मकर संक्रांतीला महिला लाखेचा चुडा का घालतात? हे आहे कारण|Why Married Women Wearing Lakh Bangles In Makar Sankaranti | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

lakh chuda
मकर संक्रांतीला महिला लाखेचा चुडा का घालतात? हे आहे कारण|Why Married Women Wearing Lakh Bangles In Makar Sankaranti

मकर संक्रांतीला महिला लाखेचा चुडा का घालतात? हे आहे कारण

दिपाली सुसर

भारतीय संस्कृतीमध्ये (indian culture) स्त्रियांच्या साज-शृंगाराला विशेष महत्त्व आहे. कपाळावरचे कुंकू, गळयातले मंगळसूत्र (Manglsutra) अन् हातातला लाखेचा चुडा, हे बाईच्या रुपात भर पाडणारं विशेष लेणं असतं, अस माझी आजी सांगते. भारतात अन् प्रामुख्याने महाराष्ट्रात (Maharashtra) काही ठिकाणी मकर संक्रातीला अखंड सौभाग्याचा वसा घेण्यासाठी लाखेचे चुडे (Lakh Bangles)घालण्याची परंपरा आहे. वेगवेगळ्या राज्यात चुड्याचा रंग बदलतो. महाराष्ट्रात हिरवा चुडा, लाखेचा लाल चुडा, उत्तरेत पांढरा-लाल चुडा, तर बंगालमध्ये हस्तिदंताच्या बांगड्या असतात. महाराष्ट्रात पंढरपूर, तुळजापूर अशा वेगवेगळ्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी, लाखेचा चुडा घालणे शुभ मानले जाते. सौभाग्यवती स्त्रिया पंढरपुरला श्री पांडुरंग व रुक्मिणी माता यांचे दर्शन घेतल्यावर लाखेचा चुडा घालण्याची पद्धत आहे. पंढरपूरमध्ये दररोज हजारो व यात्रा काळात (वारी) लाखो भाविक दर्शनासाठी येतात. त्यांमधील स्त्री भाविक रुक्मिणीमातेचा आशीर्वाद म्हणून लाखेचा चूडा घालतात. पंढरीची वारी चुड्यांशिवाय पूर्ण होत नाही. बहुसंख्य भाविक स्त्रिया गरीब असतात. त्या पाटल्या, बिल्वर यांची हौस लाखेच्या चुड्यावर पूर्ण करतात. त्या हौसेबरोबर चुड्यांवर अखंड सौभाग्यासाठी श्रद्धादेखील असते. (Why Married Women Wearing Lakh Bangles In Makar Sankaranti)

हेही वाचा: Makar Sankranti ! मकर संक्रांतीला काळी साडी का नेसतात?

पंढरपुरी लाखेचा चुडा हा सोलापूर (Solapur) जिल्ह्याच्या पंढरपुर परिसरात गृहोद्योग होऊन गेला आहे. केवळ देवस्थानामुळे हे महात्म्य बांगड्यांच्या त्या साध्या संचाला लाभले आहे. सौभाग्याचे लेणे म्हणून संक्रांतीच्या काळात पंढरपुरी लाखी चुडा स्त्रिया हळदीकुंकवाचे वाण देऊन देवीला चढवतात. हा पंढरपुरात निर्माण केल्या जाणाऱ्या बांगड्यांचा वापर तिथं तीर्थस्थान असल्याने व लोक येत असल्याने वाढला.लातुर-उस्मानाबाद भागात मकरसंक्रांतीच्या आधल्या दिवशी म्हणजे भोगीला महिला एकमेकींना घरी बोलावून चंदन उगाळून एकमेकींच्या हातावर लावतात. वर्षभर काम करणाऱ्या हातांचा सन्मान म्हणून महिला एकमेकींच्या हातांवर चंदन लावतात. त्यानंतर मग लाखेचा चुडा फोडून तो गरम करुन हातावर चढवला जातो. तेव्हा खास करुन हे वाक्य बोलले जाते. "लाख मोलाचा लाखेचा चुडा, सुखानं राहो तुमचा नवरा-बायकोचा जोडा." अन मग महिलांना तांदळाची खिर खायला देतात. (Why Married Women Wearing Lakh Bangles In Makar Sankaranti)

हेही वाचा: मकर संक्रांतीला बनवा स्वादिष्ट गुळ तिळाचे लाडू

पंढरपूर, तुळजापूर येथे लाखेपासून चुडा तयार करण्याचा लकेरी समाजाचा परंपरागत व्यवसाय (Business) आहे. लकेरी समाजास पूर्वी लाखेरी असं म्हटलं जायचं. आता मात्र लाखेच्या चुड्यांचा व्य‍वसाय लकेरी समाजापुरता मर्यादित राहिला नसून इतर समाजातील मंडळीही त्या व्यवसायात आली आहे. पंढरपुरातील संतपेठ भागात लाखेचा चुडा करणारी पन्नास-साठ कुटुंबे असून, तेथे घरगुती पद्धतीने चुडे तयार केले जातात. तो व्यवसाय काही कुटुंबीय पिढ्यांपासून केला जात आहे. लाखेचा चुडा तयार करायचा स्त्रियांना तर इतका सराव झालेला आहे, की दिवसभरात दहा-बारा स्त्रिया पाच हजारपर्यंत नग तयार करतात.संक्रांतीच्या काळात या चुड्याला सर्वाधिक मागणी असते. बदलत्या युगात बांगड्यांचे जसे नवनवे प्रकार बाजारात आले आहेत त्याप्रमाणे लाखेच्या चुड्यांचेही प्रकार बाजारात येत आहेत. लाखेच्या आकर्षक बांगड्या, ब्रेसलेट, कडे बाजारात उपलब्ध आहेत. (Why Married Women Wearing Lakh Bangles In Makar Sankaranti)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top