज्ञानाच्या मते, पंख्यामध्ये जेवढे जास्त पाते असतील तेवढी कमी हवा पंखा देत असतो. त्यामुळे ज्या देशांमध्ये तापमान कमी असतं तेथील पंख्यांमध्ये तुम्हाला चार ब्लेड्स दिसून येतील. तर दुसरीकडे कमी ब्लेड्सवाले पंखे जास्त हवा देतात. आणि भारतातील तापमाने इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे भारतात तीन ब्लेड्स असणारे फॅन आहेत. (lifestyle)

परदेशातील पंख्यांमध्ये ४ ब्लेड्स

थंड हवामानाच्या देशांमध्ये जसे की अमेरिकामध्ये ४ ब्लेड्सचे फॅन असतात. अनेकांना हे विज्ञान माहिती नसल्याने कदाचित तुम्ही लक्ष दिलं नसेल. पुढल्या वेळी विदेशात पर्यटनाला जाताना पंख्यांच्यामागे असणारं हे विज्ञान तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघून या. थंड हवेच्या प्रदेशांमध्ये अधिक हवेची गरज पडत नसल्याने ४ ब्लेड्सच्या फॅनचा वापर केला जातो.

हेही वाचा: Lifestyle Tips: म्हातारपणाआधीच स्वत:ला म्हातारं बनवू नका, आजच सोडा 'या' सवयी

कमी ब्लेड्स असणाऱ्या पंख्यांच्या मोटरवरदेखील कमी लोड असतो. त्यामुळे फॅन वेगाने सहज फिरतो. कमी ब्लेड्सच्या पंख्याचा वापर वेंटिलेशनसाठीही केला जातो.